एक्स्प्लोर

Satish Wagh Case: अंगावर जखमा, दांडक्याचे वळ अन्... आमदार टिळेकरांच्या मामाची हत्या कशी झाली?, पंचनाम्यानंतर पोलिसांनी काय सांगितलं?

Satish Wagh Murder Case Update: सतीश वाघ यांचा सायंकाळी सातच्या सुमारास उरुळी कांचन येथील शिंदवणे घाटात निर्जनस्थळी त्यांचा मृतदेह आढळला.

पुणे: पुण्यात काही महिन्यांपुर्वी नाना पेठेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची हत्या झाली होती. त्या घटनेनंतर पुणेकर भयभीत झाले. या भयंकर घटनेतून पुणेकर सावरत नाही तोच आता एका नेत्याच्या मामाचे अपहरण करून खून करण्यात आला आहे. विधानपरिषदेचे भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश सादवा वाघ (वय 55 वर्षे) यांचं अपहरण करून त्यांचा खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काल (सोमवारी दि. 9) सतीश वाघ यांचा सायंकाळी सातच्या सुमारास उरुळी कांचन येथील शिंदवणे घाटात निर्जनस्थळी त्यांचा मृतदेह आढळला. सोमवारी, सकाळी सव्वासहाच्या सुमारास सतीश वाघ हे मॉर्निंग वॉकसाठी गेले होते, त्याचवेळी फुरसुंगी फाटा परिसरातून नंबरप्लेट नसलेल्या चारचाकी गाडीतून आलेल्या चार ते पाच अज्ञात व्यक्तींनी अपहरण केले. सतीश वाघ यांचे अपहण केल्यानंतर अपहरणकर्त्यांनी कोणत्याही प्रकारची खंडणी किंवा मागणी केली नाही. अपहरण केल्यानंतर काही तासांमध्येच सतीश वाघ यांचा अपहरणकर्त्यांनी खून केल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे त्यांचा खून नेमक्या कोणत्या कारणातून करण्यात आला, हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही. याप्रकरणी सतीश यांचा मुलगा ओंकार वाघ (वय 27 वर्षे) याने हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. यासाठी पोलिसांची पाच पथकं देखील तयार करून वेगाने तपास सुरू केला आहे.

असं झालं अपहरण

पोलिसांनी या घटनेबाबत दिलेल्या माहितीनुसार, मृत सतीश वाघ हे आपल्या कुटुंबीयांसोबत फुरसुंगी फाटा ब्लू बेरी हॉटेल जवळ मांजरी फार्म (मांजरी बुद्रुक) येथे आपल्या कुटूंबासोबत राहतात. सोमवारी सकाळी सव्वासहा वाजण्याच्या सुमारास नेहमीप्रमाणे ते मॉर्निंग वॉकसाठी गेले असता त्याच वेळी भरधाव चारचाकी गाडीतून आलेल्या चार ते पाच जणांनी सतीश वाघ यांचं अपहरण केलं. त्यांनी आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला. पंरतू अपहरणकर्त्यांनी त्यांना सोडले नाही. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे.

दरम्यान, हा सर्व प्रकार सतीश यांच्या ओळखीचे असलेले नीलेश सोडनर यांनी देखील पाहिला, सतीश वाघ हे नीलेश सोडनर यांच्याशी बोलून थोडं पुढं चालत गेले होते. त्या वेळी ही घटना घडली. वाघ यांनी सोडनर यांना मोठ्याने आवाज देखील दिला. मात्र, काही वेळातच अपहरणकर्त्यांनी सतीश यांना गाडीच्या टाकून पळ काढला. गाडी भाऊराव वस्तीच्या दिशेने भरधाव वेगात निघून गेली. सोडनर यांनी सतीश यांचा मुलगा ओंकार वाघ याला हा प्रकार कळवला. त्यांनी माहिती मिळताच गाडीचा पाठलाग देखील केला. मात्र, सतीश यांचे अपहरण करणारी गाडी कुठेच दिसली नाही. त्यानंतर ओंकार यानी हडपसर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी हडपसर पोलिस ठाण्यात जाऊन तपासाबाबत सूचना दिल्या, पोलिसांनी तपास सुरू केला.

 त्यानंतर संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास शिंदवणे घाट परिसरात फिरण्यासाठी गेलेल्या काही व्यक्तींना एक मृतदेह आढळला. त्यांनी याबाबत उरुळी कांचन पोलिसांना माहिती दिली. त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. आढळलेला मृतदेह हा आमदार टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचा असल्याचं समोर आलं. मृतदेहाच्या अंगावर शस्त्राने वार केल्याचे निशाण आढळून आलेत. पाठीवर आणि मानेवर जखमा असल्याचंही पोलिसांनी सांगितलं आहे. पुणे शहर पोलिसांची पथके शिंदवणे घाटात पोहचली. रात्री उशिरापर्यंत पंचनामा करून सतीश यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवून देण्यात आला होता. शिक्षणाचं माहेरघर असलेल्या आमदाराच्या मामाचे अपहरण करून खून करण्यात आल्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.

काय म्हणाले पोलिस

मॉर्निंग वॉकच्या वेळी चार ते पाच जणांनी एका चारचाकी गाडीतून सतीश वाघ यांचे अपहरण केले होते. सायंकाळी शिंदवणे घाट परिसरात त्यांचा मृतदेह आढळून आला आहे. पोलिसांची पथके आरोपीचा शोध घेत आहेत, अशी माहिती पोलीस उपायुक्त ए राजा यांनी दिली आहे.

सतीश वाघ यांच्या शरीरावर दांड्याने मारल्याचा खुणा आढळल्या आहेत. या मारहाणीतच त्यांचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. शिवाय अपहरणानंतर सकाळीच वाघ यांची हत्या झाली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

काय आहे अपहरण आणि हत्येमागचं कारण?

सतीश वाघ यांची लोणी काळभोर परिसरातील माळीमळा येथे वडिलोपार्जित शेती आहे. ती शेती सतीश वाघ करतात. या शेतातील एक एकराबाबत दिवाणी न्यायालयात खटला सुरू आहे. त्याची सुनावणी सुरू आहे, दाखल फिर्यादीत नमूद केल्यानुसार सतीश वाघ यांनी दहा वर्षांपूर्वी एका व्यक्तीला तीस ते पस्तीस लाख रुपये जमिनीच्या व्यवहारासाठी दिले होते व पैसे परत मिळत नसल्याने वडील (सतीश वाघ) हे वारंवार कॉल करत असल्याचे ओंकार वाघ यांनी त्यांच्या फिर्यादीत म्हटले आहे. किंवा या व्यतिरिक्त अन्य कोणतं वैयक्तिक कारण आहे का याचा पोलिस तपास करत आहेत. पुण्यातील या घटनेने पुन्हा खळबळ उडाली आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mutual Fund : सेबीचं छोट्या गुंतवणूकदारांसाठी मोठं पाऊल, 250 रुपयांची SIP आणणार, म्युच्यूअल फंडमध्ये गुंतवणुकीचा ओघ वाढणार
सेबीचं छोट्या गुंतवणूकदारांसाठी मोठं पाऊल, 250 रुपयांची SIP आणणार, म्युच्यूअल फंडमध्ये पैसा वाढणार
Manikrao Kokate : भुजबळ साहेबांना माहितीय, त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला माझ्याकडे उत्तर, पण...; नेमकं काय म्हणाले माणिकराव कोकाटे?
भुजबळ साहेबांना माहितीय, त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला माझ्याकडे उत्तर, पण...; नेमकं काय म्हणाले माणिकराव कोकाटे?
ठाकरे गटाचा स्वबळाचा नारा! माणिकराव कोकाटेंनी सगळंच काढलं; म्हणाले, 'त्यांनी उघडं लढावं की कपडे...
ठाकरे गटाचा स्वबळाचा नारा! माणिकराव कोकाटेंनी सगळंच काढलं; म्हणाले, 'त्यांनी उघडं लढावं की कपडे...
संजय राऊतांचं संतुलन बिघडलंय, ते स्वतंत्र लढू किंवा एकमेकांच्या डोक्यावर राहून लढू, आम्हाला चिंता नाही, विखे पाटलांचा हल्लाबोल  
संजय राऊतांचं संतुलन बिघडलंय, ते स्वतंत्र लढू किंवा एकमेकांच्या डोक्यावर राहून लढू, आम्हाला चिंता नाही, विखे पाटलांचा हल्लाबोल  
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Jitendra Awhad Shivsena : ठाकरे गटाचा निर्णय योग्य नाही, जितेंद्र आव्हाड यांची पहिली प्रतिक्रियाSanjay Raut Full PC : मविआत भूकंप करणारी घोषणा! संजय राऊत काय म्हणाले? ABP MAJHAShivsena UBT Corporation Elections : महापालिकेत आम्ही स्वबळावर लढणार, Sanjay Raut यांची घोषणाTorres Scamआर्थिक गुन्हे शाखेकडून टोरेस कार्यालयातील मुद्देमाल जप्ती, मुंबई पोलिसांची छापेमारी सुरूच

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mutual Fund : सेबीचं छोट्या गुंतवणूकदारांसाठी मोठं पाऊल, 250 रुपयांची SIP आणणार, म्युच्यूअल फंडमध्ये गुंतवणुकीचा ओघ वाढणार
सेबीचं छोट्या गुंतवणूकदारांसाठी मोठं पाऊल, 250 रुपयांची SIP आणणार, म्युच्यूअल फंडमध्ये पैसा वाढणार
Manikrao Kokate : भुजबळ साहेबांना माहितीय, त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला माझ्याकडे उत्तर, पण...; नेमकं काय म्हणाले माणिकराव कोकाटे?
भुजबळ साहेबांना माहितीय, त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला माझ्याकडे उत्तर, पण...; नेमकं काय म्हणाले माणिकराव कोकाटे?
ठाकरे गटाचा स्वबळाचा नारा! माणिकराव कोकाटेंनी सगळंच काढलं; म्हणाले, 'त्यांनी उघडं लढावं की कपडे...
ठाकरे गटाचा स्वबळाचा नारा! माणिकराव कोकाटेंनी सगळंच काढलं; म्हणाले, 'त्यांनी उघडं लढावं की कपडे...
संजय राऊतांचं संतुलन बिघडलंय, ते स्वतंत्र लढू किंवा एकमेकांच्या डोक्यावर राहून लढू, आम्हाला चिंता नाही, विखे पाटलांचा हल्लाबोल  
संजय राऊतांचं संतुलन बिघडलंय, ते स्वतंत्र लढू किंवा एकमेकांच्या डोक्यावर राहून लढू, आम्हाला चिंता नाही, विखे पाटलांचा हल्लाबोल  
ठाकरे गटाकडून निवडणुकीसाठी स्वबळाचा नारा, संजय राऊतांच्या घोषणेवर मविआत काँग्रेसचा होकार, तर राष्ट्रवादीचा वेगळा सुर
ठाकरे गटाकडून मनपा निवडणुकीसाठी स्वबळाचा नारा, संजय राऊतांच्या घोषणेवर मविआच्या नेत्यांची प्रतिक्रिया
Mutual Fund : 1000 रुपयांच्या SIP नं गुंतवणूक सुरुवात केल्यास 1 कोटी रुपयांचा निधी किती वर्षात जमा होईल, जाणून घ्या समीकरण
एक हजार रुपयांच्या एसआयपीनं गुंतवणूक सुरु केल्यास कोट्यधीश व्हायला किती वर्ष लागू शकतात? जाणून घ्या समीकरण
Chandra Arya : कॅनडाच्या साक्षीला भारतीय 'चंद्र' लाभणार? धारवाडमध्ये शिक्षण, कर्नाटक ते कॅनडा प्रवास करत पीएम पदासाठी दावेदारी केलेले चंद्र आर्य आहेत तरी कोण?
कॅनडाच्या साक्षीला भारतीय 'चंद्र' लाभणार? धारवाडमध्ये शिक्षण, कर्नाटक ते कॅनडा प्रवास करत पीएम पदासाठी दावेदारी केलेले चंद्र आर्य आहेत तरी कोण?
मोठी बातमी : उद्धव ठाकरेंची शिवसेना महापालिका, जिल्हा परिषद निवडणुका स्वबळावर लढणार
मोठी बातमी : उद्धव ठाकरेंची शिवसेना महापालिका, जिल्हा परिषद निवडणुका स्वबळावर लढणार
Embed widget