Ulhasnagar : उल्हासनगरमध्ये धोकादायक इमारतीचा स्लॅब कोसळला, चौघांचा मृत्यू
Ulhasnagar Slab Collapse : उल्हासनगरात पुन्हा एकदा इमारतीचा स्लॅब कोसळण्याची घटना घडली आहे. ढिगाऱ्याखाली दबून चार जणांचा मृत्यू झाला आहे.
Ulhasnagar Slab Collapse : उल्हासनगरात पुन्हा एकदा इमारतीचा स्लॅब कोसळण्याची घटना घडली आहे. ढिगाऱ्याखाली दबून चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर तीन जण जखमी झाले आहेत. उल्हासनगर (Ulhasnagar ) महापालिकेकडून ढिगारा उपसण्याचं काम सुरू आहे. सागर ओचानी (19 वय), रेणू धोलांदास धनवानी (55 वय), धोलानदास धनावनी (58 वय) आणि प्रिया धनवानी (24 वय) असे मृत झालेल्यांची नावे आहेत. मयत झालेल्यामध्ये एकाच परिवारातील तीन जणांचा समावेश आहे.
उल्हासनगरमध्ये पुन्हा एकदा एका इमारतीचा स्लॅब कोसळल्याची दुर्घटना घडली. कॅम्प पाचमध्ये घडलेल्या या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर 3 जण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर उल्हासनगर महापालिकेच्या अग्निशमन दलाकडून ढिगारा उपसण्याचं काम हाती घेण्यात आलं आहे. तसेच एनडीआरएफच्या (NDRF) टीमलाही पाचारण करण्यात आले आहे.
उल्हासनगरच्या कॅम्प पाचमधील ओटी सेक्शन भागात मानस टॉवर नावाची पाच मजली इमारत आहे. या इमारतीच्या तिसऱ्या मजल्याचा स्लॅब आज दुपारच्या सुमारास कोसळला आणि थेट तळमजल्यावर असलेल्या चक्कीवर येऊन कोसळला. या दुर्घटनेत इमारतीमधील काहीजण जण ढिगाऱ्याखाली दाबले गेले. यापैकी सहा जणांना बाहेर काढून रुग्णालयात नेण्यात आलं असता चार जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या तिघांवर उपचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. मानस टॉवर ही इमारत उल्हासनगर महापालिकेकडून धोकादायक घोषित करून संपूर्णपणे रिकामी करण्यात आली होती. मात्र तरीही या इमारतीत काहीजण लपून-छपून वास्तव्य करत होते.
दुपारी ही दुर्घटना घडल्यानंतर ढिगाऱ्याखाली अडकून चार जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर उल्हासनगर महापालिकेच्या अग्निशमन दलाकडून ढिगारा उपसण्याचं काम हाती घेण्यात आलं असून इमारतीत नेमके किती जण होते, हे निश्चित नसल्यामुळे ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकले असण्याची शक्यता व्यक्त होतेय. त्यामुळे उल्हासनगर महापालिकेने एनडीआरएफच्या टीमला सुद्धा पाचरण केल्याची माहिती उल्हासनगर महापालिका आयुक्त अजीज शेख यांनी दिली आहे.
उल्हासनगर महापालिकेने 2021 आणि 2022 या दोन्ही वर्षी सदर इमारत धोकादायक असून तिचे सर्वेक्षण करण्याचे पत्र दिले होते. मात्र तरी देखील रहिवासी या इमारतीत राहत होते. या घटनेने संपुर्ण उल्हासनगर शहरांत शोककळा पसरली आहे. त्यामुळे उल्हासनगर महापालिकेने एनडीआरएफच्या टीमला सुद्धा पाचरण केल्याची माहिती उल्हासनगर महापालिका आयुक्त अजीज शेख यांनी दिली आहे.