एक्स्प्लोर

Dhule : लष्कर भरतीचे स्वप्न अपुरं, 'अग्निवीर'च्या भरतीसाठी मुंबईत गेलेल्या धुळ्यातील तरूणाचा रेल्वेच्या धडकेने मृत्यू

रामेश्वर उर्फ बाळा हा मुंब्रा येतील रेल्वे प्लॅटफॉर्म उभा असताना भरधाव वेगाने येणाऱ्या रेल्वेच्या जबर धडकेत रामेश्वर याचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

 मुंबई : 'अग्निवीर'च्या ( Agniveer) भरतीसाठी मुंबईत (Mumbai)  जाणाऱ्या वडजाई येथील तरुणाला भरधाव वेगाने येणाऱ्या रेल्वेने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ही  घटना बुधवारी सकाळी 11 च्या सुमारास ठाणे येथील मुंब्रा रेल्वे स्थानकावर घडली आहे.

रामेश्वर भरत देवरे (वय 20, रा. वडजाई) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो वडजाई गावातील उपसरपंच संजय महाराज यांचा पुतण्या आहे.  बुधवारी पहाटे वडजाई, सौंदाणे बाबुळवाडी गावातील एकूण पंचवीस ते तीस मुलं भरतीसाठी मुंबई येथे गेले होते. रामेश्वर उर्फ बाळा हा मुंब्रा येतील रेल्वे प्लॅटफॉर्म उभा असताना भरधाव वेगाने येणाऱ्या रेल्वेच्या जबर धडकेत रामेश्वर याचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या 'अग्निवीर' सैन्य भरतीसाठी वडजाई येथील तरुण मंगळवारी रात्री चाळीसगाव व तेथून मुंबईला रेल्वेने गेले. बुधवारी सकाळी 10:30 वाजेच्या सुमारास हे सर्वजण कल्याण येथे पोहोचले. तेथून हे तरुण मुंब्रा येथे 'अग्निवीर'च्या भरतीसाठी जाणार होते. मात्र, रामेश्वर भरत देवरे याला मळमळ होऊ लागल्याने, तो उलटी करण्यासाठी रेल्वे रुळाकडे गेला. वाकून उलटी करीत असतानाच भरधाव वेगाने आलेल्या प्रवासी रेल्वेने त्याला जोरदार धडक दिली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. रामेश्वरचा अपघाती मृत्यू झाल्याने, मित्रही घाबरले होते.

रामेश्वर देवरे याचा कॉम्प्युटर डिप्लोमा झाला होता. रिकाम्या वेळेत तो वडिलांना शेतातील कामासाठी मदत करायचा. शेतात पिकवलेला भाजीपाला स्वतः विक्री करून तो आई-वडिलांना मदत करीत होता. नोकरीच्या अपेक्षेने दिवस-रात्र मेहनतही करीत होता. त्याच्या मेहनतीला फळ मिळेल, असे वडील सांगत असल्यामुळे त्याने सैन्यात जाण्याची तयारी केली होती. मात्र, देशसेवा करण्यापूर्वीच नियतीने त्याच्यावर झडप घातली. त्याच्या पश्चात आई-वडील, बहीण, भाऊ असा परिवार आहे. तो वडजाईचे उपसरपंच संजय महाराज देवरे यांचा पुतण्या होता.

संबंधित बातम्या :

कोल्हापूर : 'मी जात आहे, गुडबाय लाईफ' स्टेट्स अपडेट करून तरुणीचा निर्घृण खून; विष प्राशन केलेल्या तरुणाचाही मृत्यू

Crime News : धक्कादायक! आधी 15 मिनिटं तोंड पाण्यात बुडवलं, नंतर शिर धडावेगळं केलं, फिल्मी स्टाईलनं संपवलं सानियाचं जीवन

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
Palus Kadegaon Sabha Constituency : विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा
Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Shreya Yogesh Kadam Ratnagiri : 6 महिने मुलांपासून दूर; प्रचारादरम्यान योगेश कदमांच्या पत्नी भावूकMuddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझाSarfaraz Ahmed : ...तर मुस्लिम भाजप-शिवसेनेच्या बाजूने उभे राहतील :सरफराज अहमदAavdiche Khane Rajkiya Tane Bane : Nitesh Rane यांची स्फोटक मुलाखत; कुणावर डागली तोफ? #abpमाझा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
Palus Kadegaon Sabha Constituency : विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा
Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा
Sharad Pawar In Chandgad : नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत; फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर निवडून द्या; शरद पवारांची चंदगडकरांना साद
नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत; फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर निवडून द्या; शरद पवारांची चंदगडकरांना साद
राज ठाकरे आले, माईकवरुन थोडकंच काय ते सांगितलं अन् निघून गेले; जाहीर सभा ने घेता परत फिरले
राज ठाकरे आले, माईकवरुन थोडकंच काय ते सांगितलं अन् निघून गेले; जाहीर सभा ने घेता परत फिरले
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
Embed widget