Twitter : ट्विटर यूजर्ससाठी आनंदाची बातमी, ट्विटरचे Tiktok व्हर्जन लवकरच येणार
Twitter New Update :ट्विटर यूजर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. कंपनीने एका खास फीचर iOS बीटा व्हर्जनवर टेस्टिंगसाठी रिलीज केले आहे. अजूनही तीन फीचर्सवर काम सुरु आहे. हे नवीन आलेले फीचर टिकटॉकसारखे आहेत.
Twitter New Features : मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म म्हणून ओळख असणारे ट्विटर जगभर प्रसिद्ध आहे. ट्विटर वापरणाऱ्यांची संख्याही कोटींच्या संख्येत आहे आणि अजूनही ही संख्या वाढतेय. वाढत्या यूजर्सच्या संख्येने ट्विटरही वेळोवेळी अपडेट (Twitter Update) होत आलं आहे. यामध्ये अजूनही नवीन फीचर्सची (Twitter New Features)भर पडतेय. नुकतंच कंपनीने एक महत्वपूर्ण फीचर ट्विट टेकला (Tweet Take) iOS बीटा वर्जनसाठी रिलीज केले आहे. लवकरच हे अधिकृतरित्या लॉन्च केले जाणार आहे. यानंतर अॅन्ड्रॉईडसाठीसुद्धा लॉन्च करण्याचा कंपनीचा विचार आहे. या फीचरमध्ये नेमकं काय आहे ते जाणून घेऊयात.
नवीन फीचरमध्ये असतील हे ऑप्शन :
नवीन फीचर हे टिकटॉकसारखे (TikTok) आहे. या फीचरच्या माध्यमातून यूजर्सना 'Quote Tweet With Reaction'अशी सुविधा देण्यात येणार आहे. आतापर्यंत यूजर्सना एखाद्या ट्वीटला आपल्या कोटसह रिप्लाय करण्यासाठी कोट ट्वीट (Quote Tweet) यावर क्लिक करावे लागत होते. परंतु, आता यूजर्स त्याच कोटला रिप्लायमध्ये फोटो (Photo) किंवा व्हिडीओसह (Video) ट्वीट करू शकतील.
अॅन्ड्रॉईड यूजर्ससाठी सध्यातरी हे फीचर उपलब्ध नाही :
ट्विटरने या फीचरला सध्या iOS बीटा व्हर्जनवर लॉन्च केले आहे. काही दिवस इथे टेस्टिंग सुरु राहील त्यानंतर अधिकृतरित्या हे फीचर सर्व यूजर्ससाठी रिलीज केले जाईल. आयओएसवर ही प्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर अॅन्ड्रॉईडवरसुद्धा (Andoroid) हे फीचर लॉन्च केले जाईल. ट्वीट व्यतिरिक्त कंपनी सध्या iOS साठी आणखी तीन फीचर्सवर काम करतेय.
हे ही वाचा :
- iPhone : Apple कंपनी भारतातील प्लांट 12 जानेवारीपासून पुन्हा उघडणार
- Amazon Deal : आयपॅड खरेदी करायचाय? जाणून घ्या iPad Air ची वैशिष्ट्ये
- OnePlus 9RT Launch Date : लवकरच भारतात येतोय 'वनप्लस 9RT'; दमदार प्रोसेसरसह मिळतील 'हे' फीचर्स!
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
[yt]
[/yt]