6GB रॅम आणि तीन कॅमेऱ्यांसह 'हा' स्मार्टफोन भारतात लाँच, बजेटफ्रेंडली किंमतीसह जाणून घ्या भन्नाट फीचर्स
टेक्नो (Tecno) या स्वस्त स्मार्टफोन निर्माता कंपनीने भारतात एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे.
Tecno Smartphone : टेक्नो (Tecno) या स्वस्त स्मार्टफोन निर्माता कंपनीने भारतात एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. हा एक स्वस्त स्मार्टफोन Tecno Spark 8C आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हा स्मार्टफोन व्हर्चुअल रॅमसह येतो. म्हणजे या मोबाईलमध्ये 3 GB रॅम देण्यात आली आहे. याशिवाय यात फक्त 3 GB व्हर्चुअल रॅम देण्यात आली आहे. म्हणजे तुमच्याकडे 6 GB पर्यंत स्वस्त रॅमचा पर्याय आहे.
या मोबाईलमध्ये Octacore Unisock T606 चिपसेट देण्यात आला आहे. यामध्ये 64 GB इंटर्नल मेमरी आहे. त्याची इंटर्नल मेमरी मायक्रोएसडी कार्डद्वारे 256 जीबीपर्यंत वाढवता येते. हा स्मार्टफोन Google च्या Android 11 आधारित HiOS v7.6 वर काम करतो.
Tecno Spark 8C मध्ये 6.6 इंचाचा GI फुल एचडी डिस्प्ले आहे. त्याची स्क्रीन टू बॉडी रेशो 89.3 टक्के आहे. कॅमेर्याबद्दल बोलायचे झाले तर यात ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 13-मेगापिक्सलचा AI कॅमेरा आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यामध्ये 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. हा स्मार्टफोन डायमंड ग्रे, आयरिश पर्पल, मॅजेंट ब्लॅक आणि तुर्की निळसर रंगांमध्ये येतो.
सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 8-मेगापिक्सेल कॅमेरा आहे. हा फोन 4G नेटवर्क सपोर्टसह येतो. हा 5G फोन नाही. किंमतीबद्दल बोलायचे तर, हे 7499 रुपयांच्या प्रास्ताविक किंमतीत लॉन्च केले गेले आहे. याची माहिती कंपनीनेच दिली आहे. मात्र ही ऑफर किती दिवस चालेल याबाबत कंपनीने माहिती दिलेली नाही. 24 फेब्रुवारीपासून अॅमेझॉनवरून ऑनलाइन खरेदी करता येईल.
महत्वाच्या बातम्या :
- 'या' कंपनीकडून नवीन 5G स्मार्टफोन कायमचे बंद होणार, कंपनीने सांगितलं "प्लॅन डेड"!
- Instagram New Feature : Instagram यूजर्ससाठी खुशखबर, लवकरच येणार ट्विटरशी जोडणारे नवीन फीचर
- Twitter New Feature : ट्विटरने लॉन्च केले नवीन फीचर, सेल्फ आयडेंटिफाय करण्यास होईल मदत
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha