Instagram New Feature : Instagram यूजर्ससाठी खुशखबर, लवकरच येणार ट्विटरशी जोडणारे नवीन फीचर
Instagram Feature : इन्स्टाग्रामने आपल्या यूजर्ससाठी एक उत्तम फीचर जोडले आहे. हे नवीन फीचर इन्स्टाग्रामला ट्विटरशी जोडणारे आहे.
Instagram New Feature : फोटो शेअरिंग अॅप इन्स्टाग्राम (Instagram) नेहमीच आपल्या यूजर्ससाठी वेगवेगळे नवीन फीचर अपडेट करत असतात. यामुळेच इन्स्टाग्राम यूजर्सची संख्या दिवसागणिक वाढताना दिसतेय. आता कंपनीने आणखी एक नवीन फीचर लॉंच केलं आहे. अनेक दिवसांपासून इन्स्टाग्राम यूजर्स या फीचरची आतुरतेने वाट पाहत होते. हे फीचर एक प्रकारे इन्स्टाग्रामला ट्विटरशी (Twitter) जोडणारे आहे. हे फीचर नेमकं काय आहे. याचा वापर कसा करावा या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घ्या.
या फीचरचं वैशिष्ट्य काय आहे ?
रिपोर्टनुसार, या नवीन फीचर्सच्या माध्यमातून यूजर्सना आता ट्विटमध्ये पब्लिक अकाऊंटवरून ट्विटरवर इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करताना इमेज प्रिव्ह्यू दिसेल. हे तुमचा कंटेंट हायलाईट करेल. सोप्या भाषेत सांगायचं तर, तुम्ही तुमच्या ट्विट केलेल्या लिंकवर क्लिक केल्यावर काय उघडेल ते दाखवते. ज्यांचे खाते सार्वजनिक असेल तेच हे फीचर वापरू शकतील असे सांगण्यात आले आहे.
या फीचरची नेमकी गरज काय ?
कंपनीला Instagram चा कंटेंट सर्वत्र नेण्याची इच्छा आहे जेणेकरून अधिकाधिक लोकांना या प्लॅटफॉर्मवर प्रवेश मिळू शकेल. आजच्या काळात ट्विटर हे सोशल मीडिया क्षेत्रातील एक मोठे प्रभावी माध्यम आहे. अनेक इन्स्टाग्राम वापरकर्ते त्यांचा कंटेंट ट्विटरवर शेअर करतात, परंतु सध्या तो कंटेंट प्रिव्ह्यूमध्ये दिसत नाही. अशा वेळी, ट्विटरवर इन्स्टाग्राम कंटेंट शेअर करणार्या लोकांचा अनुभव सुधारणे हे Instagram चे मुख्य ध्येय आहे.
असे कार्य करेल :
समजा, तुम्ही ट्विटरवर इन्स्टाग्रामचा एखादा ट्विट करण्याचा विचार केला, तुम्ही मेसेज टाईप केला आहे आणि इन्स्टाग्रामवरून कंटेंटची लिंक शेअर करायची आहे, ती लिक शेअर करताच तुम्हाला थंबनेल सारखा प्रिव्ह्यू तयार झालेला दिसे. त्या लिंकवर क्लिक करताच तुम्ही इन्स्टाग्राम पेजवर पोहोचू शकाल. असे असले तरीही सध्या तुमच्या स्टोरीवर प्रिव्ह्यू दिसणार नाही.
महत्वाच्या बातम्या :
- Shark Tank India: 13 वर्षाच्या अनुष्काची कमाल, भन्नाट कल्पनेने उभारला 50 लाखांचा फंड
- Amazon Deal : केवळ 15 मिनिटांत संपूर्ण दिवस चार्ज देईल 'हा' स्मार्टफोन, जाणून घ्या याचे भन्नाट फीचर्स
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha