(Source: ECI/ABP News/ABP Majha)
दमदार फिचर्ससह Realme ची Narzo सीरीज लॉन्च होण्याची शक्यता
भारतात युजर्सच्या उत्तम प्रतिसादानंतर आता Realme आपल्या Narzo सीरीजमधील आणखी काही स्मार्टफोन्स भारतात लॉन्च करू शकते.
मुंबई : Realme ची Narzo सीरीजला भारतात युजर्सचा उत्तम प्रतिसाद मिळाला. हिच बाब लक्षात घेत कंपनी आता या सीरीजमधील आणखी काही स्मार्टफोन्स भारतात लॉन्च करू शकते. कंपनीने Narzo 10 आणि Narzo 10A याआधी हे स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. या स्मार्टफोन्सला भारतात युजर्सनी पसंती दिली होती.
हे स्मार्टफोन होऊ शकतात लॉन्च
मीडिया रिपोर्टनुसार, कंपनी आता Realme Narzo 20 आणि Realme Narzo 20 Pro लॉन्च करू शकते. दरम्यान, या स्मार्टफोन्स आणि त्यांच्या फिचर्सबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. परंतु, असं मानलं जात आहे की, कंपनी लवकरच या स्मार्टफोन्सची अनाउंसमेंट करू शकते.
दोन्ही फोन आहेत रिबॅज्ड
रियलमी 10 आणि 10A फोन दोन्ही रिबॅज्ड वर्जन आहेत. हे फोन इंडोनेशिया मार्केटमध्ये अवेलेबल रियलमी C3 चा ट्रिपल रियर कॅमेरा वर्जन आहे. याव्यतिरिक्त भारतात लॉन्च करण्यात आलेला 6i ही युरोपियन मार्केटमध्ये मिळणाऱ्या रियलमी 6S चं रिबॅज्ड वर्जन आहे.
रियलमी 10A चे स्पेसिफिकेशन्स
रियलमी 10A च्या 3GB + 32GB मॉडेलची किंमत 8,999 रुपये आहे. तसेच याच फोनच्या 4GB+ 64GB व्हेरियंटची किंमत 9,999 रुपये एवढी आहे. यामध्ये युजर्सला दोन कलर ऑप्शन ब्ल्यू आणि व्हाइट मिळणार आहेत. हा फोन अॅन्ड्राइड 10 वर काम करतो. रियलमी नार्जो 10A मध्ये 6.5 इंचांचा एचडी प्लस डिस्प्ले देण्यात आला आहे. याचं रिझॉल्यूशन 720x1,600 पिक्सल आहे. फोनमध्ये 4GB पर्यंतचा रॅम आणि 64GB पर्यंत स्टोरेज देण्यात आलं आहे. याचसोबत ऑक्टाकोर मीडियाटेक हेलियो G70 प्रोसेसर देण्यात आला आहे. या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.
Vivo U10 स्पर्धा
Realme Narzo च्या या स्मार्टफोन्सची स्पर्धा Vivo U10 शी होऊ शकते. यामध्ये 3 GB RAM+32 GB इंटरनल स्टोरेजची सुविधा देण्यात आली आहे. या व्हेरियंटची किंमत 8,990 रुपये आहे. या फोनमध्ये 6.35 इंचाचा HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी याच्या रियर कॅमेऱ्यामध्ये 13MP + 8MP + 2MP चा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. तर सेल्फीसाठी या फोनमध्ये 8MP चा फ्रंट कॅमेरा दिला आहे. परफॉर्मंससाठी या फोनमध्ये Qualcomm Snapdragon 665 AIE प्रोसेसर देण्यात आला आहे. खास गोष्ट म्हणजे, यामध्ये 18W फास्ट चार्जिंग सपोर्ट करणारी 5000 mAh बॅटरी देण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :