सोशल मीडियावर PUBG मोबाईलचा फेक ट्रेलर व्हायरल; समोर आली धक्कादायक माहिती
सोशल मीडियावर PUBG मोबाईल इंडियाचा एक ट्रेलर व्हायरल होत आहे. अशा प्रकारचा कोणताही ऑफिशिअल ट्रेलर लॉन्च करण्यात आला नसून व्हायरल होणारा हा ट्रेलर फेक असल्याचं कंपनीनं स्पष्ट केलंय.
![सोशल मीडियावर PUBG मोबाईलचा फेक ट्रेलर व्हायरल; समोर आली धक्कादायक माहिती PUBG Mobile India trailer went viral on social media know when the game will launch सोशल मीडियावर PUBG मोबाईलचा फेक ट्रेलर व्हायरल; समोर आली धक्कादायक माहिती](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/09/09141048/PUBG.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी दिल्ली: PUBG प्रेमींसाठी एक खुशखबर आहे. कॉर्पोरेट अफेअर्स मंत्रालयाने PUBG इंडियाची एका कंपनीच्या रुपात नोंद केली आहे. त्यामुळे PUBG ला आता भारतात पुनरागमन करणं शक्य आहे. त्याचवेळी सोशल मीडियावर PUBG मोबाईल इंडियाच्या नावे एक ट्रेलर व्हायरल होत आहे. परंतु संबंधित ट्रेलर हा PUBG तर्फे लॉन्च करण्यात आला नसून तो फेक असल्याचे कंपनीने स्पष्टीकरण दिलं आहे.
फेक ट्रेलर झाला व्हायरल
PUBG मोबाईल इंडियाच्या प्रकाशकांनी त्यांच्या वेबसाइटवर काही टीजर लॉन्च केले होते जे कंपनीच्या सोशल मीडिया चॅनेल्सवर उपलब्ध आहेत. परंतु या टीजरमध्ये PUBG मोबाईल इंडियाच्या लॉन्चिंग तारखेची अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. यासंबंधी माध्यमातून वेगवेगळे दावे करण्यात येत आहेत.
बेंगळुरुमध्ये रजिस्ट्रेशन
एका अहवालानुसार, PUBG मोबाईल इंडियाचे 21 नोव्हेंबर 2020 रोजी बेंगळुरुतील एका कंपनीच्या रुपात कॉर्पोरेट अफेअर्स मंत्रालयात रजिस्ट्रेशन करण्यात आलं आहे. कुमार कृष्णन अय्यर आणि ह्यूनिल सोहन हे PUBG इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक आहेत. PUBG च्या अधिकृत लॉन्चिंगच्या आधी कंपनीकडून रजिस्ट्रेशनची सर्व प्रक्रिया पार पाडली जात आहे.
असं करा रजिस्ट्रेशन
PUBG मोबाईल इंडिया खेळण्यापूर्वी Android आणि iOS च्या यूजर्सना TapTap गेम शेयर कम्युनिटीमध्ये प्री-रजिस्ट्रेशन करणं आवश्यक आहे. ही सुविधा केवळ कम्युनिटी मेबंर्सना उपलब्ध असेल. या खेळाचा आनंद घेण्यासाठी आतापर्यंत जवळपास तीन लाखांपेक्षा जास्त यूजर्सनी रजिस्ट्रेशन केलं आहे. सध्या TapTap स्टोअरची रेटिंग 9.8 आहे. परंतु PUBG गेम तयार करणाऱ्या कंपनीने याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही.
जुन्या आयडीवर काम चालेल
एका अहवालाच्या माहितीनुसार, PUBG मोबाईल इंडियाच्या यूजर्सना नवीन आयडी तयार करण्याची गरज नाही. त्यांना जुन्या आयडीचा वापर करता येऊ शकेल. PUBG चा इंडिया व्हर्जन हा ग्लोबल व्हर्जनपेक्षा थोडा वेगळा आणि अपडेटेड आहे. PUBG च्या युजर्सना व्हेरिफिकेशन करावं लागणार आहे. सुरक्षेच्या कारणास्तव कंपनीने हे पाऊल उचललं आहे.
पहा व्हिडिओ: Web Explainer | Airtel च्या मदतीने PUBG चा परतण्याचा प्रयत्न
महत्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)