भारतात 22 सप्टेंबरला Poco X3 होणार लॉन्च; Samsung Galaxy A51 सोबत टक्कर
पोको इंडियाने 22 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता Poco X3 लॉन्च होणार असल्याचं ट्वीट करत सांगितलं आहे. इतर पोको फोन मॉडलप्रमाणे Poco X3 देखील फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे.
मुंबई : भारतात 22 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता Poco X3 लॉन्च होणार आहे. याचा खुलासा ट्विटरवर करण्यात आला आहे. Poco X3 हा गेल्या आठवड्यात युरोपात लॉन्च झालेल्या पोको एक्स 3 एनएफसीचा थोडा ट्विस्टेड व्हेरियंट असल्याचं बोललं जात आहे.
दरम्यान, ट्वीटमध्ये फोनबाबत जास्त माहिती देण्यात आलेली नाही. फ्लिपकार्टच्या वतीने टीझर पेजमध्ये Poco X3 एनएफसी प्रमाणेच स्नॅपड्रायगन 732 जी SoC असल्याचं सांगण्यात आलं आहे. तसेच आतापर्यंत हे स्पष्ट झालं नाही की, Poco X3 साठी एखाद्या लॉन्च इव्हेंटचं आयोजन करण्यात येणार की, फक्त घोषणा होणार.
पोको इंडियाने ट्विटरवर शेअर केलं आहे की, 22 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता भारतात Poco X3 लॉन्च करण्यात येणार आहे. पोको इंडियाच्या वतीने शेअर करण्यात आलेल्या 10 सेकंदांच्या टीझर व्हिडीओमध्ये फोनची फ्रंट आणि बॅक साइड दिसत आहे. ज्यामध्ये सेल्फी कॅमेऱ्यासाठी एक क्वॉड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. इतर पोको फोन मॉडलप्रमाणे Poco X3 देखील फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे.
It's time to redefine #SmoothAF. Get ready for the #POCOX3. Arriving on 22nd September at 12 noon on @Flipkart. To know something that you don't, visit here: https://t.co/NSmwqs6yLY pic.twitter.com/lbeTQfpK9m
— POCO India #POCOX3 (@IndiaPOCO) September 16, 2020
Poco X3 specifications
Poco X3 एनएफसीच्या तुलनेत Poco X3 ची बॅटरी अधिक क्षमतेची असल्याचं बोललं जात आहे. हेदेखील सांगण्यात येत आहे की, 8 जीबी रॅम व्हेरियंटसोबत लॉन्च होऊ शकतो. जर इतर स्पेसिफिकेशन्स समान असले तर Poco X3 मध्ये 120Hz रिफ्रेश रेटसोबत 6.67-इंचाचा फुल-एचडी + डिस्प्ले असणार आहे. तसेच हा क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 732G SoC देण्यात येऊ शकतो.
फोनमध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप देण्यात येणार आहे, ज्यामध्ये 64-मेगापिक्सलचा सोनी IMX682 प्रायमरी सेंसर, 13-मेगापिक्सलचा 119-डिग्री वाइड-अॅगल सेंसर, 2-मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर आणि 2-मेगापिक्सल का मॅक्रो शूटरचा समावेश आहे. फ्रंट साइडला सेल्फीसाठी 20-मेगापिक्सलचा सेंसर असण्याची शक्यता आहे. तसेच फोन 33W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट करणार असून यामध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर आहे.
Samsung Galaxy A51 सोबत टक्कर
Poco X3ची थेट स्पर्धा सॅमसंच्या मिड रेंज स्मार्टफोन Samsung Galaxy A51 सोबत असणार आहे. यामध्ये 6.5 इंचाचा फुल एचडी प्लस एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. स्मार्टफोन कंपनीने आपल्या Exynos 9611 प्रोसेसरचा वापर केला आहे, जो Mali G72 GPU सोबत येणार आहे. स्मार्टफोनमध्ये कंपनीने 4000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. स्मार्टफोन कंपनीमध्ये फास्ट चार्जिंगची सुविधाही देण्यात आली आहे.
Galaxy A51 मध्ये सॅमसंगने क्वॉड कॅमेरा सेटअप दिला आहे. स्मार्टफोनचा प्रायमरी कॅमेरा 48 मेगापिक्सल आहे. जो 12 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड कॅमेरा फोनमध्ये वापरण्यात आला आहे. स्मार्टफोनमध्ये सेल्फी घेण्यासाठी 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. याचं अपग्रेडेट व्हेरियंट Galaxy A51 च्या 6GB+128GB व्हेरियंटची किंमत 23,998 रुपये आहे. तर 8GB+128GB व्हेरियंटची किंमत 25,998 रुपये आहे.
महत्त्वाच्या बातम्या :