एक्स्प्लोर
Apple Watch Series 6 | Apple वॉच सीरीज 6 लॉन्च; 'हे' आहेत खास फिचर्स
1/8

अॅपल वॉच 6 चा वापर करून ब्लड ऑक्सिजनबाबत फक्त 15 सेकंदात माहिती मिळते. कोरोना संसर्गात वॉचमध्ये देण्यात आलेलं ऑक्सिजन सेंसर युजर्ससाठी वरदान ठरणार आहे. सीरीज 5 च्या तुलनेत हे वॉच 15 टक्के फास्ट काम करणार आहे.
2/8

तुम्ही याचा वापर प्रखर उन्हातही करू शकणार आहात. हे वॉच राउंड डायलसोबत युजर्सना मिळणार आहे. दिसायला अॅपल वॉच सीरीज 5 प्रमाणेच अॅपल वॉच 6 आहे. या वॉचसाठी 6 रंगांच्या स्ट्रॅप्स उपलब्ध असणार आहेत.
3/8

यामार्फत डेली वर्कआऊटला ट्रॅक केलं जाऊ शकतं. या सर्व्हिसचा वापर करण्यासाठी काही पॅकेजेस आहेत. ज्यामध्ये मंथली $9.99 आणि एका वर्षासाठी $ 79.99 मोजावे लागणार आहेत. कस्टमर्सना 3 महिन्यांसाठी Apple Fitness+ सब्सक्रिप्शन फ्री मिळणार आहे.
4/8

अॅपल वॉच सीरीज 6 साठी नव्या Fitness+ सर्विसचाही समावेश करण्यात आला आहे. जी तुम्हाला फिटनेसबाबत सतर्क करणार आहे. यामार्फत यूजर्स वर्कआऊट सेशन्समध्ये सहभागी होऊ शकणार आहेत.
5/8

अॅपल वॉचमध्ये आणखी एक फिचर सहभागी करण्यात आलं आहे. ज्याचं नाव Memoji सपोर्ट आहे. म्हणजेच, यूजर्स iMessage app मार्फत Memoji एकमेकांना पाठवू शकतात. हे नवं अॅपल वॉच watchOS 7 ऑपरेटिंग सिस्टम वर आधारित असणार आहे.
6/8

अॅपल वॉच सीरीज 6 च्या या वॉचमध्ये A13 Bionic प्रोसेसर देण्यात आला आहे. सोलो लूप्स डिझाइन असणारं हे वॉच यूजर फ्रेंडली आहे आणि अगदी सहज मनगटावर फिट होतं.
7/8

भारतीय बाजारात अॅपल वॉच सीरीज 6 (GPS) व्हेरिएंटची किंमत 40,900 रुपये आणि (GPS+Cellular) मॉडल 49,900 रुपयांत मिळणार आहे. तसेच अमेरिकेत या वॉचच्या GPS मॉडलची किंमत $399 (जवळपास 30,000 रुपये) असणार आहे. शुक्रवारपासून हे वॉच विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे.
8/8

Apple ने आपल्या Time flies इव्हेंटमध्ये ब्लड ऑक्सिजन मॉनिटर फिचर असलेली नवी अॅपल वॉच सीरीज 6 लॉन्च केली आहे. या वॉचमधील खास फिचरम्हणजे, यात देण्यात आलेलं ह्यूमन ब्लड ऑक्सीजन लेवल ट्रॅक फिचर.
Published at :
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
पुणे
भारत
महाराष्ट्र























