OnePlus Watch | येत्या 21 एप्रिलपासून भारतात OnePlus Watch ची विक्री सुरू, जाणून घ्या किंमत आणि सर्वकाही...
OnePlus Watch भारतात गेल्या महिन्यात लॉन्च करण्यात आले होते. येत्या 21 फेब्रुवारीपासून भारतात त्याची विक्री सुरू होणार आहे.
OnePlus Watch : मोबाईल हॅन्डसेट निर्माती कंपनी वनप्लसने गेल्या महिन्यात भारतीय ग्राहकांसाठी आपले पहिले OnePlus Smartwatch लॉन्च केलं होतं. OnePlus ने आपल्या वियरेबल सेगमेन्टचा विस्तार करताना आता OnePlus Watch ला बाजारात आणलं आहे. येत्या 21 एप्रिलपासून भारतीय बाजारपेठेत OnePlus Watch ची विक्री सुरू होणार आहे.
OnePlus Watch ची किंमत किती आहे?
भारतात OnePlus Smartwatch ला 16,999 रुपयांच्या किंमतीला लॉन्च करण्याचं ठरवलं आहे. पण भारतीय ग्राहक या वॉचला 14,999 रुपयांना खरेदी करता येईल. भारतात OnePlus Smartwatch ची विक्री सुरुवातीला रेड केबल क्लब मेम्बर्ससाठी होईल. त्यासाठीची विक्री onePlus.in आणि OnePlus स्टोअर अॅपच्या माध्यमातून 21 एप्रिलला सकाळी नऊ वाजल्यापासून सुरू होईल.
ग्राहक OnePlus Smartwatch ब्लॅक आणि मूनलाईट सिल्वर रंगात 14,999 रुपयांच्या विशेष किंमतीत खरेदी करू शकतील. तसेच नॉन मेम्बर्ससाठी OnePlus Smartwatch ची विक्री 22 एप्रिल 2021 पासून ऑफलाईन पद्धतीने सुरू होणार आहे. कंपनीच्या वेबसाईट व्यतिरिक्त Amazon, Flipkart तसेच पार्टनर आऊटलेट वरही खरेदी करता येणार आहे.
काय आहे विशेष?
OnePlus Smartwatch मध्ये 1.39 इंचाची एचडी एमोलेड (454x454 पिक्सेल) डिस्प्ले आहे आणि हे 2.5D ग्लासलेस आहे. याची पिक्सेल डेन्सिटी 326 पिक्सेल प्रति इंच आहे. वनप्लस वॉच मध्ये 402mAh ची बॅटरी आहे. ही बॅटरी 20 मिनीटात फुल चार्ज होते. याच्या सिंगल चार्जनंतर किमान पाच दिवस याचा उपयोग करता येऊ शकेल असा दावा कंपनीने केला आहे. यामध्ये 4GB ची सुविधाही उपलब्ध आहे.
OnePlus Smartwatch मध्ये जीपीएस कनेक्टिव्हिटी सोबतच अनेक फिचर्स उपलब्ध आहेत. तसेच हे वॉच वॉटर रिझिस्टन्स आहे. यामध्ये 100 पेक्षा जास्त स्पोर्ट्स मोड ची सोय आहे. तसेच 50 फेस वॉचदेखील आहेत.
महत्वाच्या बातम्या :