KKR Vs MI, Innings Highlights : मुंबईनं साजरा केला पहिला विजय, कोलकातावर 10 धावांनी मात
मुंबईकडून सूर्यकुमार यादवने 36 चेडूंत सर्वाधिक 56 धावा केल्या, त्यात दोन षटकार आणि 7 चौकारांचा समावेश होता. रोहित शर्माने 32 चेंडूत 43 धावा केल्या, त्यात तीन चौकार आणि एक षटकार होता
KKR vs MI : मुंबईने कोलकातावर 10 धावांनी मात करत मोसमातील पहिला विजय साजरा केला. 153 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या कोलकाताच्या संघाला 142 धावांपर्यंत मजल मारता आली.
मुंबईकडून सूर्यकुमार यादवने 36 चेडूंत सर्वाधिक 56 धावा केल्या, त्यात दोन षटकार आणि 7 चौकारांचा समावेश होता. रोहित शर्माने 32 चेंडूत 43 धावा केल्या, त्यात तीन चौकार आणि एक षटकार होता. तर हार्दिक पांड्या आणि क्रुणाल पांड्याने प्रत्येकी 15 धावा केल्या. मुंबईच्या इतर खेळाडूंना दोन अंकी धावसंख्याही गाठता आली नाही.
त्याआधी चांगली सुरुवात केलेल्या मुबंईला 15 व्या ओव्हरनंतर गळती लागली. कोलकाताच्या आंद्रे रसेलच्या गोलंदाजीपुढे मुंबई इंडियन्सचे फलंदाजांनी लोटांगण घाटलं. आंद्रे रसेलने 18व्या षटकात स्पेल सुरु केला आणि खऱ्या अर्थाने कोलकातासाठी तो टर्निंग पॉईंट ठरला. रसेलने कायरन पोलार्ड, मार्को जानसेन, कृणाल पंड्या, जसप्रीत बुमराह आणि राहुल चहर यांना बाद केलं. रसेलने दोन षटकात 15 धावा देत 5 विकेट घेतल्या घेतले.
आंद्रे रसेल मुंबईविरुद्ध विकेट घेणारा दुसरा गोलंदाज ठरला आहे. या अगोदर आयपीएलच्या याच हंगामात बंगळूरुच्या हर्षल पटेलने पाच विकेट घेतल्या होत्या. रसेलने आयपीएलच्या करिअरमध्ये पहिल्यांदाच पाच विकेट घेतल्या आहेत.