Break The Chain : राज्यात आज रात्री 8 पासून कलम 144 लागू; काय सुरु, काय बंद?
राज्यातील कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होत चालली आहे. याच पार्श्वूभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात 15 दिवस कडक निर्बंध लागू करण्याची घोषणा केली आहे. आज रात्री 8 वाजल्यापासून राज्यात कलम 144 लागू करण्यात आलं आहे.
मुंबई : महाराष्ट्रात कोरोना बाधितांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत असून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतानाच दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर कोरोनाची साखळी तोडण्यासाठी मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यांत 15 दिवसांसाठी संचार बंदीची घोषणा केली. बुधवारी म्हणजेच, आज रात्री 8 वाजल्यापासून राज्यात 144 कलम लागू करण्यात येणार असून पुढिल 15 दिवसांसाठी राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. याला 'ब्रेक द चेन' असं नाव देण्यात आलं आहे. मंगळवारी रात्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे राज्यातील जनतेशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी राज्यातील आज रात्री 8 वाजल्यापासून कडक निर्बंध लागू करण्यात येणार असल्याची घोषणा केली.
संचारबंदीच्या काळात आवश्यक सेवा वगळून इतर सेवा बंद राहतील. सकाळी 7 ते रात्री 8 या वेळेत अत्यावश्यक सेवा सुरु राहतील. लोकल, बस अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठी सुरु राहतील. जनावरांचे दवाखाने सुरु राहतील. पावसाळ्या पूर्वीची कामं सर्व सुरु राहतील. हॉटेल्स, रेस्टॉरंट टेक अवे सुरुच राहणार, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
ब्रेक द चैन! काय आहेत निर्बंध?
- आज सायंकाळी 8 वाजल्यापासून निर्बंध लागणार आहे.
- मंगळवेढा-पंढरपूरमध्ये मतदान झाल्यावर निर्बंध लागतील.
- उद्या संध्याकाळपासून राज्यात 144 कलम चालू.
- पुढचे 15 दिवस संचारबंदी.
- अनावश्यक बाहेर फिरणं टाळणे.
- घराबाहेर विनाकारण बाहेर पडू नये.
- आवश्यक सेवा वगळून इतर सेवा बंद राहतील.
- सकाळी 7 ते रात्री 8 अत्यावश्यक सेवा सुरु राहतील.
- लोकल, बस अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठी सुरु राहतील.
- जनावराचे रुग्णालय सुरु राहतील.
- पावसाळी पूर्व कामं सर्व सुरु राहतील.
- अधिस्विकृती पत्रकारांना मुभा राहील.
- हॉटेल्स, रेस्टॉरंट टेक अवे सुरुच राहतील.
- रस्त्यावरच्या ठेले वाल्यांनाही टेक अवेची घोषणा.
काय बंद राहणार?
- प्रार्थना स्थळं, शाळा आणि कॉलेज, खाजगी कोचिंग क्लासेस, सलून, स्पा आणि ब्युटी पार्लर आजपासून 1 मे रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत बंद
- रेस्टॉरंट्समध्ये बसून खाता येणार नाही.
- अत्यावश्यक सेवा वगळता इतर कार्यालयं बंद
- कामाशिवाय फिरण्यास बंदी
- सर्व सार्वजनिक ठिकाणं बंद
- धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक सभांवर बंदी
सर्व दुर्बल घटकांना दिलासा
आर्थिक दुर्बल घटकांमधील दारिद्रय रेषेखालील कुटुंबे, महिला, वयोवृध्द नागरीक, विधवा, दिव्यांग, असंघटित क्षेत्रातील नागरिक, कामगार, रिक्षाचालक व आदिवासी समाज यांना विचारात घेवून आर्थिक सहाय देण्यात येणार आहे. यासाठी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, उद्योग-ऊर्जा व कामगार विभाग, नगर विकास विभाग आणि आदिवासी विकास विभाग यांच्या माध्यमातून लाभार्थ्यांना अर्थसहाय देण्यात येणार आहे.
एक महिना मोफत अन्नधान्य
अन्न सुरक्षा योजना लाभार्थी मोफत अन्नधान्य योजनेतून राज्यातील सुमारे सात कोटी लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती 3 किलो गहू, 2 किलो तांदूळ याप्रमाणे एक महिना मोफत अन्नधान्य देण्यात येईल.
शिवभोजन थाळी मोफत
राज्यात शिवभोजन योजनेतून गरजूंना एक महिना शिवभोजन थाळी मोफत देण्यात येतील. सुमारे दोन लाख थाळ्या देण्याचे नियोजन आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :