एक्स्प्लोर

Ambedkar Jayanti | डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 130 वी जयंती; कुठे रक्तदान तर कुठे भाकरीवर रांगोळी साकारुन अभिवादन

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची आज 130 वी जयंती आहे. कोरोनामुळे यंदाही गर्दी न करता घरातूनच अभिवादन करण्याचं आवाहन सरकारने केलं आहे. मात्र राज्यातील रक्ताचा तुटवडा पाहता कुठे रक्तदान तर कुठे भाकरीवर रांगोळी साकारुन बाबासाहेबांना अभिवादन केलं जात आहे.

मुंबई : भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची आज 130 वी जयंती आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने यंदाही गर्दी न करता घरातूनच बाबासाहेबांना अभिवादन करावं अस आवाहन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. दरवर्षी मुंबईतील दादरच्या चैत्यभूमी परिसरात आंबेडकरी जनतेची गर्दी होत असते. यंदा मात्र अनुयायांनी चैत्यभूमीवर न येता घरातूनच जयंती साजरी करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. त्यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा चैत्यभूमी परिसरात लावण्यात आला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी सकाळी 10.55 वाजता बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर जाणार आहेत. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही महामानवाला अभिवादनासाठी चैत्यभूमीवर जातील.

आंबेडकर जंयतीदिनी बाबासाहेब यांच्या चैत्यभूमी इथल्या स्मारकस्थळावरुन थेट प्रक्षेपणाद्वारे दर्शन घेण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसंच बीआयटी चाळ आणि इंदूमिल या ठिकाणच्या कार्यक्रमांचं प्रक्षेपण सोशल मीडियाद्वारे केल जाणार आहे.

मुख्यमंत्र्यांचं आंबेडकरी जनतेला आवाहन 
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 130 वी जयंती उत्साहात आणि प्रथा परंपरेनुसार पूर्ण सन्मानाने साजरा केली जावी. मात्र कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दी न करता, घरातूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं जावं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती हा उत्सव आणि आनंदाचा क्षण आहे. डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचा सन्मान म्हणून या दिवशी शिस्तीचे पालन केलं जाईल, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

रक्तदान करुन काँग्रेसचं बाबासाहेबांना अभिवादन
आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. मात्र जगावर आणि राज्यावर आलेल्या कोविडचं संकट पाहता महाराष्ट्र काँग्रेसने रक्तदान करुन बाबासाहेबांना अभिवादन करण्याचा निर्णय घेतला आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज काँग्रेसतर्फे चेंबूरमध्ये राज्यव्यापी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलं आहे. राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे आणि महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते या रक्तदान शिबिराचे उद्घाटन पार पडणार आहे. त्यानंतर देशातील आणि राज्यातील काँग्रेस नेते व्हर्च्युअल अभिवादन सभा घेणार आहेत. याचे थेट प्रक्षेपण समाज माध्यमातून केले जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र काँग्रेसचे कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे यांनी दिली आहे.

परभणीत साधेपणाने आंबेडकर जयंती साजरी होणार
परभणीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साधेपणाने साजरी होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मिरवणूक न काढण्याचा निर्णय एकमताने घेतला असून कॉलन्यांमध्येच कोरोनाविषयक नियमांचं पालन करुन जयंती साजरी होणार आहे. पोलीस अधिकारी आणि दलित नेते, जयंती अध्यक्षांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 

भाकरीवर बाबासाहेबांची रांगोळी
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर चांदवड इथले कला शिक्षक देव हिरे यांनी आगळीवेगळी आजपर्यंत कुठेही न साकारलेली अशी बाजरीच्या भाकरीवर रांगोळी साकारली आहे. माणूस म्हणून नाकारलं गेलेल्या उपेक्षित घटकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं अनमोल कार्य बाबासाहेबांनी केलं. "आपु खाते त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही हाय रे" या प्रसिध्द गीताचे शब्द बाबासाहेबांप्रति कृतज्ञता व्यक्त करतात. याच गीताच्या आधारावर देव हिरे यांनी आठ इंच व्यासाच्या भाकरीवर सहा इंच व्यासाची पोर्ट्रेट रांगोळी साकारत त्यावर बाबासाहेबांची सही काढली आहे. आजपर्यंत अशी कलाकृती कोणी साकारलेली नाही. कला शिक्षक देव हिरे यांनी ही आगळी-वेगळी कलाकृती साकारत महामानवाला अनोखं अभिवादन केलं. मागील वर्षी त्यांनी पाण्यात बाबासाहेबांची रांगोळी साकारली होती.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Team India : बीसीसीआयकडून 'चॅम्पियन' टीम इंडियाला आयसीसीच्या बक्षीसाच्या तीनपट खजिना! रोहितपासून गंभीरपर्यंत, कोणाला किती कोटी मिळणार?
बीसीसीआयकडून 'चॅम्पियन' टीम इंडियाला आयसीसीच्या बक्षीसाच्या तीनपट खजिना! रोहितपासून गंभीरपर्यंत, कोणाला किती कोटी मिळणार?
बीडमध्ये चाललंय काय, महिलेनं पोलीस ठाण्यासमोर अंगावर ओतून घेतलं डिझेल; सुदैवाने दुर्घटना टळली
बीडमध्ये चाललंय काय, महिलेनं पोलीस ठाण्यासमोर अंगावर ओतून घेतलं डिझेल; सुदैवाने दुर्घटना टळली
Balasaheb Thorat on Disha Salian Case : दिशा सालियन प्रकरणात माजी मंत्र्यांचं मोठं वक्तव्य; बाळासाहेब थोरात स्पष्टच बोलले, 10 वर्षाचं सगळंच काढलं
दिशा सालियन प्रकरणात माजी मंत्र्यांचं मोठं वक्तव्य; बाळासाहेब थोरात स्पष्टच बोलले, 10 वर्षाचं सगळंच काढलं
Meerut Case : हॅलो साहिल, सौरभ झोपलाय लवकर घरी ये; दोघांनी हात, शीर धडावेगळं केलं अन् बायको बाॅयफ्रेंडच्या घरी घेऊन गेली
हॅलो साहिल, सौरभ झोपलाय लवकर घरी ये; दोघांनी हात, शीर धडावेगळं केलं अन् बायको बाॅयफ्रेंडच्या घरी घेऊन गेली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Yuzvendra Chahal + Dhanashree Verma : चहल आणि धनश्री मुंबईतील कोर्टात दाखल | FULL VIDEOChitra Wagh Angry Speech : ओ परब! तुमच्यासारखे 56 पायाला बांधून फिरते मी, चित्रा वाघांचा रुद्रावतारABP Majha Marathi News Headlines 3 PM TOP Headlines 3PM 20 March 2025 दुपारी ३ च्या हेडलाईन्सSanjay Gaikwad on Disha Salian case | पुरावे नसल्यानेच आदित्य ठाकरेंना क्लीनचीट देण्यात आली- गायकवाड

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India : बीसीसीआयकडून 'चॅम्पियन' टीम इंडियाला आयसीसीच्या बक्षीसाच्या तीनपट खजिना! रोहितपासून गंभीरपर्यंत, कोणाला किती कोटी मिळणार?
बीसीसीआयकडून 'चॅम्पियन' टीम इंडियाला आयसीसीच्या बक्षीसाच्या तीनपट खजिना! रोहितपासून गंभीरपर्यंत, कोणाला किती कोटी मिळणार?
बीडमध्ये चाललंय काय, महिलेनं पोलीस ठाण्यासमोर अंगावर ओतून घेतलं डिझेल; सुदैवाने दुर्घटना टळली
बीडमध्ये चाललंय काय, महिलेनं पोलीस ठाण्यासमोर अंगावर ओतून घेतलं डिझेल; सुदैवाने दुर्घटना टळली
Balasaheb Thorat on Disha Salian Case : दिशा सालियन प्रकरणात माजी मंत्र्यांचं मोठं वक्तव्य; बाळासाहेब थोरात स्पष्टच बोलले, 10 वर्षाचं सगळंच काढलं
दिशा सालियन प्रकरणात माजी मंत्र्यांचं मोठं वक्तव्य; बाळासाहेब थोरात स्पष्टच बोलले, 10 वर्षाचं सगळंच काढलं
Meerut Case : हॅलो साहिल, सौरभ झोपलाय लवकर घरी ये; दोघांनी हात, शीर धडावेगळं केलं अन् बायको बाॅयफ्रेंडच्या घरी घेऊन गेली
हॅलो साहिल, सौरभ झोपलाय लवकर घरी ये; दोघांनी हात, शीर धडावेगळं केलं अन् बायको बाॅयफ्रेंडच्या घरी घेऊन गेली
Disha Salian & Aaditya Thackeray: ...तर उद्धव ठाकरे अन् आदित्य ठाकरे देश सोडून... रामदास कदमांचं मोठं वक्तव्य
शिवसेनाप्रमुखांच्या नातवावर बलात्काराचा आरोप होणे गंभीर गोष्ट, लाज असती तर उद्धव-आदित्य ठाकरेंनी आतापर्यंत देश सोडला असता: रामदास कदम
Video: ओ अनिल परब, तुमच्यात हिंमत आहे का, तुमच्यासारखे 56 पायाला बांधून फिरते मी, चित्रा वाघ यांचा सभागृहात रुद्रावतार
Video: ओ अनिल परब, तुमच्यात हिंमत आहे का, तुमच्यासारखे 56 पायाला बांधून फिरते मी, चित्रा वाघ यांचा सभागृहात रुद्रावतार
Chhattisgarh Naxal Encounter : बस्तरमध्ये दोन चकमकीत 24 नक्षलींचा खात्मा; विजापूरमध्ये 20, कांकेर चकमकीत 4 मृतदेह आणि शस्त्रे जप्त, एक जवान शहीद
बस्तरमध्ये दोन चकमकीत 24 नक्षलींचा खात्मा; विजापूरमध्ये 20, कांकेर चकमकीत 4 मृतदेह आणि शस्त्रे जप्त, एक जवान शहीद
Disha Salian Case : तीन वर्षापूर्वी 'त्या' पत्रकार परिषदेत दिशा सालियनचे आई-वडील ओक्साबोक्सी रडत काय म्हणाले होते?
तीन वर्षापूर्वी 'त्या' पत्रकार परिषदेत दिशा सालियनचे आई-वडील ओक्साबोक्सी रडत काय म्हणाले होते?
Embed widget