(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Honda Motorcycle and Scooter India : EV सेगमेंटमध्ये 'होंडा' कंपनीची एन्ट्री
दुचाकी उत्पादनातील अग्रगण्य कंपनी होंडा मोटारसायकल आणि स्कूटर इंडिया लवकरच पहिलं इलेक्ट्रिक वाहन लाँच करण्याच्या तयारीत आहे.
Honda Motorcycle and Scooter India : पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीला पर्याय म्हणून इलेक्ट्रिक वाहनांची मागणी सध्या वाढते आहे. हीच मागणी लक्षात घेता दुचाकी उत्पादनातील अग्रगण्य कंपनी होंडा मोटारसायकल आणि स्कूटर इंडिया (एचएमएसआई) (Honda Motorcycle and Scooter India) लवकर आपलं पहिलं इलेक्ट्रिक वाहन अर्थात EV लाँच करण्याच्या तयारीत आहे.
ही कंपनी देशात अॅक्टिव्हा आणि शाइनसारख्या लोकप्रिय ब्रँडची विक्री करते. यावर्षी सणांचा हंगाम संपल्यानंतर कंपनी इलेक्ट्रिक स्कूटरच्या व्यवहार्यतेबाबत आपल्या डीलर भागीदाराशी चर्चा सुरू करेल अशी माहिती एचएमएसआयचे अध्यक्ष, एमडी आणि सीईओ अत्सुशी ओगाटा यांनी दिली आहे.
पुढील आर्थिक वर्षात इलेक्ट्रिक वाहन बाजारात ?
एचएमएसआयने जपानची मूळ कंपनी होंडा मोटर कंपनीशी सल्लामसलत केल्यानंतर या विभागात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. "याबाबत अंतिम धोरण निश्चित झालेले नाही, परंतु पुढील आर्थिक वर्षात आम्ही इलेक्ट्रिक वाहने लॉन्च करण्यासाठी वचनबद्ध आहोत." असं देखील अत्सुशी ओगाटा यांनी म्हटलं आहे.
In Pics : स्वस्त आणि ज्यादा मायलेज देणाऱ्या बाईक्स
देशी तसेच विदेशी कंपन्या EV मध्ये गुंतवणूक करत आहेत
कंपनीने आपल्या इलेक्ट्रिक वाहनाची भारतात चाचणी सुरू केली आहे का, असे विचारले असता ओगाटा म्हणाले की, " अद्याप याला मूर्त रुप आले नसले तरी दिवाळीनंतर आम्ही आमच्या डीलर्ससोबत त्याच्या व्यवहार्यते अभ्यास करून योग्य तो ठराव करु”. ओगाटांच्या म्हणण्यानुसार भारत सरकार हरित पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणुकीला पाठिंबा देत आहे. अशा परिस्थितीत अनेक देशी तसेच परदेशी कंपन्या या क्षेत्रात गुंतवणूक करत आहेत.
कमी अंतरासाठी ईव्हीचा वापर
लोकांनी कमी अंतराच्या प्रवासासाठी EVs वापरण्यास सुरुवात केली आहे. परंतु लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी आणि ग्रामीण भागासाठी सध्या आंतरिक दहन (Internal combustion) इंजिन असलेल्या दुचाकींची मागणी असल्याचा कंपनीचा दावा आहे.