(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Force Gurkha Launch Update : प्रतीक्षा संपणार! दमदार फिचर्ससह लवकरच लॉन्च होणार Force Gurkha SUV
नव्या Force Gurkha SUV मध्ये टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम, ब्लॅक डॅशबोर्ड, सर्कूलर AC वेंट्स, फ्रंट पावर विंडो आणि थ्री स्पोक स्टीयरिंग व्हील यांसारखे फिचर्स देण्यात आले आहेत.
Force Gurkha Launch Update : फोर्स मोटर्सची ऑफ रोडिंग SUV Gurkha ची अनेकजण आतुरतेनं वाट पाहत आहेत. कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे या गाडीच्या लॉन्चिंगला फार उशीर झाला आहे. आता ही एसयूव्ही लवकरच बाजारात दिसणार आहे. असं सांगितलं जात आहे की, कंपनी ही गाडी पुढच्या महिन्यात लॉन्च करु शकते. दरम्यान, कंपनीने अद्याप गाडीच्या लॉन्चिंगची अधिकृत तारिख जाहीर केलेली नाही. ही एसयूव्ही अनेक बदलांसह मार्केटमध्ये लॉन्च केली जाऊ शकते.
या बदलांची अपेक्षा
नव्या गुरखाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. ज्यामध्ये नव्या हेडलाईट्ससह सर्क्यूलर डे टाईम रनिंग लाइट्ससोबत सिंगल स्लॉट ग्रिलमध्ये कंपनीचा मोठा लोगो पाहायला मिळेल. याव्यतिरिक्त यामध्ये नवे फॉग लॅम्प्स, व्हील क्लॅडिंग आणि ब्लॅक आउट साईज रियर व्यू मिरर आणि रुफ कॅरियर यांसारखे बदल पाहायला मिळतील. याव्यतिरिक्त केबिनबाबत बोलायचे झाले तर यामध्ये नवा टचस्क्रिन इंफोटेनमेंच सिस्टम, ब्लॅख डॅशबोर्ड, सर्क्यूलर AC वेंट्स, फ्रंट पॉवर विंडो आणि थ्री स्पोक स्टीअरिंग व्हिल यांसारखे फिचर्स पाहायला मिळतील. या बदलांसह ही गाडी आणखी दमदार दिसून येईल.
इंजिन
सेकेंड जनरेशन गुरखामध्ये BS6 मानकासह 2.6 लिटरचं डीझेल इंजिन मिळेल. जे 90bhp ची पॉवर जनरेट करतं. हे इंजिन 5 स्पीड मॅन्युअल गियरबॉक्सही देण्यात येईल. त्यासोबतच यामध्ये फोर व्हील ड्राईव्ह (4x4)ची सुविधाही मिळेल. या गाडीमध्ये डबल हायड्रोलिक स्प्रिंग क्वॉइल सस्पेंशन आणि 17 इंचाचे ट्यूबलेस टायर्स मिळतील. भारतात ही गाडी कधी लॉन्च करण्यात येईल, याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.
Mahindra Thar सोबत होणार स्पर्धा
2021 Force Gurkha ची स्पर्धा Mahindra Thar सोबत होईल. महिंद्रा थार पेट्रोल आणि डिझेल इंजिनच्या ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये एक नवं 2.2-लिटर टर्बोचार्ज्ड इंजिनही देण्यात आलं आहे. जे 130PSच्या पावर कॉइल ओव्हर डम्पर आणि स्टेबिलायझर बार संस्पेंशन देण्यात आलं आहे. तर याच्या फ्रंटमध्ये सॉलिड रियल एक्सेल सस्पेंशन आणि स्टेबिलायझर बार देण्यात आला आहे. ज्या मदतीनं थार खराब रस्तेही अगदी सहज पार करते. महिंद्रा थारची एक्स-शो रुम किंमत 12.12 लाख रुपयांपासून 14.17 लाख रुपयांपर्यंत जाते.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Gozero Skellig Liteची दमदार इलेक्ट्रिक सायकल भारतात लॉन्च; केवळ 2999 रुपयांत करा प्री-बूक
- Best CNG Cars : नवी गाडी घ्यायचीये पण, वाढत्या पेट्रोल-डिझेलच्या किमतींनी हैराण? CNG कार ठरतील उत्तम पर्याय
- Ola Electric Scooter : ओला इलेक्ट्रिक स्कूटर ठरली 'मोस्ट प्री-बुक्ड स्कूटर'; 24 तासांत 1 लाख ग्राहकांकडून बुकिंग