![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Ola Electric Scooter : ओला इलेक्ट्रिक स्कूटर ठरली 'मोस्ट प्री-बुक्ड स्कूटर'; 24 तासांत 1 लाख ग्राहकांकडून बुकिंग
Ola Electric Scooter : ओलाच्या इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च होण्यापूर्वीपासूनच चर्चेत आली आहे. ओला ई-स्कूटर प्री लॉन्च बुकिंग सुरु झाल्यानंतर 24 तासांतच 1 लाख बुकिंगचा टप्पा गाठला आहे.
![Ola Electric Scooter : ओला इलेक्ट्रिक स्कूटर ठरली 'मोस्ट प्री-बुक्ड स्कूटर'; 24 तासांत 1 लाख ग्राहकांकडून बुकिंग Ola Electric Scooter ola electric scooter gets a record 1 lakh bookings in 24 hours Ola Electric Scooter : ओला इलेक्ट्रिक स्कूटर ठरली 'मोस्ट प्री-बुक्ड स्कूटर'; 24 तासांत 1 लाख ग्राहकांकडून बुकिंग](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/07/18/2ac72c210ea3fcfadeda8edb388d416a_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Ola Electric Scooter : ओला इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च होण्यापूर्वीपासूनच चर्चेत आहे आणि यामुळे ग्राहकांना जबरदस्त रिस्पॉन्स मिळत आहे. ओला इलेक्ट्रिकचे सीईओ भाविश अग्रवाल यांनी शनिवारी सांगितलं की, ओला ई-स्कूटर प्री लॉन्च बुकिंग सुरु झाल्यानंतर 24 तासांतच 1 लाख बुकिंग मिळाल्या आहेत. ज्यामुळे ही जगातील 'मोस्ट प्री बुक्ड स्कूटर' बनली आहे.
ओला इलेक्ट्रिकनं 15 जुलै रोजी आपल्या अधिकृत वेबसाईटवर 499 रुपयांच्या टोकनवर बुकिंग सुरु करण्याची घोषणा केली होती. भाविश अग्रवालने आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं होतं की, "भारताची इलेक्ट्रिक व्हेइकल क्रांतीची ही सुरुवात. 100,000+ लोकांचे आभार जे आमच्यासोबत जोडले गेले आणि आपली स्कूटर बुक केली."
ग्राहकांच्या प्राधान्यामध्ये बदलाचे संकते
भाविश अग्रवालने एका स्टेटमेंटमध्ये म्हटलं की, "मी या पहिल्या इलेक्ट्रिक व्हेइकलला संपूर्ण भारतात मिळालेल्या रिस्पॉन्समुळे रोमांचित आहे. अभूतपूर्व मागणी, ग्राहकांचं प्राधान्य इलेक्ट्रिक व्हेइकलमध्ये शिफ्ट होण्याचे स्पष्ट संकेत आहेत." अग्रवाल यांनी म्हटलं की, "जगाला सस्टेनेबल मोबिलिटीमध्ये बदलणं आमच्या मिशनमधील मोठं पाऊल आहे. मी त्या सर्व ग्राहकांचे आभार मानतो. ज्यांनी ओला स्कूटर बुक केली आहे आणि ईवी क्रांतीमध्ये सहभागी झाले आहेत. ही केवळ सुरुवात आहे."
या महिन्याच्या शेवटी स्कूटर ग्राहकांना मिळण्याची शक्यता
नवी ओला इलेक्ट्रिक स्कूटर या महिन्याच्या शेवटापर्यंत देशात विक्रिसाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. ओला इलेक्ट्रिकनं दावा केला आहे की, स्कूटमध्ये मोठी बूट स्पेस देण्यात आली आहे. याव्यतिरिक्त नव्या स्कूटरमध्ये चावीशिवाय गाडी सुरु करण्याचा पर्याय मिळणार आहे. तसेच स्मार्टफोन कनेक्टिविटीसोबत लॉन्च करण्यात येणार आहे. ओलाने दावा केला आहे की, इलेक्ट्रिक स्कूटर एर्गोनोमिक सीटिंगसोबत लॉन्च होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)