Audi Q2 SUV : |ऑडीची सर्वात स्वस्त कार भारतात लॉन्च; 'या' गाडीसोबत स्पर्धा
Audi Q2 SUV : Audi ने भारतात आपली सर्वात स्वस्त SUV कार लॉन्च केली आहे. भारतीय बाजारात या कारची स्पर्धा टोयोटा फॉर्च्युनर सोबत होणार असल्याचं बोलल जात आहे.
Audi Q2 SUV : जगभरातील सर्वात महागड्या गाड्यांपैकी एक असणाऱ्या Audi ने भारतात आपली सर्वात स्वस्त कार लॉन्च केली आहे. कंपनीने Audi Q2 ला भारतीय बाजारात उतरवलं आहे. ऑडीच्या या स्वस्त मॉडेलची किंमत 34.99 लाख रुपये आहे. ऑडीची ही कार एक्स्टीरियर लाइन आणि डिझाइन लाइन ग्रेड्समध्ये येते. स्टँडर्ड, प्रीमियम, प्रीमियम प्लस I, प्रीमियम प्लस II आणि टेक्नॉलॉजी ट्रिम्समध्ये उपलब्ध आहे.
Audi या कारमधील फिचर्स
Audiच्या या कारमध्ये ऑडी वर्च्युअल कॉकपिट देण्यात आलं आहे. कारमध्ये 12.3 इंचाचा MMI नेव्हिगेशन, ड्यूअल झोन क्लायमेट कंट्रोल, 8.3 इंच डिस्प्ले, सनप्रूफ, एंबिएंट लायटनिंग, LED हेडलाइट आणि रिवर्स कॅमेरा यांसारखे फिचर्स देण्यात आले आहेत. यामध्ये 2.0 लीटर टर्बो पेट्रोल इंजिनही देण्यात आलं आहे. जे 190PS पॉवर 320Nm टॉर्क जेनरेट करतं.
Audi Q2 मध्ये 7 स्पीड ड्यूअल क्लच ऑटोमॅटिक गियरबॉक्स आणि ऑल व्हिल ड्राइव्ह देण्यात आलं आहे. स्पीडबाबत बोलायचे झाले तर ही कार केवळ 6.5 सेकंदांमध्ये 0- 100kmpl च्या वेगाने धावते. ही कंपनीची एन्ट्री लेव्हल एसयूव्ही (SUV) कार आहे. ही कार फॉक्सवॅगनच्या MQB प्लेटफॉर्मवर बेस्ड आहे. कारची लांबी 4191 मिमी आणि रुंदी 1,794 मिमी आहे. कारची हाइट 1,508mm आहे. व्हिलबेस 2,601mm आहे.
Wild and free. #AudiQ2 #FutureIsAnAttitude pic.twitter.com/UDM4voyRPc
— Audi India (@AudiIN) October 18, 2020
किंमत
Audi च्या या गाडीची किंमत 34.99 लाख रुपयांपासून सुरु होते. आणि याच्या टॉप मॉडेलची किंमत 48.99 लाख रुपये आहे. या कारसाठी बुकिंग्स सुरु करण्यात आल्या आहेत. जर तुम्हाला या दिवाळीत ही गाडी खरेदी करायची असेल तर दोन लाख रुपयांच्या टोकन अमाउंटवर तुम्ही ही गाडी बुक करू शकता.
या कारसोबत असेल स्पर्धा
भारतीय बाजारात ऑडीच्या या गाडीची स्पर्धा टोयोटा फॉर्च्युनर सोबत होणार आहे. फॉर्च्युनरची किंमत 28.66 लाखांपासून सुरु होणार आहे. तसेच फॉर्च्युनर टॉप मॉडेलची किंमत दिल्लीच्या एक्स-शोरूममध्ये 36.88 लाख रुपये आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- New Renault Duster vs Hyundai Creta Turbo petrol I कार खरेदी करताना काय पाहणार? शक्तिशाली टर्बो पेट्रोल इंजिन की आधुनिक टेक्नॉलॉजी
- New Land Rover REVIEW | वजनाने हलकी, 291 मिमी ग्राऊंड क्लिअरन्स; नवीन लँड रोव्हर डिफेंडरचा फर्स्ट लूक!
- दिवाळीला Tata Harrier सह या कार्सवर मिळतेय बंपर सूट; या कंपन्या देखील देतायेत डिस्काउंट