New Land Rover REVIEW | वजनाने हलकी, 291 मिमी ग्राऊंड क्लिअरन्स; नवीन लँड रोव्हर डिफेंडरचा फर्स्ट लूक!
नवीन लँड रोवर डिफेंडर भारतात लॉंच झाली आहे.यात अधिक आरामदायी आणि ऑफरोडचा अनुभव मिळू शकतो.
नवी दिल्ली: लँड रोव्हर ही कदाचित संपूर्ण जगातील सर्वात प्रसिद्ध गाड्यांपैकी एक गाडी आहे. लँड रोव्हर डिफेंडर एक आयकॉनिक SUV आहे ज्याने खऱ्या अर्थाने SUV या शब्दाला लोकप्रियता मिळवून दिली आहे. लँड रोव्हर सेवानिवृत्त होण्यापूर्वी या कंपनीने बरेच वर्षे डिफेंडर चा हा प्रकार बनविणे चालू ठेवले होते आणि त्याचा परिणाम म्हणून आज दिसत असलेली ही नवी कोरी कार आहे. डिफेंडर ही एक नक्कीच 4x4 SUV आहे जी आपल्याला नुकतंच आरामदायी अनुभव देत नाही तर ती कुठेही जाण्यास सक्षम करते. त्याच्या डिफेंडर या नावातच सर्वकाही आलं. भारतात लँड रोव्हरच्या या पाच दरवाजे असलेल्या आवृत्तीसह या नव्या कारचे अनावरण होत आहे. डिफेंडर हे नाव या गाडीला सार्थक आहे का हे बघण्यासाठी आपण या SUV च्या वैशिष्ट्यांवर एक नजर टाकूया.
जुन्या डिफेंडरमध्ये आरामाच्या अनुभवाबाबत आणि आधुनिक वैशिष्ट्यांच्या बाबतीत तुलनेने थोडा अभाव होता. परंतु ही नवीन डिफेंडर कोऱ्या कागदाप्रमाणे एकदम नव्याने तयार करण्यात आली आहे आणि ती एक आधुनिक लक्झरी SUV या प्रकारात मोडते जी ऑफ रोडर असल्याचे मानले जाते. लँड रोव्हरच्या मते डिफेंडरमध्ये 4x4 आणि ऑफ रोड या प्रकारावर भर देण्यात आलेली आहे. आता हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल की 70 लाखांपेक्षा जास्त किंमत असलेली ही SUV घ्यायला कोणी जाणार का? पण हे नक्की आहे की इतर कोणत्याही SUV ज्या ठिकाणी जाणार नाहीत त्या ठिकाणी ही डिफेंडर नक्की जाईल.
याचा आकार एखाद्याला बॉक्सच्या आकाराप्रमाणे वाटेल पण तो त्याहून काहीसा वेगळा आहे. ही थोडी जुन्या डिफेंडर प्रमाणे आहे पण यात बरंच काही नविन आहे. मागील बाजूस युनिक लॅम्प सुविधा आणि स्पेअर व्हिलना ग्राउंड क्लिअरंस सुविधा बसवली असल्याने ही SUV इतर साधारण SUV पेक्षा नक्कीच वेगळी ठरते.
नवीन डिफेंडरच्या खालील बाजूला अॅल्युमिनियम मोनोकॉक प्रकारातील बांधकाम करण्यात आले आहे ज्यामुळे ही गाडी वजनाने अधिक हलकी होते आणि अधिक सक्षम बनते. बहुतेक हार्डकोअर SUV या शिडीच्या फ्रेमसारख्या असतात परंतु लँड रोव्हर डिफेंडर अशा प्रकारे बनविण्यात आली आहे की ती शिडीच्या फ्रेमपेक्षा तीन पट अधिक टणक आहे. या SUV त्यात 291 मिमी ग्राऊंड क्लिअरन्स आहे त्यामुळे 900 मि.मी. पाण्याच्या प्रवाहातून सहज मार्ग काढता येईल. याचा अर्थ तुम्ही मुंबईच्या मुसळधार पावसात सहजपणे प्रवास करु शकता.
या कारच्या क्षमतेच्या बाबतीत, यात स्वतंत्र सस्पेंशन, ट्विन स्पीड ट्रान्सफर बॉक्स आणि कायमस्वरुपी ऑल-व्हील ड्राईव्ह तसेच अवघड भूप्रदेशात प्रवास करताना आवश्यक असणारा रिस्पॉन्स मोड य़ा प्रकारच्या सुविधा आहेत. ज्यामुळे आपण कार वेगवेगळ्या भूप्रदेशात घेऊन जाऊ त्यावेळी आपल्याला काही अडचण येणार नाही. तसेच अशा प्रदेशात गेल्यास ही कार स्वत: सर्व मोड अॅडजस्ट करते. तसेच याचे डायमेंशन अशा प्रकारे बनवण्यात आले आहेत की अवघड भूप्रदेशात प्रवास करणे अधिक सुलभ होईल.
त्यामुळे आपण ऑफ रोड प्रवास करू शकता. एका आरामदायी SUV प्रमाणे याची किंमत आहे आणि त्याच्या प्राईस टॅगवरुन तुम्ही अपेक्षा करु शकता की या डिफेंडरमुळे तुम्हाला काय ऑफर मिळणार आहे.
तुम्हाला एक भव्य 10 इंच स्क्रीन आणि तितक्याच मोठ्या प्रमाणात 12.3 इंचाचा डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर तसेच हेड अप डिस्प्ले, कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी, पॉवर सीट, मेरिडियन ऑडिओ सिस्टम इत्यादीसह अत्याधुनिक इन्फोटेनमेंट व्यवस्था मिळेल.
यात मागील बाजूस एक आरसा आहे जो आपल्याला पाठीमागचा कॅमेरा व्ह्यूव दर्शवतो. आतील भाग हा इतर रेंज रोव्हर्स किंवा लक्झरी SUV इतका मोठा नाही कारण डिझाइनमध्ये मोठ्या आकारांचे हँडल, सहजपणे साफ केलं जाऊ शकतील असे रबराच्या थरासह असणारे फ्लोअरिंगपासून बनला आहे. या डिफेंडरमध्ये 5 दरवाज्यांची सोय आहे आणि मागील बाजू ही अधिक आरामदायक आणि प्रशस्त आहे.
या ऑफरमध्ये 2.0 प्रकारातील चार सिलेंडर पेट्रोल इंजिन आहेत जे 8 स्पीड ऑटोमॅटीक दर्जासह 300 bhp and 400Nm प्रकारातील आहेत. ही कार अद्याप डिझेल प्रकारात उपलब्ध नाही पण लवकरच याही प्रकारात येण्याची शक्यता आहे. 79.9 लाख किंमत असलेली ही डिफेंडर 110 कार Jeep Wrangler च्या तुलनेत मोठी खर्चिक वाटेल पण निश्चितपणे यात चार अॅक्सेसरी पॅकसह अधिक क्षमता आणि अधिक गुणवत्ता आहे. आपण ज्यावेळी या कारचा अनुभव घेऊ त्यावेळी आपल्याला ती अधिक दणकट आणि आरामदायी यांचे मिश्रण असल्याचे भासेल.