एक्स्प्लोर

New Renault Duster vs Hyundai Creta Turbo petrol I कार खरेदी करताना काय पाहणार? शक्तिशाली टर्बो पेट्रोल इंजिन की आधुनिक टेक्नॉलॉजी

डस्टर ही तिच्या दणकट क्षमतेसाठी आणि सस्पेंशनसाठी तसेच डिझेल इंजिनसाठी प्रसिध्द आहेCreta मध्ये उच्च इंटेरिअर डिझाईनसह एक सुलभ ड्रायव्हिंगचा अनुभव मिळू शकतो.

नवी दिल्ली:सध्याच्या भारतीय वाहन बाजारात दोन मोठे ट्रेंड उदयास येत आहेत आणि ते SUV ची विक्री आणि SUV ची पेट्रोलवर आधारित आवृत्ती याभोवती मोठ्या प्रमाणात केंद्रीत झाले आहेत. भारतातील परिस्थिती लक्षात घेता या आधी SUV फक्त डिझेल प्रकारातील कार बाजारात आणण्यात आली होती. कारण SUV मालकांकडून त्यांचा मोठ्या प्रमाणात वापर व्हायचा आणि SUV च्या अतिरिक्त वजन हाताळण्याची क्षमता केवळ टार्क युक्त डिझेलमध्येच असायची. तसेच लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी डिझेलयुक्त इंजिन हेच उपयुक्त असते. अजूनही विशिष्ठ खरेदीदारांकडून डिझेलवर चालणाऱ्या SUV ना मोठी मागणी आहे. बऱ्याचदा बहुतेक स्टॅंडर्ड पेट्रोल इंजिन मोठ्या SUV ला अनुकूल नसतात कारण SUV ला डिझेल टार्कची आवश्यकता असते आणि नैसर्गिकरित्या तयार केलेले पेट्रोल देखील तितके कार्यक्षम नसते. यावर उपाय काय? एक टर्बो पेट्रोल इंजिन.

मागील दोन वर्षांमध्ये टर्बो पेट्रोलयुक्त SUV ची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलीय आणि त्यांनी अधिक टार्कचा वापर करून इंजिनची कार्यक्षमता वाढवली आहे आणि समस्या सोडविली आहे. जर कारचा अतिवापर केला नाही तर एक डिझेल इतके चांगले नसले तरीही टर्बो पेट्रोल बर्‍यापैकी कार्यक्षम आहे. म्हणूनच हा ट्रेंड तपासण्यासाठी आम्ही नवीन ह्युंदाई क्रेटा आणि रेनो डस्टर टर्बो पेट्रोल एकत्रितपणे तुलना केली आहे. टर्बो पेट्रोलसह असणारी क्रेटा ही लोकप्रिय कार आहे तर नुकतीच बाजारात आलेल्या डस्टरने शक्तिशाली टर्बो पेट्रोल इंजिनसाठी त्यांचे लोकप्रिय झालेल्या डिझेल इंजिनचा वापर करणे टाळले आहे.

New Renault Duster vs Hyundai Creta Turbo petrol I कार खरेदी करताना काय पाहणार? शक्तिशाली टर्बो पेट्रोल इंजिन की आधुनिक टेक्नॉलॉजी

नविन क्रेटाचा विचार करता लक्षात येते की या प्रकारातील SUV किती डायनॅमिक असू शकते. नविन क्रेटा ही विशेष ड्राईव्ह मोडसह असलेल्या 7-speed DCT व 1.4l टर्बो पेट्रोल आणि 140 bhp and 242Nm. या गुणधर्मासह उपलब्ध आहे. टर्बो पेट्रोल हे शहरातील कमी वेगासाठी उपयुक्त आहे आणि या कमी वेगामुळे त्याचे इंजिनही चांगले कार्यरत राहते. .याचा परफॉर्मंन्स अधिक चांगला अनुभवायचा असेल तर क्रेटाला स्पोर्ट मोडवर ठेवावे लागेल आणि त्याचसोबत त्याच्या स्टिअरिंग पॅडेल्सचा वापरदेखील करावा लागेल. त्यामुळे इंजिनचा टोन हा अधिक चांगला बनेल आणि त्याचा परफॉर्मंन्सही टिकून राहिल. 1.4 टर्बो इंजिन असलेले क्रेटा हे 1.61 पेट्रोल इंजिन असलेल्या Hyundai पेक्षा कधीही चांगले आहे. जर काळजीपूर्वक ड्रायव्हिंग केले तर 17 किलोमीटर प्रति लिटर इतके अॅवरेज मिळू शकते. अशारीतीने 17 लाख रुपये किंमत असलेली Creta ही टर्बो इंजिनसह सर्व तंत्रज्ञान आणि चांगल्या गिअरबॉक्स असलेली कार दर्शवते की भारतात कशा पध्दतीने SUV मध्ये बदल झाला.

New Renault Duster vs Hyundai Creta Turbo petrol I कार खरेदी करताना काय पाहणार? शक्तिशाली टर्बो पेट्रोल इंजिन की आधुनिक टेक्नॉलॉजी

डस्टर ही तिच्या दणकट क्षमतेसाठी आणि सस्पेंशनसाठी तसेच डिझेल इंजिनसाठी प्रसिध्द आहे. आता यात 156 bhp आणि 254Nm क्षमतेसह 1.31 टर्बो इंजिन आहे. डस्टर ही जुन्या टर्बो पेट्रोल इंजिन प्रकारातील असल्याने त्याची क्षमता भरपूर आहे आणि तसा आपल्याला अनुभवही येतो. त्याचा वेगही अत्यंत चांगला आहे. याची संपूर्ण कार्यक्षमता प्रभावी आहे आणि मॅन्युअल वापरण्यास देखील सुलभ आहे. तसेच यात इतके टार्क आहे की आपल्याला शहरात गाडी चालवताना फारसा त्रास होत नाही. तथापि स्टिअरिंग हे कारच्या इंजिनची शक्ती हाताळण्यासाठी तेवढे फिट उपयुक्त नाही. तुम्हाला केवळ 10 किलोमीटर प्रति लिटर इतकेच अॅवरेज मिळू शकेल.

New Renault Duster vs Hyundai Creta Turbo petrol I कार खरेदी करताना काय पाहणार? शक्तिशाली टर्बो पेट्रोल इंजिन की आधुनिक टेक्नॉलॉजी

याची किंमत केवळ 11.9 लाख इतकी आहे. इतर कॉंम्पॅक्ट SUV च्या तुलनेत ही किंमत अत्यंत कमी आहे. आताच्या काळातील अनेक वैशिष्ट्यांचा अभाव असला तरी ज्यांना काहीतरी वेगळं आणि रफ अनुभवायचं असेल तर त्यांनी या कारला पसंती द्यावी.

Creta च्या बाबतीत याच्या उलट आहे. 17 लाख किंमत असलेल्या या कार मध्ये तुम्हाला उच्च इंटेरिअर डिझाईनसह एक सुलभ ड्रायव्हिंगचा अनुभव मिळू शकतो. Creta ही जलद टर्बो पेट्रोलसह आजच्या काळातील अत्याधुनिक स्पोर्ट कार आहे तर डस्टर ही दुर्गम प्रदेशात चांगल्या पध्दतीने उपयुक्त ठरू शकेल अशी कार आहे. यातही जलद टर्बो पेट्रोलची सुविधा आहे. तुम्हाला आधुनिक वैशिष्ट्यांनी उपयुक्त असलेली कार हवी आहे की जरा जुन्यापैकी परंतु ड्रायव्हिंगचा चांगला अनुभव देणारी कार हवी हे आता तुमच्यावर अवलंबून आहे.

Hyundai Creta Turbo

काय चांगलं - गुणवत्ता, वैशिष्ट्ये, DCT automatic, इंजिन, प्रशस्त जागा काय नको- तुलनेनं महाग, स्लाईड फर्म राइड

Renault Duster Turbo

काय चांगलं - किमंत, इंजिन पॉवर, सस्पेन्शन काय नको - अनेक वैशिष्ट्यांचा अभाव, जुन्या प्रकारचे इंटेरिअर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Satej Patil Radhanagari Speech :   भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
Dhule Cash Seized : मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
एकाच राज्यासाठी काम करत असाल तर तुम्ही पंतप्रधान कशाला होता? राज्याचे मुख्यमंत्री व्हा; पवार गरजले
एकाच राज्यासाठी काम करत असाल तर तुम्ही पंतप्रधान कशाला होता? राज्याचे मुख्यमंत्री व्हा; पवार गरजले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uddhav Thackeray Radhanagri Speech : शिवरायांचं मंदिर ते मुलांना मोफत शिक्षण; ठाकरेंची मोठी आश्वासनंSatej Patil Radhanagari Speech :   भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारीEknath Shinde Koregaon Sabha : महेश शिंदेंच्या प्रचारसाठी कोरेगावात सभा, शिंदेंची कोरेगावात सभाSharad Pawar On Retirement : 14 वेळा निवडणुका लढल्या, आता निवडणुक लढणार नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satej Patil Radhanagari Speech :   भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
Dhule Cash Seized : मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
एकाच राज्यासाठी काम करत असाल तर तुम्ही पंतप्रधान कशाला होता? राज्याचे मुख्यमंत्री व्हा; पवार गरजले
एकाच राज्यासाठी काम करत असाल तर तुम्ही पंतप्रधान कशाला होता? राज्याचे मुख्यमंत्री व्हा; पवार गरजले
Numerology : अतिशय घाबरट असतात 'या' जन्मतारखेचे लोक; मनातील भावनाही धड करत नाहीत व्यक्त, लोक काय बोलतील याचा करतात अति विचार
अतिशय घाबरट असतात 'या' जन्मतारखेचे लोक; लोक काय बोलतील याचा करतात अति विचार, मनातील भावना व्यक्त करायलाही घाबरतात
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं "मराठी बोलणार नाही"
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
Embed widget