एक्स्प्लोर

मागणीला यश, आनंदाला उधाण! माढा रेल्वे स्टेशनवर आजपासून आरक्षण प्रणाली सुरु, प्रवाशांची गैरसोय थांबणार

Solapur Madha Railway News : माढा (Madha) परिसरातील रहिवाशांसाठी मोठी आणि आनंदाची बातमी आहे. आजपासून माढा स्टेशनवर आरक्षण खिडकी सुरु झाली आहे.

Solapur Madha Railway News : माढा रेल्वे स्टेशनवरुन (Madha Railway Station) प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी (Passengers) आणि माढा (Madha) परिसरातील रहिवाशांसाठी मोठी आणि आनंदाची बातमी आहे. आजपासून माढा रेल्वे स्टेशनवर आरक्षण खिडकी सुरु झाली आहे. या निर्णयामुळं प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आरक्षण प्रणाली (Reservation system) सुरु केल्यामुळं प्रवाशांची गैरसोय थांबणार आहे. तरी जास्तीत जास्त प्रवाशांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात येत आहे.  

गेल्या अनेक दिवसांपासून माढा रेल्वे स्टेशनवर आरक्षण प्रणाली सुरु करावी अशी प्रवासी मागणी करत होते. अखेर या मागणीला यश आलं आहे. कारण, माढा परिसरात राहणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय होत होती. प्रवाशांना कुर्डूवाडीला जावे लागत होते. पण आता माढ्यातच तिकीट आरक्षण प्रणाली सुरु झाल्यानं प्रवासी खुश असल्याचं पाहायला मिळत आहे. 

प्रवाशांची गैरसोय थांबवणार, रेल्वे विभागाच्या निर्णयाचं स्वागत : गिरीश कानडे

दरम्यान, माढा स्टेशनवर तिकीट आरक्षण खिडकी सुरु केल्यामुळं प्रवाशांची गैरसोय थांबवणार आहे. रेल्वे विभागानं घेतलेल्या या निर्णयाचं आम्ही स्वागत करत असल्याची माहिती माढ्यातील प्रवासी गिरीश कानडे यांनी एबीपी माझाला दिली आहे. माढा स्टेशनवर प्रवासी आरक्षण प्रणाली (पीआरएस) सुरू करण्यात आल्यामुळं प्रवाशांना त्यांचा प्रवास अधिक सुरळीत होण्यास मदत होईल. त्यामुळे माढा स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी व माढा शहरातील रहिवाशांनी जास्तीत जास्त रेल्वे आरक्षण तिकीट बुक करावे असे आवाहन गिरीश कानडे यांनी केलं आहे. तसेच प्रवाशांनी रेल्वे विभाग आणि सोलापूर मध्य रेल्वेचे वरिष्ठ मंडल वाणिज्य प्रबंधक (Sr.DCM)  योगेश पाटील यांचेही आभार मानले.

सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळात प्रवाशांना तिकीट बुक करता येणार

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, आजपासून माढा स्टेशनवर आरक्षण प्रणालीची सुविधा सुरु करण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दिवशी सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळात प्रवाशांना तिकीट बुक करता येणार आहे. तर रविवारी  सकाली 8 ते दुपारी 2 या वेळात किटीक बुक करता येणार आहे. यामुळं माढा स्टेशनच्या रेव्हीनीव्हमध्ये वाढ होणार आहे. माढा स्टेशनवर पुणे, मुंबई, दिल्ली, कर्नाटक, हैदरबाद या ठिकाणी जाण्यासाठी देखील तिकीट बुक करता येणार आहे. माढा परिसारातील वाकाव, दारफळ, केवड, उंदरगाव, जामगाव, मालवंडी, विठ्ठलवाडी, उपळाई, वैराग याठिणचे प्रवाशी मोठ्या प्रमाणात मुंबई पुणे या ठिकाणी प्रवास करतात. आता त्यांची गैरसोय होणार नाही. दरम्यान, या आरक्षण प्रणालीला जर चांगला प्रतिसाद मिळाला तर प्रवाशांच्या बाकीच्या मागण्या देखील मान्य होण्यास मदत होईल. 

महत्वाच्या बातम्या:

Railway PNR : रेल्वे तिकिटावरील PNR चा अर्थ काय? त्यात लपलेला कोड काय सांगतो? 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'जरांगेंना बिग बॉसमध्ये घ्या' ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंचा जरांगेंना टोला, म्हणाले, 'या माणसाच्या सांगण्यावरून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री..'
'जरांगेंना बिग बॉसमध्ये घ्या' ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंचा जरांगेंना टोला, म्हणाले, 'या माणसाच्या सांगण्यावरून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री..'
Lebanon Pager Serial Blasts : 'मोसाद'च्या 3 ग्रॅम स्फोटकात 5 हजार जीव होरपळले; निष्पाप माणसं मारत सुटलेल्या इस्त्रायलला युद्धाचा नियम लागू होत नाही का?
'मोसाद'च्या 3 ग्रॅम स्फोटकात 5 हजार जीव होरपळले; निष्पाप माणसं मारत सुटलेल्या इस्त्रायलला युद्धाचा नियम लागू होत नाही का?
Shivdeep Lande: बिहारचा सिंघम IPS शिवदीप लांडेंचा पोलीस सेवेतून राजीनामा, कारण गुलदस्त्यात, पुढे काय करणार?
बिहारचा सिंघम IPS शिवदीप लांडेंचा पोलीस सेवेतून राजीनामा, कारण गुलदस्त्यात, पुढे काय करणार?
Sarkari Yojana : काय आहे PM आशा योजना? सरकारनं केली 35000 कोटींची तरतूद, शेतकऱ्यांना होणार फायदा
काय आहे PM आशा योजना? सरकारनं केली 35000 कोटींची तरतूद, शेतकऱ्यांना होणार फायदा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Laxman Hake On Manoj Jarange : मनोज जरांगेंचं आंदोलन बारामतीच्या इशाऱ्यावर, लक्ष्मण हाकेंचा आरोपBabanrao Taywade OBC : आश्वासनाला तडा गेल्यास ओबीसी समाजही रस्त्यावर : बबनराव तायवाडेDhule Suicide Case : धुळ्यात एका कुटुंबातील चौघांची आत्महत्या, कारण स्पष्ट नाहीNagpur Congress Protest : नागपुरात अनिल बोंडे आणि गायकवाडांविरोधी घोषणाबाजी आणि आंदोलन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'जरांगेंना बिग बॉसमध्ये घ्या' ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंचा जरांगेंना टोला, म्हणाले, 'या माणसाच्या सांगण्यावरून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री..'
'जरांगेंना बिग बॉसमध्ये घ्या' ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंचा जरांगेंना टोला, म्हणाले, 'या माणसाच्या सांगण्यावरून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री..'
Lebanon Pager Serial Blasts : 'मोसाद'च्या 3 ग्रॅम स्फोटकात 5 हजार जीव होरपळले; निष्पाप माणसं मारत सुटलेल्या इस्त्रायलला युद्धाचा नियम लागू होत नाही का?
'मोसाद'च्या 3 ग्रॅम स्फोटकात 5 हजार जीव होरपळले; निष्पाप माणसं मारत सुटलेल्या इस्त्रायलला युद्धाचा नियम लागू होत नाही का?
Shivdeep Lande: बिहारचा सिंघम IPS शिवदीप लांडेंचा पोलीस सेवेतून राजीनामा, कारण गुलदस्त्यात, पुढे काय करणार?
बिहारचा सिंघम IPS शिवदीप लांडेंचा पोलीस सेवेतून राजीनामा, कारण गुलदस्त्यात, पुढे काय करणार?
Sarkari Yojana : काय आहे PM आशा योजना? सरकारनं केली 35000 कोटींची तरतूद, शेतकऱ्यांना होणार फायदा
काय आहे PM आशा योजना? सरकारनं केली 35000 कोटींची तरतूद, शेतकऱ्यांना होणार फायदा
Ashwini Jagtap: अश्विनी जगताप शरद पवार गटात जाण्याची चर्चा, अखेर स्पष्टच बोलल्या, ' दीराला उमेदवारी मिळाली तर मग मी..'
अश्विनी जगताप शरद पवार गटात जाण्याची चर्चा, अखेर स्पष्टच बोलल्या, ' दीराला उमेदवारी मिळाली तर मग मी..'
Rakhi Sawant : घर विकलं अन् म्युझिक अल्बम बनवला, किंग खाननेही केलं होतं राखीचं कौतुक...
घर विकलं अन् म्युझिक अल्बम बनवला, किंग खाननेही केलं होतं राखीचं कौतुक...
Success Story: लाखोंच्या कमाईला कोथिंबिरीचा सुवास! केवळ 50 गुंठ्यातून शिरुरच्या या शेतकऱ्यानं महिन्याभरात कमवले...
लाखोंच्या कमाईला कोथिंबिरीचा सुवास! केवळ 50 गुंठ्यातून शिरुरच्या या शेतकऱ्यानं महिन्याभरात कमवले...
Liquor Policy: मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी! फक्त 99 रुपयांना मिळणार तुमच्या आवडीचा ब्रँड, नेमकं धोरण काय?
मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी! फक्त 99 रुपयांना मिळणार तुमच्या आवडीचा ब्रँड, नेमकं धोरण काय?
Embed widget