एक्स्प्लोर
सोलापूर विद्यापीठात आमदाराच्या नापास नातेवाईकाला पास केले, एनएसयुआयचा आरोप, कुलगुरुंच्या राजीनाम्याची मागणी
सोलापूर विद्यापीठात आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या नातेवाईक विद्यार्थ्याला कुलगुरुंनी पास केलं असल्याचा आरोप एनएसयुआयने केला आहे. मात्र कुलगुरु मृणालिनी फडणवीस यांनी हे आरोप फेटाळले आहेत.
सोलापूर : विधानपरिषदेचे आमदार सुजितसिंग ठाकूर यांच्या नातेवाईक असलेल्या नापास विद्यार्थ्याला पास केल्याचा आरोप काँग्रेसच्या एनएसयुआय या संघटनेने केला आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरु मृणालिनी फडणवीस यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत या विद्यार्थ्याला पास केल्याचा आरोप करण्यात आला आहे. कुलगुरुंनी नैतिकता बाळगत 24 तासात राजीनामा द्यावा अन्यथा सर्व पुरावे राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांकडे सुपुर्द करण्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी सोलापुरातल्या वि. गु. शिवदारे महाविद्यालयातील फॉर्मसीच्या द्वितीय वर्षातील चौथ्या सेमिस्टरच्या फिजीकल फार्मसी या विषयामध्ये नापास असलेल्या विद्यार्थ्याला स्वत:चा लॉग इन आयडी वापर करुन मार्क वाढवल्याचा आरोप एनएसयुआयने केला आहे. आमदार सुजितसिंग ठाकूर हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे सिनेट सदस्य असून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्नेही मानले जातात.
परीक्षा नियंत्रक पदभार कुलगुरुंना घेता येत नसताना देखील त्यांनी पदभार घेतला असल्याचा आणि जाणीवपूर्वक मार्क वाढवल्याचा आरोप संघटनेचे जिल्हाध्यक्ष गणेश डोंगरे यांनी केला. दरम्यान अशाप्रकारे कोणालाही लॉग इन आयडीचा वापर करता येऊ शकतं नाही. मी लॉग इन आयडीचा वापर करत मार्क वाढवल्याचे सिद्ध होत नाही, असे स्पष्टीकरण कुलगुरु मृणालिनी फडणवीस यांनी दिले आहे. मार्क वाढवण्याच्या या प्रकरणाशिवाय आणखी 8 प्रकरणे देखील आपल्यासमोर आली असून त्यावर सत्यशोधन कमिटी नेमून सखोल चौकशी करणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात नापास विद्यार्थांना पास करण्याचे रॅकेट सुरु असल्याचं बोललं जात आहे.
दरम्यान सोलापूर विद्यापीठातील बहुजन समाजातील अधिकाऱ्यांना कुलगुरु फडणवीस जाणीवपूर्वक त्रास देत असल्याचा आरोप करत धनगर समाज उन्नती मंडळाने धरणे आंदोलन केले. डॉ. फडणवीस यांनी आतापर्यंत तत्कालीन कुलसचिव गणेश मंझा, परीक्षा नियंत्रक बी. पी. पाटील, लेखाधिकारी बालाजी शेवाळे आधी अधिकाऱ्यांना दबाव टाकत राजीनामा देण्यास भाग पाडले आहे. आता पारदर्शी कारभार असणाऱ्या परीक्षा आणि मुल्यमापन विभागाचे संचालक डॉ. श्रीकांत कोकरे यांना मानसिक त्रास देऊन राजीनामा देण्यास भाग पाडत असल्याचा आरोप संघटनेचे अध्यक्ष शेखर बंगाळे यांनी केला. दरम्यान आपण कोणत्याही अधिकाऱ्याला अशाप्रकारे त्रास दिला नसून हे आरोप निराधार असल्याचं स्पष्टीकरण कुलगुरु फडणवीस यांनी दिलं आहे. डॉ. कोकरे यांनी पात्रतेसाठी आवश्यक असलेली काही कागदपत्रे सादर केलेली नव्हती त्यामुळे त्यांची सेवा स्थगित करण्यात आली होती. त्यांनी स्वत:हून राजीनामा देण्यार असल्याचे ही सांगितले होते. माझ्याविरुद्ध हा जाणीवपूर्वक कट रचला जातं असून कायदेशीर कारवाई करणार असल्याचे कुलगुरु डॉ. फडणवीस यांनी सांगितले.
दरम्यान 26 आणि 27 डिसेंबर रोजी सोलापुर विद्यापीठात अश्वमेध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आलं आहे. यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी दोन दिवस विद्यापीठात असणार आहेत. यावेळी ह्या प्रकरणावरुन गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
राजकारण
राजकारण
Advertisement