Horoscope Today 9 March 2026 : आज सोमवारचा दिवस 5 राशींसाठी भाग्याचा! भोलेनाथांच्या कृपेने फलदायी दिवस, आजचे राशीभविष्य वाचा
Horoscope Today 9 March 2026 : आज सोमवारचा दिवस 12 राशींसाठी कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या...

Horoscope Today 9 March 2026 : वैदिक पंचांगानुसार, आज 9 मार्च 2026, आजचा वार सोमवार आहे. आजचा दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. भोलेनाथांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
नोकरी व्यवसायात स्त्रियांच्या मध्यस्थीने कामे होतील गायन वादन अभिनय नृत्य यासारख्या कलांमध्ये प्राविण्य मिळेल.
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
वृषभ राशीच्या लोकांनो आज प्रॉपर्टी खरेदी करण्याचे मनात असेल तर त्या दृष्टीने पावले उचलायला हरकत नाही, नवीन वाहन खरेदीचे योग संभवतात
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
कोणत्याही टोकाच्या गोष्टी घडणार नाही याची काळजी घ्या आपल्यापेक्षा लहान मुलांच्या वयामध्ये रमून जाल.
कर्क रास (Cancer Horoscope Today)
नोकरी व्यवसायात वरिष्ठांची मर्जी राहील त्यामुळे तुमचा कामाचा दर्जाही सुधारेल.
सिंह रास (Leo Horoscope Today)
तुम्ही जे बोलाल त्याची इतरांवर छाप पडेल फक्त दुसऱ्यांना लागेल असे बोलू नका नाहीतर गैरसमज होतील
कन्या रास (Virgo Horoscope Today)
विद्यार्थ्यांनी अविचाराने वागू नये मुलांच्या प्रगतीचा आलेख उंचावल्यामुळे मानसिक समाधान लाभेल.
तूळ रास (Libra Horoscope Today)
स्थावर इस्टेटची कामे रेंगाळतील परंतु तुमच्या सरळ मार्गी विचारांमुळे भविष्यात लाभ मिळेल.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
महिलांनी कोणताही निर्णय पटकन घेऊ नये नोकरी व्यवसायात नवीन संधी आणि त्याबरोबर भरपूर कष्ट करण्याची तयारी ठेवावी.
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
नित्य बदलत्या आयुष्याचे स्वागत करण्याची तयारी ठेवा त्यामुळे तुम्ही पाहिलेल्या स्वप्नांचा प्रवास आत्मविश्वासाने कराल.
मकर रास (Capricorn Horoscope Today)
गरजेपेक्षा जास्त विचार करणे टाळले तर अनेक क्षेत्रात विविध संधी मिळतील
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
प्रसिद्धी आणि प्रतिष्ठान मिळवण्यासाठी जीवाचे रान करण्याची ताकद ग्रह तुम्हाला देणार आहेत.
मीन रास (Pisces Horoscope Today)
भावंडांशी थोडी मतभेद संभवतात वरचेवर प्रवासाचे योग येतील.
हे ही वाचा :
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Weekly Horoscope : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशीसाठी नवीन आठवडा कसा असणार? हातात पैसा येणार की जाणार? साप्ताहिक राशीभविष्य



















