T20 World Cup 2026 Team India Celebration : विजयी ट्रॉफी उचलताच टीम इंडियाचे भन्नाट सेलीब्रेशन, सूर्याने नेमकं काय केलं?, पाहा संपूर्ण Video
T20 World Cup 2026 Team India Celebration : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर टीम इंडियाने टी-20 वर्ल्ड कप 2026 च्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा 96 धावांनी पराभव करत इतिहास रचला.

T20 World Cup 2026 Team India Celebration : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर टीम इंडियाने टी-20 वर्ल्ड कप 2026 च्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा 96 धावांनी पराभव करत इतिहास रचला. या विजयासह भारत सलग दुसऱ्यांदा टी-20 विश्वचषक जिंकणारा आणि किताब डिफेंड करणारा पहिला संघ ठरला. इतकंच नाही तर यजमान देशाने प्रथमच टी-20 वर्ल्ड कप जिंकण्याचा पराक्रम टीम इंडियाने करून दाखवला. विजेतेपदाची ट्रॉफी हातात येताच कर्णधार सूर्यकुमार यादवसह संपूर्ण संघाने मैदानावर जल्लोष केला.
CHAK DE, INDIAAAAA! 🇮🇳
— Star Sports (@StarSportsIndia) March 8, 2026
Ladies & gentlemen, presenting the three-time ICC Men's T20 World Cup champions 🏆🏆🏆#T20WorldCup #INDvNZ pic.twitter.com/0hb7APCcD2
अंतिम सामन्यात भारताने आधी फलंदाजी करत 20 षटकांत 5 बाद 255 धावांचा डोंगर उभा केला. या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडची संपूर्ण टीम 19 षटकांत 159 धावांत गारद झाली. टी-20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये धावांच्या फरकाने मिळालेला हा सर्वात मोठा विजय ठरला.
सॅमसन-अभिषेक-ईशानचं वादळ
नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीला उतरलेल्या टीम इंडियाला अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन यांनी दमदार सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 98 धावांची तुफानी भागीदारी केली. अभिषेक शर्माने 21 चेंडूत 6 चौकार आणि 3 षटकारांसह 52 धावा करत अर्धशतक झळकावले. संजू सॅमसन शतकाच्या उंबरठ्यावर येऊन थांबले, त्याने 46 चेंडूत 5 चौकार आणि 8 षटकारांच्या मदतीने 89 धावा केल्या.
The energy in the stands, the belief on the field, Team India feel the love. 👏💙#INDvNZ #Champions pic.twitter.com/FvNmsRQPuO
— Star Sports (@StarSportsIndia) March 8, 2026
जसप्रीत बुमराहने न्यूझीलंडला गुंडाळलं
256 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडच्या फलंदाजांवर सुरुवातीपासूनच दबाव दिसून आला. टिम सीफर्ट आणि फिन अॅलन यांनी पहिल्या विकेटसाठी 31 धावांची भागीदारी केली, पण त्यानंतर कीवी संघाची घसरण सुरू झाली.
न्यूझीलंडकडून टिम सीफर्टने सर्वाधिक 52 धावा केल्या. त्याने 26 चेंडूत 2 चौकार आणि 5 षटकार मारले. मात्र संघातील सात फलंदाज एक अंकी धावसंख्येत बाद झाले. केवळ 72 धावांवर न्यूझीलंडचे पाच फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले होते. डॅरिल मिचेलने 11 चेंडूत 17 धावा केल्या, तर कर्णधार मिचेल सॅन्टनरने 35 चेंडूत 43 धावांची झुंज दिली, पण ती संघाला विजय मिळवून देण्यासाठी अपुरी ठरली. भारताकडून गोलंदाजीत जसप्रीत बुमराहने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या, तर अक्षर पटेलने 3 विकेट घेत न्यूझीलंडच्या फलंदाजीचा कणा मोडला.
हे ही वाचा -




















