एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पुण्यात चाईल्ड पोर्नोग्राफी करत व्हिडीओ व्हायरल, दोघा सख्ख्या भावांना अटक
टेलिकॉम उद्योगातील तज्ज्ञांच्या मते भारतात एकूण इंटरनेट वापरापैकी 70 टक्के वापर पोर्नोग्राफी बघण्यासाठी होतो. काही पॉर्न संकेतस्थळांनीही याला दुजोरा दिला आहे. इंटरनेटवर सहज उपलब्ध असलेल्या पोर्नोग्राफिमुळे तरुण विकृत मानसिकतेचे शिकार होत असून त्यातून बलात्कारासारखे गुन्हे घडत असल्याचं सांगितलं जातं आहे.
पुणे : भारतात कायद्याने चाईल्ड पोर्नोग्राफीला बंदी आहे. असे असतानाही पुणे शहरातून शंभर ते दीडशे चाईल्ड पोर्नोग्राफीचे व्हिडीओ अपलोड करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. खडक पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आली असून दोघा सख्ख्या भावांना अटक करण्यात आली आहे. राजकरण पुट्टीलाल (24) आणि मनोजकुमार सरोज (19) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.
गुगलने काही दिवसांपूर्वी 35 हजार चाईल्ड पोर्नोग्राफ व्हिडीओची माहिती केंद्र सरकारला कळविली होती. त्यानुसार केंद्र सरकारने संबंधित राज्यातील महासंचालकांना ही माहिती पाठवली होती. त्यानंतर महासंचालकांनी राज्यातील पोलीस आयुक्तांकडे ही माहिती पाठवली होती. पुण्यातून 100 ते 150 व्हिडीओ अपलोड झाल्याचे सांगण्यात आले. त्यानुसार सुरुवातीला पुण्यातील सायबर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे व्हिडीओ ज्या मोबाईल अथवा लॅपटॉपवरून अपलोड झाले आहेत. यूएलआरवरून संबंधितांचा शोध सुरू आहे.
अटक केलेले दोघे नात्याने भाऊ आहेत. राजकरण हा सिमकार्ड मालक आहे. त्याने मनोजकुमार अल्पवयीन असताना त्याला स्वतःच्या नावावर सिमकार्ड घेऊन दिले. मनोजकुमार याने स्वतःच्या मोबाईलवरून चाईल्ड पोर्नोग्राफीचा व्हिडीओ काही महिन्यांपूर्वी युट्यूबवर अपलोड केला होता. खडक पोलिसांनी दोघांनाही अटक केली. हे दोघेही मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतात.
सर्वाधिक पॉर्न पाहणाऱ्या देशात भारताचा तिसरा नंबर, पॉर्नमुळेच तरुणांमध्ये विकृती वाढत असल्याची चर्चा
हार्डकोर पॉर्न, सामूहिक बलात्काराची इच्छा....मुंबईच्या कॉलेज तरुणाईत घुसतोय विकृतीचा व्हायरस?
भारत सर्वाधिक पॉर्न पाहणारा जगातला तिसरा मोठा देश
पॉर्न हब या संकेतस्थळानुसार अमेरिका आणि ब्रिटननंतर पॉर्न पाहणारा भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा देश आहे. देशात वाढणाऱ्या बलात्काराच्या घटना या इंटरनेटवर सहज उपलब्ध होणाऱ्या पॉर्न साईट्समुळे होत असून पॉर्न साईट्सवर बंदीची मागणी झाली. मोदी सरकारने अनेक पॉर्नसाईट्सवर बंदी देखील घातली होती. मात्र आता पुन्हा अनेक पॉर्न साईट सुरु आहेत. या साईट्सवर चाईल्ड पोर्नोग्राफी देखील मोठ्या प्रमाणावर दिसून येत असल्याचा रिसर्च आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
निवडणूक
महाराष्ट्र
Advertisement