एक्स्प्लोर
रिक्षातून बाळाचं अपहरण नव्हे, आईनेच बाळाला नदीत फेकलं!
पुण्यात 10 दिवसाच्या मुलाचं अपहरण नाट्यात नवा ट्विस्ट आला आहे. संबंधित महिलेने आपल्या दहा दिवसाच्या बाळाचं अपहरण झाल्याचा दावा केला होता.
![रिक्षातून बाळाचं अपहरण नव्हे, आईनेच बाळाला नदीत फेकलं! Twist In Baby Kidnap Case Pune रिक्षातून बाळाचं अपहरण नव्हे, आईनेच बाळाला नदीत फेकलं!](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/08/17101349/pune-baby-kidnaping-1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
पुणे: पुण्यात 10 दिवसाच्या मुलाचं अपहरण नाट्यात नवा ट्विस्ट आला आहे. त्या बाळाचं अपहरण झालं नसून खुद्द आईनंच आपलं बाळ नदीत टाकल्याचं उघड झालं आहे.
संबंधित महिलेने आपल्या दहा दिवसाच्या बाळाचं अपहरण झाल्याचा दावा केला होता. मात्र आता स्वत: महिलेनेच आपलं बाळ बोपोडीच्या पुलावरुन नदीत टाकल्याचं समोर आलं आहे.
या महिलेला पहिली मुलगी आणि एक मुलगा आहे. तिसऱ्या अपत्याचा मृत्यू झाला आहे. तर आता जे बाळ नदीत टाकलं, ते तीचं चौथं अपत्य मुलगी होती.
याप्रकरणी महिलेची चौकशी सुरु असून, बाळाचाही शोध घेण्यात येत आहे.
काय आहे प्रकरण?
पुण्यातल्या बोपोडी भागात रेश्मा शेख आपल्या 10 दिवसांच्या बाळाला घेऊन शेवाळे रुग्णालयातून बाहेर पडल्या. घरी जाण्यासाठी त्या रिक्षात बसल्या, त्यावेळी रिक्षात आणखी एक महिला प्रवास करत होती.
मात्र काही अंतरावर रिक्षाचालकानं रिक्षा थांबवली आणि रिक्षातील महिला सहप्रवाशानं महिलेला रिक्षातून ढकलून देत, 10 दिवसाच्या मुलीला घेऊन दोघेही पसार झाले, असा दावा रेश्मा शेख यांनी केला होता. याबाबत खडकी पोलिसांत तक्रार दिली होती.
मात्र आता रेश्मा शेख यांचा बनाव उघड झाला आहे. त्यांनी स्वत:च आपल्या बाळाला नदीत टाकल्याचं उघड झालं आहे.
संबंधित बातम्या
आईला रिक्षातून ढकललं, 10 दिवसांच्या बाळाला घेऊन सहप्रवासी महिला फरार
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
विश्व
करमणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)