Ekda Kai zal Movie: हिंदी चित्रपटांसाठी मराठी चित्रपटाचा बळी; मराठी चित्रपटाला स्क्रिन मिळत नसल्याने सुमीत राघवन संतापला
चित्रपटाला चित्रपटगृहात स्क्रिन मिळत नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्यासंदर्भात दोघांनी देखील ट्वीट करत खंत व्यक्त केली आहे. हिंदी चित्रपटांसाठी आमचा बळी जाताना दिसतो, असं मतदेखील त्यांनी व्यक्त केलं आहे.
Ekda Kai zal Movie: संगीतकार सलील कुलकर्णी आणि अभिनेता सुमीत राघवन यांची मुख्य भूमिका असलेला 'एकदा काय झालं' हा चित्रपट काही दिवसांपुर्वी प्रदर्शित झाला. अनेक मराठी प्रेक्षकांनी या चित्रपटावर चांगल्या प्रतिक्रिया दिल्या. मात्र या चित्रपटाला चित्रपटगृहात स्क्रिन मिळत नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्यासंदर्भात दोघांनी देखील ट्वीट करत खंत व्यक्त केली आहे. हिंदी चित्रपटांसाठी आमचा बळी जाताना दिसतो, असा संताप त्यांनी व्यक्त केला आहे.
"जिथे पिकतं तिथे विकत नाही, असं काल आमच्या चित्रपटावरच्या एका पोस्टमध्ये एक वाक्य लिहिलं होतं. 'एकदा काय झालं' प्रदर्शित होऊन एक आठवडा झाला आहे. मुंबईत जेमतेम 3 शो आहेत.ठाण्याला एक शो आहे आणि महाराष्ट्रात अनेक ठिकाणी एकही शो नाही आहे. मराठी चित्रपचासाठी बुकींग होत नाही. अनेक लोक मराठी चित्रपट टीव्हीवर किंवा ओटीटी प्लॅटफार्मवर येण्याची वाट बघतात. मराठी चित्रपटाला सावत्र वागणूक दिल्याबद्दल राजकीय पक्षांना आक्षेप नाही आहे. चित्रपटाचं अनेक ठिकाणाहून कौतुक होत आहे. तरीही स्क्रिन नसल्याने चित्रपट अनेकांना बघता येत नाही आहे", अशी खंत सुमीत राघवन यांनी ट्विटरवर व्यक्त केली आहे.
फेसबुक,ट्विटर, इंस्टा सगळीकडे कौतुकाचा वर्षाव होत आहे. ऐतिहासिक,सामाजिक,राजकीय चित्रपटांच्या गर्दीत एका सर्व सामान्य कुटुंबाची गोष्ट आहे. चित्रपट बघणाऱ्या प्रत्येकाला स्वतःचं काहीतरी मिळत आहे. काहीतरी खोल आत ढवळलं जात आहे. पुन्हा एकदा नाती घट्ट करण्याच्या दृष्टीने, कुटुंबाचं महत्त्व पुन्हा दृढ करण्याच्या दृष्टीने आणि आजी आजोबांचं स्थान किती महत्त्वाचं आहे. मनं जपणं किती गरजेचं आहे. अशा एक नाहीतर अनेक गोष्टी सांगणारा हा चित्रपट आहे.त्यामुळे प्रेक्षकांनी हा चित्रपट बघायला हवा. एक उत्तम चित्रपट लुप्त होऊ देऊ नका. हिंदी बद्दल आक्षेप नाही पण विनंती आहे की किमान दोन आठवडे तरी आम्हाला द्या, अशी विनंती देखील त्यांनी प्रेक्षकांना केली आहे.
अनेक ठिकाणी किंवा शहरात स्क्रिन नाही आहे. त्या शहरात स्क्रिन वाढवण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. ज्यांनी चित्रपट पाहिला आहे. त्यांनी चांगल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. आता अनेकांनी हा चित्रपट बघायची गरज आहे, असं मत संगीतकार सलील कुलकर्णी यांनी व्यक्त केलं आहे.
A sincere appeal to the audience !!
Maximum people watch it on this
long weekend
रसिकांना कळकळीची विनंती 🙏#Ekdakayzala #morescreensforekdakayzala
@aparanjape @docbhooshan @soumitrapote @CMOMaharashtra @abpmajhatv pic.twitter.com/rxd9rLMr5x
">