एक्स्प्लोर
Advertisement
स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयीच्या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा विरोध, फर्ग्युसन महाविद्यालयातला प्रकार
'मी सावरकर' या विषयावर आयोजित वक्तृत्व स्पर्धेचे पारितोषिक वितरण समारंभ शरद पोंक्षे यांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमाला फर्ग्युसन महाविद्यालयातील पुरोगामी विचाराच्या विद्यार्थ्यांनी तीव्र विरोध केला.
पुणे : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्यानं पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये चांगलाच गोंधळ झाला. मी सावरकर या विषयावर आयोजित वक्तृत्व स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात हा गोंधळ झाला. फर्ग्युसन महाविद्यालयातील पुरोगामी विचाराच्या विद्यार्थ्यांनी याला तीव्र विरोध केला. त्यामुळं शरद पोंक्षे यांना मागच्या प्रवेशद्वारानं कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रवेश करावा लागला.
'मी सावरकर' या विषयावर आयोजित वक्तृत्व स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभ शरद पोंक्षे यांच्या हस्ते पार पडला. याला फर्ग्युसन महाविद्यालयातील पुरोगामी विचाराच्या विद्यार्थ्यांनी तीव्र विरोध केला. त्यामुळं शरद पोंक्षे यांना महाविद्यालयाच्या मागच्या प्रवेशद्वाराने कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रवेश करावा लागला. यावेळी दोन्ही गटातील विद्यार्थी आमनेसामने आले आणि त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. फर्ग्युसन महाविद्यालयाच्या आवारात यावेळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. महाविद्यालय प्रशासन नेहमीच पक्षपाती भूमिका घेत असल्याचा आरोप पुरोगामी विद्यार्थ्यांनी केला. आयोजकांनी मात्र यावर अधिक बोलण्यास नकार दिला.
Nitesh Rane on Veer Savarkar | सावरकरांबद्दल माहिती घेतल्यानंतर माझं मत बदललं : नितेश राणे
महात्मा गांधी यांची जयंती साजरी करण्याचा जेव्हा आम्ही प्रयत्न केला तेव्हा महाविद्यालय प्रशासनाने किंवा डेक्कन एज्युकेशन सोसायटीने आम्हाला जयंती साजरी करण्यास नकार दिला. दरम्यान सावरकर पुण्यतिथीचे जेव्हा आयोजन करण्यात आले तेव्हा मात्र त्याला महाविद्यालयाने परवानगी दिली असे म्हणत विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतला. यापूर्वी विद्यार्थ्यांनी प्राचार्यांकडे आणि सोसायटीच्या सचिवांकडे आपला आक्षेप नोंदविण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना दाद मिळाली नाही. जेव्हा शरद पोंक्षे आले त्यावेळी विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतल्याने शरद पोंक्षे यांना महाविद्यालयाच्या मागच्या प्रवेशद्वाराने कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रवेश करावा लागला. परंतु कार्यक्रम सुरळीत पार पडला.
संबंधित बातम्या :
सावरकर भाजपसाठी आदर किंवा श्रद्धेचा विषय नसून राजकारणाचा विषय; सामनाच्या अग्रलेखामधून भाजपवर टीका
सावरकरांचा त्याग मोठा, त्यांचं स्वातंत्र्यसाठीचं योगदान विसरता येणार नाही : हुसेन दलवाई
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्राईम
निवडणूक
निवडणूक
Advertisement