एक्स्प्लोर
मनोरुग्णाचा आईच्या डोळ्यांवर चाकूने वार
आईने गोळ्या खाण्यास आग्रह धरल्याने उपेंद्रने घरातील चाकूने डोळ्यावर हल्ला चढवला.
पिंपरी चिंचवड : मनोरुग्ण मुलाने आईच्या डोळ्यावर चाकूने वार केल्याची घटना पिंपरी चिंचवडच्या वाल्हेकरवाडीत घडली. यावेळी चाकू हटवताना आईच्या हाताला इजा झाली. पोटचा एकुलता एक मुलगा असल्याने आईने अद्याप पोलिसात तक्रार दिली नाही.
उपेंद्र सावंत असं 38 वर्षीय मनोरुग्णाचे नाव असून, जखमी झालेल्या आईचे नाव सुमन सावंत असं आहे.
आईने गोळ्या खाण्यास आग्रह धरल्याने उपेंद्रने घरातील चाकूने डोळ्यावर हल्ला चढवला. आईने वेळीच चाकू बाजूला केल्याने डोळ्याला खोलवर जखम झाली नाही. मात्र चाकू हटवताना हाताला इजा झाली. ही धक्कादायक घटना शनिवारच्या दुपारी घडली.
उपेंद्रवर येरवडा, नाशिक सह इतर मनोरुग्णालयात उपचार सुरु आहेत. नुकतंच त्याला येरवाड्यातून वडिलांनी घरी आणलं होतं. उपेंद्र नेहमीच आई-वडिलांना मारहाण करत असे. मात्र पोटचा मुलगा असल्याने मारहाण सहन केली जात होती. तर रागाच्या भरात घर सोडून जाण्याची आणि दोन-तीन दिवसांनी परत येण्याची जणू उपेंद्रला सवयच पडली होती. आता आईवर हल्ला करुन तो पसार झाला आहे.
शेजारच्यांनी सुमन यांना वायसीएम रुग्णालयात दाखल केले. वायसीएम रुग्णालयाने बाब पोलिसांच्या कानावर टाकली. मात्र उपेंद्रचे वडील आणि बहीण आल्यानंतर गुन्हा दाखल करण्यावर निर्णय घेतला जाणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्राईम
Advertisement