एक्स्प्लोर
मुंबई-पुणे रेल्वे सुरळीत होणार, सिंहगड, इंद्रायणी, इंटरसिटी, डेक्कन क्वीन आजपासून धावणार
आजपासून नियमितपणे मुंबई-पुणेदरम्यान काही गाड्या धावणार असल्या तरीही, मुंबईहून दक्षिण भारतात जाणारी रेल्वेसेवा पूर्ववत होण्यासाठी 19 ऑगस्ट उजाडणार आहे.

मुंबई : मुंबई-पुणे दरम्यानची रेल्वेसेवा जवळपास तीन आठवड्यांनंतर म्हणजे 19 ऑगस्टपासून सुरळीत होणार आहे. सिंहगड एक्स्प्रेस, डेक्कन क्वीन, इंटरसिटी एक्स्प्रेस आणि इंद्रायणी एक्स्पेस आजपासून नियमितपणे मुंबई-पुणेदरम्यान धावणार आहेत. मात्र मुंबईहून दक्षिण भारतात जाणारी रेल्वेसेवा पूर्ववत होण्यासाठी 19 ऑगस्ट उजाडणार आहे.
मुसळधार पाऊस आणि दरड कोसळल्यानं अनेक ठिकाणी रेल्वे रुळांचं मोठं नुकसान झालं होतं. मातीचा ढिगारा हलवणं आणि रेल्वे ट्रॅकची दुरुस्तीचं काम करण्यासाठी मुंबई-पुणे रेल्वेसेवा पूर्णपणे बंद करण्यात आली होती. या काळात रेल्वे बंद असल्याने प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत होतं. दरम्यान एसटी महामंडळाने गाड्या देखील वाढवल्या होत्या पंरतू त्यासुद्धा कमी पडत आहेत. त्यामुळे खासगी वाहनचालकांकडून प्रवाशांची लूट सुरु होती. मात्र आता रेल्वेसेवा सुरु झाल्याने प्रवाशांची चिंता मिटली आहे.
मुसळधार पाऊस आणि दरड कोसळल्यानं अनेक ठिकाणी रेल्वे रुळांचं मोठं नुकसान झालं होतं. मातीचा ढिगारा हलवणं आणि रेल्वे ट्रॅकची दुरुस्तीचं काम करण्यासाठी मुंबई-पुणे रेल्वेसेवा पूर्णपणे बंद करण्यात आली होती. या काळात रेल्वे बंद असल्याने प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत होतं. दरम्यान एसटी महामंडळाने गाड्या देखील वाढवल्या होत्या पंरतू त्यासुद्धा कमी पडत आहेत. त्यामुळे खासगी वाहनचालकांकडून प्रवाशांची लूट सुरु होती. मात्र आता रेल्वेसेवा सुरु झाल्याने प्रवाशांची चिंता मिटली आहे. संबंधित बातम्या रेल्वे सेवा पूर्ववत होईपर्यंत मुंबई-पुणे मार्गावर एसटीच्या ज्यादा बसेस धावणार एसटीचा रेल्वेला मदतीचा हात, मुंबई-पुणे मार्गावर दररोज एसटीच्या 180 जादा बसेस धावणार मुंबई-पुणे मार्गावर मालगाडी घसरल्याने 'या' एक्स्प्रेस रद्दFollowing Mumbai-Pune trains restored to run on 16.8.2019 in proper route. 11010 Pune-Mumbai Sinhagad Exp 11009 Mumbai-Pune Sinhagad Exp 12123 Mumbai-Pune Deccan Queen 12128 Pune-Mumbai Intercity Exp 22106 Pune-Mumbai Indrayani Exp@drmmumbaicr@drmpune
— Central Railway (@Central_Railway) August 15, 2019
आणखी वाचा























