एक्स्प्लोर
Advertisement
जेजुरीतील रशियन महिला करतेय गेल्या 28 वर्षांपासून गणरायाची प्रतिष्ठापणा
पुणे जिल्ह्यातील जेजुरीत राहणारी रशियन महिला गेल्या 28 वर्षांपासून गणरायाची प्रतिष्ठापणा आपल्या घरी करत आहे.
पुणे : आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचे चाहते देशभरातच नव्हे तर परदेशात देखील पाहायला मिळतात. पुणे जिल्ह्यातल्या पुरंदर तालुक्यातील जेजुरी येथे रशियन महिला आपल्या घरामध्ये पर्यावरण पूर्वक गणेशाची प्रतिष्ठापना करून गणेशोत्सव साजरा करत आहेत. विशेष म्हणजे गेली 28 वर्ष त्या अखंडितपणे गणरायाची आराधना करत आहे.
पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील जेजुरी येथे या कुटुंबात एक आगळावेगळा गणेशोत्सव साजरा होतो. मुळच्या रशियातील असलेल्या मरीयाना या महिलेने ख्रिश्चन धर्मातून हिंदू धर्मातील डॉ. विवेक आबनावे यांच्याशी विवाह करून सामाजिक एकतेचा संदेश दिलाय. तसेच विवाहानंतर दोन्ही कुटूंबानी आपआपल्या धार्मिक परंपरा जपण्याचे काम अखंडित सुरू आहे.. पाश्चिमात्य संस्कृतीचा पगडा वाढत असला तरी अनेक परदेशी भारतीय संस्कृतीचे चाहते आहेत. भारतात सून म्हणून आल्यानंतर मरीयाना यांनी भारतीय संस्कृतीचे धडे घेतले. सर्व सण उत्साहाने साजरा करू लागल्या. यातला त्यांचा सर्वात आवडता सण म्हणजे गणेशोत्सव. या काळात मरीयाना स्वतः आपल्या शेतातील मातीतून आकर्षक आणि मनमोहक गणेशमुर्ती बनवतात. अथर्वशीर्ष पठण करुन गणरायाची प्रतिष्ठापना करतात.
कोरोनावर भारताची पहिली लस 'कोविशिल्ड' 73 दिवसांत मिळणार?, सीरम इन्स्टिट्यूट म्हणतेय...
दरम्यान आपल्या आईसोबत त्यांची दोन्ही मुले देखील दरवर्षी मातीपासून गणेश मूर्ती बनवतात. कोणतेही चित्र समोर न ठेवता दरवर्षी वेगवेगळ्या गणेश मुर्ती साकारल्या जात असल्याने गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणीत होत असल्याचे त्यांची मुले सांगतात.
गणेशोत्सव, मोहरमसाठी पोलिसांची नियमावली जाहीर
गणेशोत्सव आणि मोहरमसाठी मुंबई पोलिसांनी नियमावली जाहीर केली आहे. दरवर्षी गणेशोत्सव बंदोबस्तासाठी हजारोंच्या संख्येने पोलिस कर्मचारी तैनात केले जातात. मात्र यंदा कोरोनाचं सावट असल्यामुळे बहुतांश गणेश मंडळांनी गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे दरवर्षी लागणारा पोलिसांचा मोठा बंदोबस्त यावर्षी कमी प्रमाणात लागणार आहे. 22 ऑगस्ट ते 2 सप्टेंबरपर्यंत गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. तर 21 ऑगस्ट ते 30 ऑगस्टपर्यंत मोहरम साजरा करण्यात येणार आहे.
Bappa Majha 2020 | घरच्या घरी बाप्पाची प्रतिमा कशी तयार करायची?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
कोल्हापूर
निवडणूक
निवडणूक
Advertisement