कोरोनावर भारताची पहिली लस 'कोविशिल्ड' 73 दिवसांत मिळणार?, सीरम इन्स्टिट्यूट म्हणतेय...
कोविडशिल्ड लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या सुरु आहेत. त्याचे सकारात्मक परिणाम समोर आल्यानंतरच लसीच्या उपलब्धतेबद्दल अधिकृत घोषणा करण्यात येईल असं सीरमनं म्हटलं आहे.
नवी दिल्ली : कोरोना लसीबाबत कोणतीही डेडलाईन निश्चित झाली नसल्याचं स्पष्टीकरण पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटकडून देण्यात आलं. सध्या सरकारकडून केवळ लस बनवण्याची आणि जमा करुन ठेवण्याची परवानगी मिळाल्याचं सीरमनं स्पष्ट केलंय. सीरम इन्स्टिट्यूटकडून कोविडशिल्ड लसीवर काम सुरु आहे. या लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या सुरु आहेत. त्याचे सकारात्मक परिणाम समोर आल्यानंतरच लसीच्या उपलब्धतेबद्दल अधिकृत घोषणा करण्यात येईल असं सीरमनं म्हटलंय. 73 दिवसांत देशात कोरोनावर लस उपलब्ध होईल असं वृत्त बिझनेस टुडेनं प्रसिद्ध केलं होतं. त्या वृत्तावर सीरमनं आता स्पष्टीकरण दिलंय.
कोविशिल्ड’च्या उपलब्धतेविषयी माध्यमांमध्ये सध्या जे दावे केले जात आहेत, ते पुर्णपणे खोटे व अंदाजावर आधारित आहेत. अद्याप सिरमच्या लशीच्या तिसऱ्या टप्प्याच्या ट्रायल्स सुरू आहे. त्याचे सकारात्मक परिणाम समोर आल्यानंतरच लशीच्या उपलब्धतेबद्दल अधिकृत घोषणा केली जाणार आहे.
Serum Institute of India clarifies that the current claims over COVISHIELD's availability, in the media are completely false and conjectural. Presently, government has granted us permission to only manufacture the vaccine and stockpile it for future use: Serum Institute of India pic.twitter.com/hMyCrwzXON
— ANI (@ANI) August 23, 2020
भारतात कोरोना लसीचं काऊंटडाऊन सुरु झालंय. बिझनेस टुडेच्या वृत्तानुसार 73 दिवसांत देशात कोरोनावर लस उपलब्ध होणार आहे. पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटकडून कोविडशिल्ड या लसीवर काम सुरु आहे. बिझनेस टुडेच्या वृत्तानुसार राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमांतर्गत भारत सरकार भारतीयांना कोरोनाची लस मोफत देणार आहे.
संबंधित बातम्या :Corona Vaccine | भारतात कधी आणि केव्हा येणार रशियन कोरोना वॅक्सिन?