एक्स्प्लोर

Ravindra dhangekar : शपथविधीपूर्वी धंगेकरांचा चंद्रकांत दादांना नमस्कार; सभागृहात घुमल्या 'हु इज धंगेकर'च्या घोषणा

कसबा मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार रविंद्र धंगेकर (Ravindra dhangekar)  यांचा आज शपथविधी पार पडला. मात्र शपथविधीपूर्वी केलेल्या एका कृतीमुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले.

Ravindra dhangekar : कसबा मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार रविंद्र धंगेकर (Ravindra dhangekar)  यांचा आज शपथविधी पार पडला. मात्र शपथविधी पूर्वी केलेल्या एका कृतीमुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले. शपथविधी पूर्वी धंगेकरांनी "हू इज धंगेकर" म्हणणाऱ्या पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या जवळ जाऊन नमस्कार केला. त्यावेळी हू इज धंगेकर अशा घोषणा देण्यात आल्या.

रविंद्र धंगेकर कसब्यातून निवडून आल्यानंतर "हू इज धंगेकर" हा चंद्रकांत पाटील यांनी प्रचाराता मारलेला डायलॉग खूप फेमस झाला होता. या डायलॉगमुळे चंद्रकांत पाटलांना कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी चांगलंच ट्रोल केलं. धंगेकर ईज नाऊ एमएलए असे पोस्टर्स लावले होते. त्यानंतर रविंद्र धंगेकरांनी निवडून आल्यानंतर मी रविंद्र धंगेकर असं प्रत्युत्तर दिलं होतं. त्यानंतर आज विधानसभेत शपथविधीपूर्वी त्यांनी चंद्रकांत पाटलांना नमस्कार केल्याने पून्हा एकदा  "हू इज धंगेकर" च्या घोषणा रंगल्या.

डायलॉगची राज्यभर चर्चा

भाजपने कसबा पोटनिवडणुकीत धंगेकरांना पराभूत करण्यासाठी चांगलीच फौज मैदानात उतरवली होती. रोड शो, प्रचारसभा, कोपरा सभा घेतल्या होत्या. त्याशिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील मैदानात उतरले होते. त्यावेळी चंद्रकांत पाटलांनी प्रचार सभेत रवींद्र धंगेकरांना चांगलंच डिवचलं होतं. भरसभेत हू इज धंगेकर तो आमच्यासमोर टिकू शकत नाही असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर धंगेकरांचे समर्थक पेटून उटले होते त्यांनी सगळ्या कसब्यात पुणेरी पाट्या लावल्या होत्या. विजयानंतर त्यांनी ही कविता व्हायरल करुन चंद्रकात पाटलांना चांंगलंच उत्तर दिलं. धंगेकर नाऊ.. MLA असं आता सगळीकडे व्हायरल केलं. कसबा हा मागील 28 वर्षांपासून भाजपचा बालेकिल्ला आहे. खासदार गिरीश बापट यांच्यानंतर मुक्ता टिळकांनी कसब्याचा विकास केला. त्यानंतर पहिल्यांदाच या मतदारसंघात कॉंग्रेसने मुसंडी मारली आहे. ही निवडणूक भाजपने मोठी प्रतिष्ठेची केली होती. त्यामुळे रवींद्र धंगेकर यांचा हा विजय भाजपला मोठा धक्का मानला जात आहे. 

हू इज रविंद्र धंगेकर विचारल्यावर चंद्रकांत पाटील 'शांत'

चंद्रकांत पाटील हे चिंचवडच्या विजयी आमदार अश्विनी जगताप याचं अभिनंदन करायला गेले होते. त्यावेळी पत्रकारांनी त्यांना हू इज धंगेकर विचारल्यास त्यांनी उत्तर देण्यास चंद्रकांत पाटलांनी टाळाटाळ केली होती. कसब्याची पोटनिवडणूक महाविकास आघाडीच्या रविंद्र धंगेकर यांनी जिंकल्यानंतर कोल्हापुरात देखील होर्डिंग लावण्यात आले. मात्र या होर्डिंगवर 'धीस इज धंगेकर' म्हणत चंद्रकांत पाटील यांच्यावर महाविकास आघाडीने टीका केली आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
Embed widget