Pune University Startup Fund: पुणे विद्यापीठ 'स्टार्टअप्स'ला देणार निधी; असा करावा लागेल अर्ज
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 'SPPU रिसर्च पार्क फाउंडेशन' ला स्टार्टअप इंडिया योजनेअंतर्गत 5 कोटी ‘सीड फंड मिळाला आहे. ज्या अंतर्गत निवडक स्टार्टअप्सना निधी उपलब्ध करून दिला जाईल.
Pune University Startup Fund: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Pune University) 'SPPU रिसर्च पार्क फाउंडेशन' ला स्टार्टअप इंडिया योजनेअंतर्गत 5 कोटी ‘सीड फंड मिळाला आहे. ज्या अंतर्गत निवडक स्टार्टअप्सना निधी उपलब्ध करून दिला जाईल. यासाठी अर्ज करण्याचे आवाहन पुणे विद्यापीठाने केले आहे. 'एसपीपीयू रिसर्च पार्क फाउंडेशन' ही स्टार्टअप्सच्या क्षेत्रात काम करणारी सेक्शन 8 कंपनी आहे. केंद्र सरकारच्या ‘स्टार्टअप इंडिया’ कार्यक्रमांतर्गत ‘सीड फंड योजने’च्या माध्यमातून फाऊंडेशनला हा निधी मिळाला आहे. चांगल्या स्टार्टअप्सना मदत मिळण्याची ही संधी आहे. कोणतीही नोंदणीकृत कंपनी, गट, व्यक्ती या या निधीसाठी अर्ज करू शकतात. यासाठी पात्रता अटी https://seedfund.startupindia.gov.in/ वर जाहीर केल्या आहेत.
अर्ज कोण करु शकतात?
स्टार्टअप संकल्पना, उत्पादन विकास, उत्पादन चाचणी, बाजारपेठेत प्रवेश आणि व्यापारीकरणासाठी अर्ज करू शकतात. प्राप्त अर्जांची तज्ञांच्या समितीमार्फत छाननी केली जाईल. अर्जदारांना 45 दिवसांच्या आत निकालाची सूचना दिली जाईल. सुरुवातीच्या टप्प्यात स्टार्टअप्ससाठी 20% निधी प्रदान केला जाईल, तर उर्वरित स्टार्टअप्सचे डिबेंचरमध्ये रूपांतर केले जाईल. केवळ DIPP अंतर्गत नोंदणीकृत स्टार्टअपच या निधीसाठी अर्ज करू शकतात. दोन वर्षांपेक्षा जुन्या कंपन्या यासाठी अर्ज करू शकणार नाहीत, असं सेंटर फॉर इनोव्हेशन, इनोव्हेशन अँड कोलॅबोरेशन डायरेक्टर डॉ. अपूर्व पालकर यांनी सांगितलं.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेंटर फॉर इनोव्हेशन, इनोव्हेशन अँड कोलॅबोरेशन आणि रिसर्च पार्क फाउंडेशनतर्फे विद्यार्थ्यांना स्टार्टअप मार्गदर्शन केले जाते. हा सीड फंड अनेक स्टार्टअप्सना त्यांचे नवकल्पना प्रत्यक्षात आणण्यास मदत करेल, असाही विश्वास त्यांनी दर्शवला.
सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या प्रवेश नोंदणीची 12 जुलै अंतिम तारीख
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात UG आणि PG या दोन्ही अभ्यासक्रमांसाठी नोंदणी प्रक्रिया सुरु झाली आहे. UG आणि PG या दोन्हीसाठी अनेक विषयांत प्रवेश प्राप्त करण्यासाठी 2022 या वर्षाची नोंदणी सुरु झाली आहे. या नोंदणी प्रक्रियेसाठी 12 जुलै 2022 ही शेवटची तारीख असणार आहे. unipune.ac.in या संकेतस्थळावर तुम्हाला संपुर्ण माहिती प्राप्त होणार आहे.