एक्स्प्लोर
पुण्यात आरटीआय कार्यकर्त्याचा मृतदेह ताम्हिणी घाटात आढळला, हत्याचा झाल्याचा कुटुंबीयांचा आरोप
विनायक शिरसाट 5 फेब्रुवारीपासून भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीतून बेपत्ता होते. त्यांचं अपहरण झाल्याची तक्रार कुटुंबीयांनी दिली होती.

पुणे : मागील काही दिवसांपासून बेपत्ता असलेले पुण्यातील माहिती अधिकार कार्यकर्ते विनायक शिरसाट यांचा मृतदेह ताम्हिणी घाटात आढळला. शिरसाट यांचा खून झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
विनायक शिरसाट 5 फेब्रुवारीपासून भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीतून बेपत्ता होते. त्यांचं अपहरण झाल्याची तक्रार कुटुंबीयांनी दिली होती. त्यानुसार भारती विद्यापीठ पोलिसांनी तपासही सुरु केला होता.
VIDEO | ताम्हिणी घाटात सापडला आरटीआय कार्यकर्त्याचा मृतदेह | पुणे | एबीपी माझा
शिरसाट यांचं शेवटचं मोबाईल लोकेशन ताम्हिणी घाटात दाखवत होतं. त्यानुसार शोध घेत असताना पोलिस ताम्हिणी घाटात पोहोचले. तिथे सोमवारी (11 फेब्रुवारी) दुपारी त्यांचा मृतदेह सापडला. पोलिस अधिक तपास करत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
क्राईम
कोल्हापूर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
