Pune News: धावत्या दुचाकीवर बिबट्याची झडप; पुण्याच्या जुन्नरमधील धक्कादायक घटना सीसीटीव्हीत कैद, परिसरात पुन्हा भीती वाढली
Pune News: अशातच कल्याण नगर महामार्गावर ओतूर येथे बिबट्याची दहशद पसरल्याचं दिसून आलं आहे. रस्त्याच्या कडेला दबा धरून बसलेल्या बिबट्याने दुचाकीवर झडप घातल्याचं दिसून आलं.

पुणे : पुण्यातील जुन्नरमध्ये बिबट्याची दहशत दिवसेंदिवस (Leopard attack) मोठ्या प्रमाणावर वाढू लागली आहे. मानव-बिबट यांच्यातील संघर्षात अनेकांनी जीव गमावले आहेत. बिबट्याच्या वावरामुळे नागरिकांना घराबाहेर पडणे मुश्किल झालं आहे. हिंसक बिबटे आता लोकांच्या (Leopard attack) घरातही शिरू लागले आहेत. अशातच कल्याण नगर महामार्गावर ओतूर येथे बिबट्याची दहशद (Leopard attack) पसरल्याचं दिसून आलं आहे. रस्त्याच्या कडेला दबा धरून बसलेल्या बिबट्याने दुचाकीवर झडप घातल्याचं दिसून आलं. (Leopard attack)
Leopard attack: दुचाकीला धडक दिल्यानंतर बिबट्या तेथून पसार
चालत्या दुचाकीवर बिबट्याने झडप घातल्याने परिसरात भीतीचे सावट (Leopard attack) पसरले आहे. खताची गोण घेऊन जाणारा शेतकरी बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर आळेफाटा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सिताराम निलेश डोके असे जखमी शेतकऱ्याचे नाव आहे. संपूर्ण घटना सीसीटीव्ही (Leopard attack) कॅमेऱ्यात कैद झाली आहे. दुचाकीला धडक दिल्यानंतर बिबट्या तेथून पसार झाल्याची माहिती समोर आली आहे. कल्याण नगर महामार्गावर बिबट्यांचा वावर वाढला आहे. अनेकवेळा मोठ्या वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाल्याच्या घटना अधोरेखित झाल्या आहेत. मात्र दुचाकीवर बिबट्याने झडप घातल्याने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. (Leopard attack)
धावत्या दुचाकीवर बिबट्याची झडप, पुण्याच्या जुन्नरमधील धक्कादायक घटना सीसीटीव्हीत कैद#Punenews #Leopard #bike #CCTV #video pic.twitter.com/EUk4KOHqYG
— Ankita Shantinath Khane (@KhaneAnkita) November 13, 2025
Leopard attack: बिबट्याच्या दहशतीनं तरुणांची सोयरीक जुळेना, भयानक वास्तव समोर
उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये बिबट्याच्या भीतीमुळे सोयरीक जुळता जुळेना अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. शेकडो तरुणांची लग्न रखडल्याची खंत नागरिक व्यक्त करतायेत. पोरं करती धरती झालीत आता कधी एकदा त्यांच्या डोक्यावरती अक्षदा पडतात या आतुरतेने एकीकडे आई-वडिलांचा जीव व्याकुळलाय तर दुसरीकडे ही पोरही लग्नाची स्वप्न रंगवतायेत खरं...पण दुर्दैवानं लाल रक्ताला सटवलेला बिबट्या तरुणांच्या या गुलाबी स्वप्नांचाही फडशा पाडतोय.
हे धक्कादायक वास्तव्य आहे बिबट्याच्या दहशतीखाली वावरत असलेल्या खेड आंबेगाव जुन्नर आणि शिरूर तालुक्यातील गावांमधील... केवळ बिबट्याच्या भीतीपोटी या परिसरातील तरुणांना आपल्या पोटचा गोळा देण्यासाठी मुलीचे आई-वडील तयार नाहीयेत... सोयरी जोडण्यास स्पष्ट नकार मिळत असल्याने शेकडो तरुणांची लग्न रखडली आहे... या बिबट्याच्या भीतीमुळे सुट्टीच्या दिवसात मामाचे गावही नको रे अशी म्हणण्याची वेळ अनेक लाडक्या भाचे भाच्यांवर आली आहे... गावागावातील शेतशिवारांमध्ये झुंडीने फिरणाऱ्या या बिबट्यांच्या टोळीने आज पर्यंत कित्येक पशुधनावर तर हल्ला केलाच मात्र अनेकांचे बळी ही घेतले... बिबट्याच्या दहशतीचा परिणाम सामाजिक जीवनावरील झाला असून गावातील शेकडो तरुण विल सेटल असूनही त्यांना लग्नासाठी मुली मिळत नसल्याने पालकांच्या चिंता वाढल्यात.
























