एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पुण्यात समलैंगिक संबंधांना विरोध दर्शवल्याने मित्राची हत्या, दोन तासात खुनाचा छडा
पुण्यात जळालेल्या अवस्थेत सापडलेल्या मृतदेहाचं गूढ उकललं आहे. अवघ्या दोन तासांत खुनाचा छडा लावत आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. समलैंगिक संबंधांना विरोध दर्शवल्याने हत्या केल्याचं आरोपीने कबूल केलं आहे.
पुणे : समलिंगी संबंधांना विरोध दर्शवल्याने मित्राची हत्या केल्याची घटना पुण्यात घडली आहे. पोलिसांनी अवघ्या दोन तासात खुनाचा छडा लावून आरोपीला अटक केली. बंडू निरंजन इंगळे (वय 40 वर्ष) असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव असून आरोपीचं नाव वीरेंद्र रामविलास सिंह (वय 20 वर्ष) आहे. सिंहगड पोलिसांनी त्याला अटक केली असून समलैंगिक संबंधाना विरोध केल्याची कबुली त्याने दिली.
वडगाव बुद्रुक येथील सिंहगड महाविद्यालयाजवळील टेकडीवर बुधवारी (11 मार्च) सकाळी बंडू इंगळे यांचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह सापडला होता. पोलिसांना मृत बंडू इंगळे यांच्या पॅन्टमध्ये ईसीजी रिपोर्ट सापडला. त्यावर एक मोबाईल क्रमांक होता. त्यानुसार पोलिसांनी फोन करुन संबंधित व्यक्तीकडे चौकशी केली. मंगळवारी (10 मार्च) रात्री वीरेंद्र रामविलास सिंह हा मृत बंडू इंगळे यांच्यासोबत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी वीरेंद्र सिंहला ताब्यात घेऊन चौकशी केली. बंडू इंगळेंनी समलैंगिक संबंधांना विरोध दर्शवल्याने आपण दारुच्या नशेत त्यांचा खून केल्याची कबुली वीरेंद्र सिंहने दिली.
आरोपी आणि मृत दोघेही मजुरीची कामं करतात. एका बांधकाम साईटवर त्यांची ओळख झाली होती. आरोपी उत्तर प्रदेशातील असून कामानिमित्त तो पुण्यात राहतो. मंगळवारी रात्री ते टेकडीवर दारु पीत बसले होते. यावेळी वीरेंद्र सिंहने बंडू इंगळेकडे समलैंगिक संबंधांची मागणी केली. मात्र बंडू इंगळेने विरोध केल्याने आरोपीने रागाच्या भरात त्याच्या डोक्यात बिअरची बाटली फोडली. त्यानंतर दगडाने त्याचे डोके ठेचले. मग आसपासची लाकडं गोळा करुन त्याला पेटवून दिले.
बुधवारी सकाळी बंडू इंगळेचा मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास केला आणि अवघ्या दोन तासात आरोपीला अटक केली.
Pune Crime | समलैंगिक संबंधाला विरोध केल्याने खून, दोन तासांत खुनाचा छडा, आरोपी अटकेत
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement