एक्स्प्लोर

रोहित पवार म्हणाले, अपघातापूर्वी विमानतळाची रेकी झाली; धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया, काल उठून...

बारामती विमान दुर्घटनेतील काही गोष्टींचा देखील क्रिमीनल ॲंगलने तपास केला गेला पाहिजे, “काही लोकांच्या मते विमानतळाची रेकी झाली होती.

मुंबई : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या अपघाती निधनाचा अहवाल डीजीसीएकडून समोर आला आहे. या अहवालानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार तथा अजित पवारांचे पुतणे रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन आज अनेक प्रश्न उपस्थित केले. नागरी उड्डाणमंत्री, डीजीसीए आणि व्हीएसआर कंपनीचे मालक यांच्यातील जवळीक रोहित पवार (Rohit Pawar) यांनी दाखवत गंभीर आरोप केले आहेत. यासंदर्भात आता राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडेंनी प्रतिक्रिया दिली. 

बारामती विमान दुर्घटनेतील काही गोष्टींचा देखील क्रिमीनल ॲंगलने तपास केला गेला पाहिजे, “काही लोकांच्या मते विमानतळाची रेकी झाली होती. अपघातापूर्वी रेकी झाली होती. याची आम्हाला पक्की माहिती नाही. पण त्या अँगलने चौकशी झाली पाहिजे. याचा सखोल तपास केला गेला पाहिजे अशी मागणी आमदार रोहित पवारांनी पत्रकार परिषदेतून केली. त्यासंदर्भात आमदार धनंजय मुंडे यांना विचारले असता, त्यांनी सावध प्रतिक्रिया दिली. 

रोहित पवारांच्या आरोपावर धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया

आमदार रोहित पवार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच, अपघातापूर्वी बारामती विमानतळाची रेकी करण्यात आली होती? असा आरोपही त्यांनी केला. याबाबत धनंजय मुंडेंना प्रश्न विचारला असता, मला ते कसं करतात याची माहिती नाही. यासंदर्भात जे मांडत नाहीत, त्यांना अनुभव जास्त आहे. काल उठून याविषयावर मांडत आहेत, पण परवा दादांच्याविषयी काहीतरी वेगळंच बोलत होते. हा सगळा संभ्रम आहे, त्यामुळे मी यावर बोलणं उचित नाही, असे मी समजतो, अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडेंनी रोहित पवार यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर दिली आहे. मला याबाबतीत अधिक काही बोलायचं नाही, विश्वास-अविश्वास हे, बाकी जशा गोष्टी समोर आल्या तशा येतील. खरं कोण मांडत होतं, खरं कोण भांडत होतं? नेमकं त्याला खरं की खोटं काय माहिती होतं, असेही धनंजय मुंडेंनी म्हटले. 

रोहित पवार एव्हीगेशन एक्स्पर्ट झाले आहेत - राणे

आमदार रोहित पवार यांनी डीजीसीए आणि व्हीएसआर कंपनीसंदर्भात पत्रकार परिषद घेऊन आज पुन्हा एकदा अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यावर, आता मंत्री नितेश राणे यांनी पलटवार केला आहे. रोहित पवार आता एव्हीगेशन एक्स्पर्ट झाले आहेत, तुमची माहिती फॉर्मल ॲथोरिटीकडे द्या, असे त्यांनी म्हटलं. रोहित पवार आता फक्त पायलट बनायचे बाकी आहेत, देशाचा कायदा रोहित पवार यांना माहीत आहे, असा टोलाच नितेश राणेंनी लगावला.

जयंत पाटील यांच्यावर बोलणे टाळले

राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासंदर्भात जयंत पाटील यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल धनंजय मुंडेंना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, याविषयी मी काही बोलू शकत नाही. त्यावर पक्षाचे नेतृत्व आणि वरिष्ठ नेते बोलतील, असे धनंजय मुंडेंनी म्हटले.

अंजली दमानियांच्या आरोपावर प्रतिक्रिया

कृषी विभागाच्या अंतर्गत शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढावं यासाठी कृषी विभागाने विविध गोष्टी खरेदी केल्या, त्या विषयावर एवढं रान पेटवलं. कोर्टात गेले, तेव्हा हायकोर्टाने स्पष्ट सांगितलं की, खोटे पुरावे देऊन हे प्रकरण कोर्टात आणलं. कोर्टाने 1 लाखांचा दंड लावला आणि आम्हाला क्लीन चिट दिली. माझ्याविरुद्ध हा षडयंत्राचाच भाग होता. ते लोकांयुक्तांकडे गेले, त्यांनी सुद्धा क्लीन चिट दिली आणि सांगितलं यामध्ये कुठेही पुरावे नाहीत. त्यामुळे, जे खरं काय आहे ते समोर आल्याची प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी अंजली दमानिया यांनी केलेल्या आरोपावर आणि लोकायुक्तांच्या निर्णयावर दिली आहे. मी कोर्ट आणि लोकांयुक्तांचे आभार मानतो, अंजली दमनिया यांनी केलेले आरोप, आत्तापर्यत त्यांनी संपूर्ण आयुष्यात अनेक नेत्यांवर आरोप केले. मात्र, यातला कोणता आरोप खरा निघाला? माझ्याबद्दल किती मोठं षडयंत्र होतं, असेही मुंडेंनी म्हटलं.

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

रोहित पवार म्हणाले, अपघातापूर्वी विमानतळाची रेकी झाली; धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया, काल उठून...
रोहित पवार म्हणाले, अपघातापूर्वी विमानतळाची रेकी झाली; धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया, काल उठून...
Maharashtra Budget Session 2026: विमान डाव्या नव्हे उजव्या बाजूला झुकलं; रोहित पवारांकडून व्हिडीओ दाखवून DGCA च्या अहवालाची चिरफाड
Maharashtra Budget Session 2026: विमान डाव्या नव्हे उजव्या बाजूला झुकलं; रोहित पवारांकडून व्हिडीओ दाखवून DGCA च्या अहवालाची चिरफाड
Raj Thackeray And Uddhav Thackeray मोठी बातमी: ठाकरे बंधूंमध्ये पुन्हा एकदा वितुष्ट; उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंसोबत अबोला, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी: ठाकरे बंधूंमध्ये पुन्हा एकदा वितुष्ट; उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंसोबत अबोला, काय घडलं?
Sachin Kalyanshetti vs Bhaskar Jadhav : तुम्ही बाप का काढला, भाजप आमदार भास्कर जाधवांना भिडला, विधीमंडळ परिसरात आमदारांची बाचाबाची!
तुम्ही बाप का काढला, भाजप आमदार भास्कर जाधवांना भिडला, विधीमंडळ परिसरात आमदारांची बाचाबाची!
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Jayant Patil on NCP Merger : विलिनीकरणाची चर्चा थांबली, ज्यांच्याशी चर्चा केली ते दादाच नाहीत
Sanjay Raut Mumbai PC : जे काय होईल ते एकमतानेच होईल सातवी जागा मविआ म्हणूनच जिंकू
Raj Thackeray MNS On BMC Ward Committees Election:उद्धव ठाकरेंच्या त्या निर्णयामुळे राज ठाकरे नाराज?
Rajyasabha Election : शरद पवारांना उमेदवारी न दिल्यास भाजप मोठा निर्णय घेणार
Iran–Israel Conflict : इराण इस्त्रायल युद्धाच्या सर्व बातम्या एका क्लिकवर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सन 2024 सालाच्या तुलनेत 2025 साली राज्यात बेपत्ता महिला व अल्पवयीन मुलींची संख्या अधिक; राज्य सरकारच्याच आकडेवारीतून धक्कादायक वास्तव
सन 2024 सालाच्या तुलनेत 2025 साली राज्यात बेपत्ता महिला व अल्पवयीन मुलींची संख्या अधिक; राज्य सरकारच्याच आकडेवारीतून धक्कादायक वास्तव
Maharashtra Rajya Sabha Election: आधी बिहार काबीज करून दिलं अन् आता केरळ मोहिमेवर; निष्ठा अन् इमानदारीचं फळ राज्यसभेला मिळताच विनोद तावडे काय म्हणाले?
आधी बिहार काबीज करून दिलं अन् आता केरळ मोहिमेवर; निष्ठा अन् इमानदारीचं फळ राज्यसभेला मिळताच विनोद तावडे काय म्हणाले?
Sanjay Raut: दिल्लीतील काँग्रेस नेत्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंशी चर्चा, तो निर्णय...; संजय राऊतांनी मविआच्या राज्यसभेतील एका जागेवर केलं स्पष्टपणे भाष्य
दिल्लीतील काँग्रेस नेत्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंशी चर्चा, तो निर्णय...; संजय राऊतांनी मविआच्या राज्यसभेतील एका जागेवर केलं स्पष्टपणे भाष्य
मोठी बातमी ! बारामती अन् राहुरीची पोटनिवडणूक एकत्रच; सुजय विखेंनी सांगितलं राहुरीतील उमेदवाराचं नाव
मोठी बातमी ! बारामती अन् राहुरीची पोटनिवडणूक एकत्रच; सुजय विखेंनी सांगितलं राहुरीतील उमेदवाराचं नाव
Rohit Pawar on VSR: ..तेव्हा एकनाथ शिंदेंचं विमान पाडू अशी धमकी इराण-इराकने दिली होती, रोहित पवारांचा VSR च्या बेजबाबदारपणावर खळबळनजक आरोप
..तेव्हा एकनाथ शिंदेंचं विमान पाडू अशी धमकी इराण-इराकने दिली होती, रोहित पवारांचा VSR च्या बेजबाबदारपणावर खळबळनजक आरोप
Nashik Crime: गुंगीचे औषध अन् मद्य पाजलं, दहावीच्या विद्यार्थ्यांकडून 5वी ते 7वीच्या चिमुकल्यांसोबत नको ते कृत्य; समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहातील संतापजनक प्रकार
गुंगीचे औषध अन् मद्य पाजलं, दहावीच्या विद्यार्थ्यांकडून 5वी ते 7वीच्या चिमुकल्यांसोबत नको ते कृत्य; इगतपुरीच्या समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहातील संतापजनक प्रकार
Maharashtra Rajya Sabha Election: राज्यसभेसाठी भाजपकडून चार नव्या चेहऱ्यांना संधी, एका महिलेचाही समावेश, पण केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचं काय?
राज्यसभेसाठी भाजपकडून चार नव्या चेहऱ्यांना संधी, एका महिलेचाही समावेश, पण केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचं काय?
Vasai Crime News: 5 ते 6 मद्यधुंद तरुण एकाला लुटायला गेले; रिक्षाचालक मदतीला धावला अन् जीवावर बेतलं, धारदार शस्त्राने हल्ला; 26 टाके पडले, वसईतील घटना
5 ते 6 मद्यधुंद तरुण एकाला लुटायला गेले; रिक्षाचालक मदतीला धावला अन् जीवावर बेतलं, धारदार शस्त्राने हल्ला; 26 टाके पडले, वसईतील घटना
Embed widget