Pune Crime News: पुणे गुन्हे शाखेचा जुगार अड्ड्यावर छापा; 5 लाखांच्या मुद्देमालासह 17 आरोपींविरुद्ध कारवाई
पुणे गुन्हा शाखेकडून अवैध जुगाराविरोधात मोठी कारवाई केली आहे. रात्री सुरु असणाऱ्या अवैध जुगार अड्ड्यावर छापा टाकला आहे. 5 लाखांच्या मुद्देमालासह 17 आरोपींविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.
Pune Crime News: पुणे गुन्हा शाखेकडून अवैध जुगाराविरोधात मोठी कारवाई केली आहे. रात्री सुरु असणाऱ्या अवैध जुगार अड्ड्यावर छापा टाकला आहे. चतुःश्रृंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये, दर्शन रीव्हर साईड हाॅटेल, सांगवी स्पायसर रोडवरील या हाॅटेलमध्ये आणि हाॅटेलबाहेर मोकळ्या जागेत बेकायदेशीर जुगार खेळत असल्याचं समजल्यावर चतुश्रुंगी पोलीस ठाण्याने ही मोठी कारवाई केली.
या ठिकाणी विदेशी मद्याचा साठा आणि विक्री सुरु होती. या कारवाईत सुमारे 5.26 लाखांच्या मुद्देमालाचा साठा देखील जप्त केला आणि 17 जणांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम 4(अ), 5 आणि 12 (अ) व महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 65 (ई) अंतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
विजयसिंग दलपतसिंग चौहान, सुरज प्रितीश साळुंखे, संकेत नंदू कदम, फारुख सैफ खान, ईश्वर बाबुराव दामोदर,ईश्वर बाबुराव दामोदर, ईश्वर बाबुराव दामोदर, ) सचिन सुभाष सीताफळेमुगलअप्पा बसप्पा कानकुर्ती, मोहम्मद झुलकार मजहर खान, प्रमोद रमेश धेंडे, नवल नहाडे,चंद्रकांत कबीर जाधव अशी आरोपींची नावे आहेत. बाकी पाच आरोपी अद्याप फरार आहेत.
गेल्या काही दिवसांपासून सामाजिक सुरक्षा विभागाकडून जुगार धाड सत्र सुरू असल्याने जुगार चालकांनी नवीन शक्कल लढवून मोबाईल जुगार सुरू केला आहे. यात जुगार खेळणारे व खेळवणारे हे एखाद्या कारमध्ये, रिक्षात किंवा दुचाकीवर बसून खेळी कडून मटका आकडा, सोरट व रक्कमेची देवाण घेवाण करतात. पोलीस कारवाईची थोडी जरी खबर लागल्यास त्याच गाडीतून पसार होतात. पण या कारवाईत चारचाकी व दुचाकी वाहनांववरून घटनास्थळी मोबाईल जुगार खेळला जात होता ती वाहनेसुद्धा जप्त करण्यात आली आहे.
हा अड्डा अनेक वर्षांपासून सांगवी परिसरातील नदीजवळ सुरु होता मात्र गेले काही दिवस पुण्यात मुसळधार पाऊस सुरु असल्याने नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे या आरोपींनी त्यांच्या अड्डा दर्शन रीव्हर साईड हाॅटेलमध्ये हलवला. याच भागात बेकायदेशीर विक्री देखील सुरु होती. त्यामुळे जुगार कारवाई बरोबरच दारुबंदी कायद्यानुसारही कारवाई करण्यात आली आणि विदेशी दारुचाही सर्व साठा जप्त करण्यात आला आहे.