PM Naredra modi Pune : 'या' कारणामुळे बदललं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुण्यातील सभेचं ठिकाण , S.P कॉलेज नाही तर 'या' मैदानावर होणार सभा
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 29 एप्रिलला पुण्यात होणाऱ्या सभेचे ठिकाण बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुण्यातील एसपी कॉलेजच्या मैदानावर आयोजित करण्यात आली होती.
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) 29 एप्रिलला पुण्यात होणाऱ्या सभेचे ठिकाण बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुण्यातील एसपी कॉलेजच्या मैदानावर आयोजित करण्यात आली होती. मात्र आता ही सभा पुण्यातील रेसकोर्सच्या मैदानावर आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संपूर्ण व्यवस्था लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचं भाजपकडून सांगण्यात आलं आहे.
पुण्यात 29 एप्रिलला संध्याकाळी महायुतीच्या पुणे जिल्ह्यातील चारही उमेदवारांच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदींची सभा आयोजित करण्यात आली आहे. स . प. महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित करण्यात आली होती मात्र हे ठिकाण बदलण्यात आले. आता रेसकोर्सच्या मैदानावर सभा आयोजित करण्यात येणार आहे. मोदींच्या सभेला प्रचंड प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता असते. त्यात अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होण्याचीदेखील शक्यता असते. या सगळ्याचा विचार करुन भाजपकडून करण्यात आला आहे. त्यामुळे थेट कार्यक्रमाचं ठिकाण बदलण्यात आलं आहे.
पुण्यातील स.प. महाविद्यालय हे पुण्याच्या मध्यवर्ती भागात आहे. त्यामुळे या ठिकाणी पार्किंगची सोय होणार नाही. त्यासोबतच वाहतुकीचादेखील मोठ्या प्रमाणात प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. सभेसाठी होणाऱ्या गर्दीमुळे इतर पुणेकरांना कोणताही त्रास होऊ नये, म्हणून मोठ्या मैदानावर ही सभा घेण्याचा निर्णय़ घेण्यात आला आहे. या सभेच्या वेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. संपूर्ण सुरक्षा बाळगली जाणार आहे.
मुरलीधर मोहोळ अन् इतर तीन उमेदवारांसाठी सभा
पुणे लोकसभेसाठी महायुतीकडून मुरलीधर मोहोळांच्या नावाची घोषणा करण्यात आली. त्यावेळी मुरलीधर मोहोळ एकहाती निवडणूक गाजवणार अशी चर्चा होती . मात्र त्यानंतर महाविकास आघाडीने आपला मोहरा बाहेर काढला अन् भाजपच्या 40 वर्षांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावून विधानसभेच्या पोटनिवडणुकीत कसबा काबीज केलेल्या रवींद्र धंगेकरांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यानंतर भाजपचं काही प्रमाणात टेन्शन वाढलं. शुअर असलेल्या जागेसाठी धंगेकरांमुळे आता भाजपला प्रचंड कस लावावा लागत आहे. त्यामुळे शक्तीप्रदर्शन आणि महयुतीच्या मोठ्या नेत्यांत्या सभेसोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा होणार आहे. मोदी पुणेकरांना मतदानाचं आवाहन करणार आहेत.
इतर महत्वाची बातमी-
Manikrao Thakre : निवडणूक आयोगाचा गळा भाजपच्या हाती; माणिकराव ठाकरेंची सरकारवर जहरी टीका
Ravsaheb Danve Property : रावसाहेब दानवे 42 कोटींचे धनी, एकही गाडी नाही, 18 लाखांचं पशूधन, पत्नीकडे 45 तोळे सोने, पोस्टात सर्वाधिक गुंतवणूक!
पुणे पोलिसांचा मुळशी पॅटर्न; कुख्यात गुंड नव्याचा सिनेस्टाईल थरार, पाठलाग करुन अटक