Manikrao Thakre : निवडणूक आयोगाचा गळा भाजपच्या हाती; माणिकराव ठाकरेंची सरकारवर जहरी टीका
निवडणुक आयोगाकडून निपक्षपातीपणे कामकाज होईल, याची शास्वती नाही. संविधानिक संस्था नेस्तनाबुथ करण्याचे काम भाजपकडून केले जात आहे, अशी टीका राष्ट्रीय काँग्रेसचे प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी केली.
पुणे : सर्वांना न्याय मिळावा, निवडणुक प्रक्रीया निपक्षपातीपणे व्हावी, यासाठी निवडणुक आयोगाची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र, आज निवडणुक आयोगाचा गळा भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या हातात ठेवला आहे. त्यामुळे निवडणुक आयोगाकडून निपक्षपातीपणे कामकाज होईल, याची शास्वती नाही. संविधानिक संस्था नेस्तनाबुथ करण्याचे काम भाजपकडून केले जात आहे, अशी टीका राष्ट्रीय काँग्रेसचे प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी केली.पुणे लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडी आण इंडिया आघाडी काँग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar ) यांच्या प्रचारार्थ कॉंग्रेस भवन येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ठाकरे बोलत होते.
ठाकरे म्हणाले, लोकसभेसाठी पहिल्या टप्प्यात 102 जागांसाठी मतदान झाले. यामध्ये इंडिया आघाडीला यश मिळतेय, हे समोर येत आहे. केंद्र सरकारवर जनतेची नाराजी असल्यामुळे 76 लाख लोकांनी मतदान केले नाही. ग्रामीण भागात व तरुणांमध्ये मोदी सरकारबद्दल रोष आहे. भाजपच्या पायाखालची वाळू घसरत असल्याने ते समाजामध्ये वाद निर्माण करण्याचे काम करत आहे. पंतप्रधान देशाचे असताना ते हिंदु मुस्लिम यांच्यात तेढ निर्माण करत आहेत. आमच्या जाहीर नाम्यावर मुस्लिम लीगची छाप आहे, अशी टिका पंतप्रधानांनी करणे दुदैवी आहे. आमच्या जाहीर नाम्यामध्ये मुस्लिमांबद्दल कुठेही उल्लेख नाही. त्यांच्या या विधानाने आमच्या न्याय पत्राला (जाहीरनाम्याला) प्रसिद्धी मिळाली.
शेतकऱ्यांना लागणाऱ्या प्रत्येक बाबींची किंमतीत वाढ झालेली आहे. शेतमालास भाव नाही, त्यामुळे शेतकरी त्रस्त आहे. देशातील संस्था विकण्याचा धडाका सुरू आहे. देशात महिला सुरक्षित नाहीत, याचे परिणाम या निवडणुकीत दिसतील. आघाडीमध्ये सर्वत्र एकोप्याचे चित्र आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील आघाडीचे चारही उमेदवार चांगल़्या मताने निवडून येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मोदी यांच्या सत्ताकाळात 30 लाख नोकऱ्या थांबल्या आहेत. इंडिया आघाडीचे सरकार आल्यावर सहा महिन्यातच या नोकऱ्यांची भरती केली जाईल. आमच्या न्याय पत्रातशेतकऱ्यांचीकर्जमाफी करू,स्वामीनाथन समितीच्या सिफारशि स्विकारू, महिलांसाठी महालक्ष्मीयोजने अंतर्गत महिलेच्या खात्यात दर वर्षी एक लाख रूपये, आरोग्यासाठी 25 लाख रुपये, आदींचा उल्लेख न्यायपत्रात आहे. हा जाहीरनामा अतिशय चांगला आहे. भाजपने आश्वासने दिली पण ती पाळली नाहीत, त्यामुळे भाजपची चारशे पारची घोषणा पोकळ असून ते 200 सुद्धा पार करणार नाहीत, असा दावा त्यांनी केला.
इतर महत्वाची बातमी-