एक्स्प्लोर

WorldCup 2023 : विश्वचषकादरम्यान सट्टे बाजाराचा पर्दाफाश, पिंपरी चिंचवड पोलिसांनी केलेल्या छापेमारीचा व्हिडीओ समोर

WorldCup 2023 : पिंपरी चिंचवड पोलिसांनी विश्वचषकादरम्यान सट्टे बाजार चालवणाऱ्यांचा पर्दाफाश केल्याचं समोर आलं आहे.

पिंपरी - चिंचवड : सध्या संपूर्ण जगामध्ये विश्वचषकाची (WorldCup) रंगत पाहायला मिळतेय. दरम्यान याच विश्वचषकादरम्यान सट्टे बाजाराचा पर्दाफाश झाल्याचं समोर आलं आहे. पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpari Chinchwad) सट्टा लावणाऱ्यांवर पोलिसांनी मोठी कारवाई केलीये. पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुंडा स्क्वाड पथकाने छापा टाकत या सट्टे बाजाराचा पर्दाफाश केला आणि चाळीस लाखांच्या रोख रकमेहस एकाला बेड्या ठोकल्या. दरम्यान पोलिसांनी छापा टाकतानाचा व्हिडीओ सध्या समोर आला आलाय. 

या व्हिडीओमध्ये बुकी दिनेश शर्मा याने पोलिसांसमोर गुडघे टेकल्याचं दिसत आहे. त्याचप्रमाणे चाळीस लाख रुपयांची रोख रक्कम देखील या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसतेय. इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा सामना सुरु असतात हा सट्टा खेळला जात होता. 'क्रिकेट लाईव्ह लाईन गुरू' या अॅप वर अनेकांना आमिष दाखवलं जात होतं. याच अॅपच्या माध्यमातून हा सट्टा खेळला जात होता. तर यावर पोलिसांनी कारवाई करत ही रक्कम ताब्यात घेतली आहे. 

या अॅपच्या माध्यमातून इंग्लंड जिंकल्यास 1 रुपयाला 60 पैसे तर साऊथ आफ्रिका जिंकल्यास 61 पैसे असा भाव मॅचपूर्वी ठरलेला होता. जसजशी मॅचची रंगत वाढत जाते तसा भाव चढत जात होता. . शनिवारी 'हाई-लगाई' नावाने हाच सट्टा सुरू होता. तंत्रज्ञानाचा वापर करत गुंडा विरोधी पथकाने काळेवाडी येथील राहत्या घरावर छापा टाकला अन या बुकीचा पर्दाफाश केला. त्यानंतर दिनेशने यापुढे सट्टा खेळणार नाही, माझी यातून सुटका करा, असं म्हणत तो पोलिसांसमोर गुडघे टेकवले. मात्र एपीआय हरीश माने यांनी पोलिसी खाक्या दाखवत त्याला बेड्या ठोकल्या आहेत. 

दरम्यान घटनास्थळावरुन पोलिसांनी 80 हजार रुपयांची रोकड आणि इतर मुद्देमाल जप्त केल्याची माहिती देण्यात आलीये. तसेच यामध्ये आणखी काही जण सहभागी असल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने पिंपरी चिंचवड पोलिसांनी तपास सुरु केलाय. तर यामध्ये आता पोलिसांच्या हाती आणखी कोणत्या गोष्टी लागणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

पीएसआय अधिकाऱ्यावर कारवाई 

काही दिवसांपूर्वी . बांगलादेश विरुद्ध इंग्लंड या क्रिकेट सामन्यावर  ड्रीम इलेव्हनची टीम तयार केली पीएसआय अधिकारी झेंडे यांनी तयार केली. त्यात झेंडे यांना तब्बल दीड कोटींचे बक्षीस लागले. तरुण अशा ऑनलाईन गेमला आहारी जाऊ नयेत, आणि त्यात त्यांची फसवणूक होऊ नये, म्हणून पोलिसांनी जनजागृती करणं गरजेचं आहे. पण इथं तर स्वतः पोलीस अधिकाऱ्यानेच या माध्यमातून समाजात एक चुकीचा संदेश दिल्याचं अनेकांकडून बोललं जातंय. त्यामुळं पोलीसांनी आता त्यांच्याच पीएसआय झेंडेना दोषी ठरवत त्यांचं निलंबन केलं. 

हेही वाचा : 

India vs Bangladesh Black Tickets : भारत-बांगलादेश मॅचच्या तिकिटांची ब्लॅकने विक्री, बाराशेचं तिकीट बारा हजारांना, दोघे अटकेत

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाईKolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special ReportSharad Pawar Retirement : पवारांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत, बारामतीकरांसमोर सहानुभूती कार्डचा वापर?Vidhan sabha Superfast :  महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Embed widget