(Source: Poll of Polls)
Pune bypoll election : कसब्यावरुन मनसे - राष्ट्रवादी ट्विटर वॉर सुरु; दोन्ही शहराध्यक्षांची एकमेकांना सडेतोड उत्तरं
मनसेने भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्यानंतर पुण्यात राष्ट्रवादी आणि मनसेच्या शहराध्यक्षांमध्ये ट्विटर वॉर सुरु झाला आहे.
Pune bypoll election : मनसेने (MNS) भाजपला (BJP) पाठिंबा (Pune Bypoll Election) देण्याचा निर्णय घेतल्यानंतर पुण्यात राष्ट्रवादी आणि मनसेच्या शहराध्यक्षांमध्ये ट्विटर वॉर सुरु झाला आहे. मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर (sainath babar) आणि राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांच्यात वादावादी सुरु झाली आहे. पुण्यात पोटनिवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. त्यासाठी भाजप आणि महाविकास आघाडी दोन्ही पक्षाकडून प्रचाराची जोरदार तयारी सुरु आहे. त्यातच आता ट्विटरवरदेखील वादावादी सुरु झाल्याने राजकीय वर्तुळात या ट्विट्सची चांगलीच चर्चा होत आहे. या ट्विटमुळे मनसे आणि राष्ट्रवादी आमने-सामने आल्याचं चित्र आहे.
मनसे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी प्रशांत जगताप यांच्यावर टीका केली आहे. कसब्यात महाविकास आघाडीकडून कॉंग्रेसला रविंद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ही उमेदवारी राष्ट्रवादीला देण्यात आली नसल्याने मनसे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी प्रशांत जगतापांवर चांगलाच हल्लाबोल केला आहे.
त्यांच्याच ट्विटला राष्ट्रवादीच्या प्रशांत जगताप यांनीदेखील सडेतोड उत्तर दिलं आहे. साईनाथ, सायबाचा उरलेला पेग चोरून पिलास का बाळा ?? शुद्धीवर ये. तुझ्या सायबाने सुपारी घेतली आहे. तू फक्त मन लावून नाचायचं काम कर, अशा शब्दांत त्यांनी ट्विट केलं आहे आणि यात अप्रत्यक्षरित्या राज ठाकरे यांच्यावर जगतापांनी टीका केली आहे.
साईनाथ, सायबाचा उरलेला पेग चोरून पिलास का बाळा ?? शुद्धीवर ये.
— Prashant Sudamrao Jagtap (@JagtapSpeaks) February 15, 2023
तुझ्या सायबाने सुपारी घेतली आहे, तू फक्त मन लावून नाचायचं काम कर. https://t.co/K9RBwu7Q0T
सध्या सगळीकडे निवडणुकीचे वारे सुरु आहे. त्यात बॅनरबाजी, सभांमधून एकमेकांवर निशाणे साधण्याचा प्रकार सुरुच आहेत. आता हाच सभेतील वाद आता सोशल मीडियापर्यंत पोहचला आहे. त्यामुळे मनसेच्या पाठिंब्याचा नेमका भाजपला फायदा होतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
बोलघेवडे पोपट ED च्या तालावर नाचू लागलेत'; जगपातांचं ट्विट
यापूर्वीही प्रशांत जगताप यांनी ट्विट करत मनसेवर निशाणा साधला होता. ज्या भाजपच्या विरोधात आतापर्यंत पुण्यात मनसे लढत होती. तोच पक्ष आता भाजपला पाठिंबा देणार आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केली आहे. कोथरुडच्या निवडणुकीच्या वेळी मनसेने भाजपविरोधात भूमिका घेतली होती. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादी आणि कांग्रेसची मतं मिळवली होती. कोथरूडमध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या जोरावर उमेदवारी अर्ज भरणारे आता कसब्यात भाजपला पाठिंबा देताय...बोलघेवडे पोपट ED च्या तालावर नाचू लागलेत, अशा शब्दांत त्यांनी भाजपवर आणि मनसेवर टीका केली आहे.
कोथरूड मध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या जोरावर उमेदवारी अर्ज भरणारे आता कसब्यात भाजपला पाठिंबा देताय...
— Prashant Sudamrao Jagtap (@JagtapSpeaks) February 14, 2023
बोलघेवडे पोपट ED च्या तालावर नाचू लागलेत.#नवनिर्माणम्हणे