एक्स्प्लोर
डेव्हिस कप जिंकल्यावर भारतीय खेळाडूंचा ‘झिंग झिंग झिंगाट’वर ठेका
पुणे : रामकुमार रामनाथन आणि युकी भांबरीनं परतीचे एकेरी सामने जिंकून डेव्हिस चषकाच्या लढतीत भारताला न्यूझीलंडवर 4-1 असा विजय मिळवून दिला. डेव्हिस चषक लढतीत न्यूझीलंडला हरवल्यावर भारतीय टेनिसवीरांनी विजयाचा आनंद नाचून साजरा केला. लिअँडर पेस, युकी भांबरी, रामकुमार रामनाथन यांच्यासह संघातील सदस्यांनी झिंग झिंग झिंगाटवर ठेका धरला.
https://twitter.com/rakesh1411A/status/828249492164005888
आशिया ओशनिया ग्रुप वनमधली पहिल्या फेरीची लढत पुण्याच्या बालेवाडी संकुलात खेळवण्यात आली. या लढतीत युकी आणि रामकुमार यांनी शुक्रवारी भारताला सलामीचे दोन्ही एकेरी सामने जिंकून दिले होते. त्यानंतर दुहेरीच्या सामन्यात भारताच्या लिअँडर पेस आणि विष्णूवर्धन या जोडीला हार स्वीकारावी लागली होती. मग रविवारी परतीच्या पहिल्या एकेरीत रामकुमार रामनाथननं न्यूझीलंडच्या फिन टिअर्नीचा 7-5, 6-1, 6-0 असा धुव्वा उडवून भारताला 3-1 विजयी आघाडी मिळवून दिली.
युकी भांबरीनं अखेरच्या सामन्यात जोसे स्टॅटहॅमला 7-5, 3-6, 6-4 असं हरवून भारताच्या विजयाचा आनंद आणखी वाढवला. भारताला आता एप्रिलमध्ये होणाऱ्या पुढच्या लढतीत उझबेकिस्तानचा सामना करायचा आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बीड
क्राईम
करमणूक
Advertisement