एक्स्प्लोर

Pune metro whatsapp Ticket : पुणे मेट्रो सुसाट, स्थानकावर तिकीटांसाठी रांगा, WhatsApp वरुन घरबसल्या करा मेट्रोचं तिकीट बुक, 'या' आहेत सोप्या स्टेप्स

Pune Metro : तुम्ही ही आता घरबसल्या मेट्रोचे तिकीट बुक करू शकता आणि वेळ वाया न घालवता किंवा रांगांमध्ये उभं न राहता घरबसल्या तिकीट काढून मेट्रोचा प्रवास करु शकणार आहात. 

Pune Metro Whatsapp Ticket : 1 ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते पुणे  (Pune Metro) मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचे उदघाटन झाल्यांनतर फुगेवाडी ते सिव्हिल कोर्ट आणि रुबी हॉल ते गरवारे या दोन्ही मार्गिकांना मोठ्याप्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे तिकीट काऊंटरवर लांबपर्यंत रांगा लागल्याचे दृश्य पहायला मिळत आहे. यावर पर्याय म्हणून पुणे मेट्रो प्रशासनाने ऑनलाईन तिकीट बुकिंगचा पर्याय उपलबध करून दिला आहे. तर तुम्ही ही आता घरबसल्या मेट्रोचे तिकीट बुक करू शकता आणि वेळ वाया न घालवता किंवा रांगांमध्ये उभं न राहता घरबसल्या तिकीट काढून मेट्रोचा प्रवास करु शकणार आहात. 

ऑनलाईन तिकीट बुक कसं कराल?

1. पुणे मेट्रो कडून उपलबध करून दिलेली pmr.billeasy.in ही लिंक आपल्या ब्राउझरवर ओपन करा. 

2. त्यानंतर Maharashtra Metro Rail Corporation Ltd. या नावाने एक पेज ओपन होईल, त्यानंतर Book Now वर क्लिक करा,त्यानंतर तुम्हाला कोणत्या स्थानकापासून ते कोणत्या स्थानकापर्यंत प्रवास करायचा आहे याची माहिती द्यावी लागणार आहे. 

3.त्यानंतर तुम्हाला सिंगल कि रिटर्न तिकीट हवे आहे. त्यानुसार पर्याय निवडावा लागणार आहे. त्यानंतर तुम्ही किती प्रवासी आहात यांची संख्या  विचारली जाईल आणि त्यानंतर Proceed या पर्यायावर क्लिक करावं लागणार आहे.

4. त्यानंतर पुढील स्लाइडवर आपल्याला आपल्या WhatsApp द्वारे Login करावं लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला एक OTP आणि पेमेंटसाठीची लिंक तुमच्या WhatsApp नंबरवर पाठवली जाईल. त्यानंतर तुम्हाला त्याठिकाणी Credit Card, Debit Card, UPI या द्वारे  Payment करता येणार आहे. 

5. Payment Successful झाल्यानंतर तुम्हाला तुमचे तिकीट QR कोडसह पाहायला मिळेल आणि तिकीटाची एक प्रत तुम्हाला तुमच्या WhatsApp नंबर वरदेखील पाठवली जाईल. हा Online तिकीट बुकिंगचा पर्याय वापरून तुम्ही  घरबसल्या पुणे मेट्रोचे तिकीट बुक करू शकता. तुम्ही काढलेले तिकीट पुढील सहा तासांसाठीच वैध असणार आहे आणि तुम्ही ते रद्द करू शकणार नाही.
 
विद्यार्थ्यांना विशेष सवलत

सर्व विद्यार्थ्यांना तिकिट भाड्यात 30 टक्के सवलत दिली जाईल तर इतर प्रवासी देखील शनिवार आणि रविवारच्या सवलतीसाठी पात्र असतील. ते शनिवार आणि रविवारी 30 टक्के कमी तिकीट भाडे देतील. वनाझ ते रुबी हॉल क्लिनिक दरम्यानच्या प्रवासाचे तिकीट भाडे 25 रुपये असेल तर सिव्हील कोर्ट ते पिंपरी चिंचवड मेट्रो स्टेशन दरम्यानचे तिकीट भाडे 20 रुपये असेल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. मेट्रो दररोज सकाळी 7 ते रात्री 10 दरम्यान चालेल आणि गर्दीच्या वेळेत दर 10 मिनिटांनी आणि सामान्य वेळेत 15 मिनिटांनी ट्रेन प्रवाशांसाठी उपलब्ध असेल. या मार्गांवर एकूण 11 गाड्या धावतील, असे मेट्रो अधिकाऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा-

Pune Metro : अखेर पुणेकरांसाठी मेट्रो सुसाट; तिकीट दर किती अन् काय आहेत वैशिष्ट्ये?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
Sharad Pawar : रोहित तुम्हाला कुणी एकटं पाडत नाही, काळजी करत बसू नका, तुमच्यामागं युवकांची मोठी ताकद : शरद पवार
काही झालं तरी चालेल पण 400 जागा मोदींच्या हातात द्यायच्या नाहीत हा निकाल घेतला, राज्य त्यांचं आलं पण.. : शरद पवार
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sharad Pawar Ichalkaranji : शरद पवारांची इचलकरंजीत भर पावसात सभाAaditya Thackeray : फडणवीस कधीच मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत, मनसेवरही हल्लाUddhav Thackeray : सत्तारांची गुंडगिरी मोडण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांना उद्धव ठाकरेंचं आवाहनNitin Gadkari on Forest Officers : माझ्या तावडीत अधिकारी सापडल्यास धुलाई करेन- नितीन गडकरी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
Sharad Pawar : रोहित तुम्हाला कुणी एकटं पाडत नाही, काळजी करत बसू नका, तुमच्यामागं युवकांची मोठी ताकद : शरद पवार
काही झालं तरी चालेल पण 400 जागा मोदींच्या हातात द्यायच्या नाहीत हा निकाल घेतला, राज्य त्यांचं आलं पण.. : शरद पवार
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
Sharad Pawar: वाट्टेल ते होऊ दे, पण  राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; आर.आर. आबांच्या लेकाच्या मतदारसंघातून शरद पवारांचा एल्गार
वाट्टेल ते होऊ दे, पण राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; शरद पवारांचा एल्गार
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
त्यावरुन देवेंद्र फडणवीसांनी ओळखलं पाहिजे माझं स्थान काय आहे; शरद पवारांचा पलटवार
त्यावरुन देवेंद्र फडणवीसांनी ओळखलं पाहिजे माझं स्थान काय आहे; शरद पवारांचा पलटवार
Ladki Bahin Yojana : कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
Embed widget