एक्स्प्लोर
सलगच्या सुट्ट्यांमुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे जाम
वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पुण्याकडे जाण्यासाठी अधिकच्या सहा लेन सुरु करण्यात आल्या आहेत.
रायगड : सलग तीन दिवस आलेल्या सुट्ट्यांमुळे पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. मुंबई - पुणे एक्स्प्रेस मार्गावर खालापूर टोलनाक्याजवळ वाहनांच्या जवळपास दोन किमीपेक्षा जास्त लांब वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.
पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या रस्त्यावर वाहतूक सुरळीत आहे. मात्र पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर वाहनांची रांग आहे. सुमारे एक ते दोन किलोमीटर वाहनांची रांग पाहायला मिळत आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पुण्याकडे जाण्यासाठी अधिकच्या सहा लेन सुरु करण्यात आल्या आहेत.
आज प्रजासत्ताक दिन, उद्या दुसरा शनिवार आणि परवा रविवारची सुट्टी आल्यामुळे लोक गावी किंवा पर्यटनस्थळी जात आहेत. त्यामुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर वाहतूक कोंडी झाली आहे. अधिकच्या सहा लेन सुरु करण्यात आल्यामुळे वाहनाधारकांना काहीसा दिलासा मिळणार आहे.
मुंबई - पुणे एक्स्प्रेस वेवर वाहनांच्या रांगा, खालापूर टोल नाक्यावर मोठी गर्दी, पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर एक ते दोन किलोमीटर वाहनांची रांग, पुण्याकडे जाण्यासाठी अधिकच्या सहा लेन सुरु pic.twitter.com/0e4xGQ0CmW
— ABP माझा (@abpmajhatv) January 26, 2018
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement