पुणेकरांनो जेवण ऑनलाईन मागवताना सावधान! नामांकित हॉटेलच्या नावाने सोशल मीडियावर बनावट जाहिराती
पुण्यात नामांकित हॉटेलच्या नावाने जेवणाच्या ऑर्डर्स स्वीकारल्या जातील, अशी सोशल मीडीयावर जाहिरात करुन लोकांकडून पैसे उकळले जातायत. त्यामुळे ग्राहक आणि हॉटेल व्यवसायिक दोघांचीही फसवणूक होत आहे.
पुणे : लॉकडाऊनमुळे पुण्यातील अनेकांना जेवण बाहेरुन ऑर्डरद्वारे मागवावं लागतयं. पण याचा गैरफायदा घेणारी एक टोळी पुण्यात सक्रिय झालीय. पुण्यातील नामांकित हॉटेलच्या नावाने जेवणाच्या ऑर्डर्स स्वीकारल्या जातील अशी सोशल मिडियावर जाहिरात करुन लोकांकडून पैसे उकळले जातायत. पुण्यातील अनेक हॉटेल चालक त्यामुळे त्रस्त झालेत. याबद्दल सायबर पोलिसांकडे तक्रार करुनही फरक नसल्याचं या हॉटेल व्यवसायिकांच म्हणणे आहे.
पुणे शहरात दोन हजारच्यावर कोरोना बाधित रुग्णांची संख्या आहे. परिणामी पुण्याचा समावेश रेडझोनमध्ये आहे. सोबतच शहरातील काही भागांमध्ये रुग्ण वाढल्याने कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आले आहे. गेल्या 53 दिवसांपासून या ठिकाणी लॉकडाऊन आहे. दरम्यान, तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन घोषित झाल्यानंतर राज्य सरकारकडून काही अटी शिथिल करण्यात आल्या. यात हॉटेल व्यवसायिकांना घरपोच जेवण देण्यासाठी परवानगी देण्यात आली. परिणामी अनेक नामांकीत हॉटेल व्यवसायिकांनी घरपोच डिलीवरची सुविधा सुरू केली. पुण्यात लॉकडाऊनमुळे अनेक लोक अडकले आहेत. ज्यांच्या जेवणाची गैरसोय होत आहे. त्यामुळे या सेवेला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. मात्र, याचाच गैरफायदा आता एका टोळीकडून घेतला जात आहे.
संरक्षण उत्पादन क्षेत्रातील एफडीआय मर्यादा 49 टक्क्यांवरून 74 टक्के : अर्थमंत्री निर्मला सीतारमण
सोशल मीडियाचा वापर लॉकडाऊनमुळे पुण्यातील अनेकजण जेवण बाहेरुन ऑर्डरद्वारे मागवत आहे. याचा गैरफायदा घेणारी एक टोळी पुण्यात सक्रिय झालीय. पुण्यातील नामांकित हॉटेलच्या नावाने जेवणाच्या ऑर्डर्स स्वीकारल्या जातील, अशी सोशल मिडियावर जाहिरात करुन लोकांकडून पैसे उकळले जातायत. यामध्ये ग्राहक आणि हॉटेल व्यवसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. सोबतचं जे कोणी हे जेवण पुरवत आहेत, ते स्वच्छेतेची काळजी घेत आहे का? सध्या कोरोना सारखा संसर्गजन्य आजार बाहेर वावरत असताना हा सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. पुण्यातील अनेक हॉटेल चालक त्यामुळे त्रस्त झालेत. याबद्दल सायबर पोलिसांकडे तक्रार करुनही फरक नसल्याचं या हॉटेल व्यवसायिकांच म्हणणे आहे. Pune University | पुणे विद्यापीठाची परीक्षा लेखी स्वरुपातच होणार; परीक्षा संचालकांची माहिती