एक्स्प्लोर
आळंदीत चिमुकल्याने गिळलेला सेल पोटातच फुटला
हुजैफ तांबोळी असं या मुलाचं नाव असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अगोदरही अशाच तीन घटना घडल्या होत्या.

पिंपरी चिंचवड : चिमुकल्याने रिमोटचे बटन सेल गिळल्याची आणि तो पोटात फुटल्याची धक्कादायक घटना पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा घडली आहे. हुजैफ तांबोळी असं या मुलाचं नाव असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
आळंदी येथे तांबोळी कुटुंबीय राहतं. आज सकाळी कुटुंबीयांच्या आधी हुजैफ झोपेतून जागा झाला. खेळता खेळता टेबलवर ठेवलेला रिमोट त्याने घेतला. तो काही वेळा आपटला. त्यातून बटन सेल बाहेर आला. त्या आवाजाने सगळे जागे झाले, पण तोपर्यंत हुजैफने सेल गिळले होते. ही बाब लक्षात येताच रुग्णालयात धाव घेण्यात आली. दुर्बिणीच्या साहाय्याने शस्त्रक्रिया करुन सेल बाहेर काढण्यात आला.
दरम्यान, लहानग्याने सेल गिळण्याची ही काही पहिलीच घटना नाही. याआधीही
प्रांजल गुंड या दीड वर्षीय मुलीने 10 नोव्हेंबर 2016 रोजी सेल गिळला होता.
घनश्याम देशपांडे या सहा वर्षीय मुलाने 19 नोव्हेंबर 2016 रोजी सेल गिळला होता.
क्रांती पवार या दीड वर्षीय मुलीने 24 जानेवारी 2017 सेल गिळला होता.
सेल गिळण्याची ही ही चौथी घटना आहे. लहान मुलांपासून अशा धोकादायक वस्तू दूर ठेवण्याची गरज आहे. मात्र पालक कोणतीही खबरदारी घेताना दिसत नाहीत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
क्राईम
महाराष्ट्र
बुलढाणा
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
