एक्स्प्लोर

JayKumar Gore : डिस्चार्जनंतर आमदार जयकुमार गोरे उपचारासाठी पुन्हा रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल

माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांना काल (6 जानेवारी) रात्री पुन्हा पुण्याला हलविण्यात आलं आहे.

JayKumar Gore : माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांना काल (6 जानेवारी) रात्री पुन्हा पुण्याला (Pune) हलवण्यात आलं आहे. गेल्या दोन दिवसात दगदग वाढल्याने जयकुमार गोरे यांच्या छातीतील वेदना मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. रुबी हॉल क्लिनिकच्या डॉक्टरांच्या (Accident News) सल्ल्यानुसार जयकुमार गोरे यांना रात्री पुन्हा पुण्याला हलवण्यात आलं आहे. 

फलटण येथे गेल्या 14  दिवसांपूर्वी भीषण अपघातात जयकुमार गोरे जखमी झाले होते. त्यांच्या पाय आणि बरगड्यांना इजा झाली होती. परवा (5 जानेवारी) त्यांना एअर अॅम्ब्युलन्सने बोराटवाडी येथे आणण्यात आले होते. या प्रवासादरम्यान दगदग झाल्याने त्यांच्या छातीत तीव्र वेदना होऊ लागल्या. त्यानंतर रुबी हॉल क्लिनिकच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांच्यावर स्थानिक डॉक्टरांनी उपचार केले होते. मात्र त्यानंतर त्यांना तातडीने पुढील उपचारासाठी पुण्याला हलवण्यात आलं आहे. 

5 जानेवारीला पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमधून (Ruby Hall Clinic) डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यानंतर (Pune) ते हेलिकॉप्टरने त्यांच्या गावी रवाना झाले होते. त्रास वाढल्याने परत पुण्यात उपचारासाठी आणण्यात आलं आहे. नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरु असताना आमदार जयकुमार गोरे हे रात्री उशिरा नागपूरहून विमानाने पुण्यात आले होते आणि पुण्यातून त्यांच्या गावी जात असताना रात्री साडेतीन वाजता फलटणजवळ त्यांच्या गाडीला अपघात झाला होता. पुलाचा कठडा तोडून त्यांची गाडी तीस फूट खोल खाली कोसळली होती. 

डॉक्टरांचे धन्यवाद मानत घेतला होता डिस्चार्ज

रुबी हॉलमध्ये दाखल असल्याच्या या दिवसात मला वॉर्ड बॉय, नर्स, केअर टेकर, डॉक्टर्स यांनी त्यांच्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे माझी काळजी घेतली आणि या दृष्टीकोनामुळेच माझी तब्येत अपेक्षेपेक्षा खूप लवकर ठीक झाली. माझी अत्यंत काळजी घेतल्याबद्दल डॉ. पूर्वेझ ग्रांट, डॉ. झिरपे आणि न्यूरो ट्रॉमा युनिट टीमचा आभारी आहे, असं म्हणत आमदार गोरेंनी टीमचे आभार मानले होते.

अपघातात मोठी दुखापत

गोरे यांची गाडी एसयूव्ही ज्या खड्ड्यात पडली तो खड्डा किमान 30 फूट खोल होता. त्यामुळे आमदारांच्या छातीत फ्रॅक्चर झाले होते. अपघातानंतर छातीत दुखापत आणि छातीचा घोट फ्रॅक्चर झाल्याने त्यांना क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले होते. छातीतील हाड फ्रॅक्चर झाल्यामुळे आठवडाभरापूर्वी त्यांना जेव्हा दाखल केले तेव्हा त्यांना श्वास घेण्यास खूप त्रास होत होता. त्यासोबतच वेदनाही भरपूर झाल्या मात्र त्यांनी धीर सोडला नाही, ते खचले नाहीत. उपचारालादेखील त्यांनी चांगला प्रतिसाद दिला. त्यामुळे आम्हाला देखील योग्य वेळी योग्य उपचार करता आले, असं डॉक्टरांनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या

तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
Tukaram Mundhe: हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनात सुनील तटकरेंचं काम चांगलं; प्रशांत किशोर भेटीनंतर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया
सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनात सुनील तटकरेंचं काम चांगलं; प्रशांत किशोर भेटीनंतर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया
Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंचं नेक्स्ट टार्गेट काय? म्हणाले, 'पुण्यात पहिलं चायनीज जिथं खाल्लं, आता पुन्हा तिथे...'
तुकाराम मुंढेंचं नेक्स्ट टार्गेट काय? म्हणाले, 'पुण्यात पहिलं चायनीज जिथं खाल्लं, आता पुन्हा तिथे...'

व्हिडीओ

Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
Embed widget