एक्स्प्लोर
पुणे : खेळताना वीजेच्या खांबाचा स्पर्श झाल्यानं 11 वर्षीय मुलाचा मृत्यू
पुणे : पुण्यातील खडकी परिसरात लोखंडी खांबाला हात लागून शॉक बसल्याने 11 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. प्रितेश कांबळे असं या मुलाचं नाव आहे. काल रात्री पावणे दहाच्या सुमारास मित्रांसमवेत क्रिकेट खेळत असताना घरावर गेलेला चेंडू काढताना प्रितेशला शॉक लागला होता.
खड़कीतील मरीआई माता परिसरात असणाऱ्या लुंबिनी कुंज बुध्द विहारशेजारी काल रात्री मुलं क्रिकेट खेळत होती. पावणे दहा वाजण्याच्या सुमारास खेळत असताना त्या परिसरात राहणारे चंद्रकांत कांबळे यांच्या घरावर चेंडू गेला. त्या घराचे छप्पर हे पत्र्याचे होते आणि बाजूला एक लोखंडी खांब आहे. प्रितेश गणेश कांबळे हा मुलगा चेंडू काढण्यासाठी घरावर चढण्याचा प्रयत्न करत होता.
प्रितेश घरावर चढत असताना बाजूला असणाऱ्या खांबाला दोन्ही हाताने पकडलं. मात्र वीजेच्या खांबाचा त्याला शॉक लागला. प्रितेशला शॉक लागल्याचं त्याच्या भावाच्या लक्षात येताच त्यानं झाडू मारून बाजूला काढले आणि तातडीनं जवळच्याच खडकी कँटोन्मेंट रूग्णालयात नेलं. पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र
Advertisement